Shivaji University Recruitment 2026 : शिवाजी विद्यापीठात नोकरीची संधी! शिववाणी कम्युनिटी रेडिओसाठी थेट मुलाखती

यासाठी 30 नोव्हेंबर 2026 रोजी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

कोल्हापूर: कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. विद्यापीठाच्या ‘पद्मश्री ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन’ अंतर्गत कार्यरत असलेल्या ‘कम्युनिटी रेडिओ शिववाणी’ प्रकल्पासाठी दोन पदांवर तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्यात येणार आहे. यासाठी 30 नोव्हेंबर 2026 रोजी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.



कोणत्या पदांसाठी भरती?


या भरतीमध्ये लिपिक आणि थिएटर ऑपरेटर अशा प्रत्येकी एका पदाचा समावेश आहे.


1. लिपिक – 1 पद




  • शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्थेतील कोणत्याही शाखेतील पदवी.

  • आवश्यक कौशल्ये : रेकॉर्ड कीपिंगचा अनुभव, इंग्रजी आणि मराठी टायपिंगचे ज्ञान, MSCIT आणि विद्यापीठ पोर्टलची माहिती.

  • रेडिओ कमर्शियल बिलिंगचे ज्ञान आणि अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य.

  • मानधन : प्रतिदिन 650 रुपये.

  • वयोमर्यादा : 20 ते 40 वर्षे.


2. थिएटर ऑपरेटर – 1 पद




  • शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील ITI, डिप्लोमा किंवा पदवी.

  • इलेक्ट्रिकल उपकरणे हाताळण्याचा पूर्वानुभव आवश्यक.

  • फिल्म थिएटर चालवण्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य.

  • मानधन : प्रतिदिन 750 रुपये.

  • वयोमर्यादा : 20 ते 40 वर्षे.


अर्ज कसा करायचा?


इच्छुक उमेदवारांनी विद्यापीठाने दिलेल्या Google Form लिंकवर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.


अर्जाची अंतिम मुदत : 29 नोव्हेंबर 2026, सायंकाळी 6 वाजेपर्यंत.


ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा



मुलाखत कधी आणि कुठे होणार?


मुलाखत 30 नोव्हेंबर 2026 रोजी ‘पद्मश्री ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन’ यांच्या दालनात होणार आहे.




  • नावनोंदणी आणि कागदपत्र पडताळणी : दुपारी 3 ते 3.30 वाजेपर्यंत.

  • प्रत्यक्ष मुलाखत : दुपारी 3.30 ते 4.30 वाजेपर्यंत.

  • निवड यादी : सायंकाळी 5.30 वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डावर प्रसिद्ध केली जाणार आहे.


उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना


मुलाखतीला येताना शैक्षणिक पात्रता आणि कामाच्या अनुभवाच्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. गरजेनुसार उमेदवारांची प्रात्यक्षिक परीक्षाही घेतली जाऊ शकते. मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना प्रवासाचा खर्च स्वतः करावा लागेल.


ही नियुक्ती प्रकल्पाच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात असेल. प्रकल्पाचा कालावधी जास्तीत जास्त 3 वर्षांचा असून, काम असमाधानकारक आढळल्यास सेवा बंद करण्याचा अधिकार विद्यापीठाने राखून ठेवला आहे. निवड झालेल्या उमेदवारांना विद्यापीठाच्या नियमानुसार बंधपत्र द्यावे लागेल.


भरतीची सविस्तर माहिती आणि अधिकृत जाहिरात शिवाजी विद्यापीठाच्या www.unishivaji.ac.in या संकेतस्थळावरील ‘Recruitment’ विभागात उपलब्ध आहे.





Comments
Add Comment

Railway News : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! नगरसोल-तारूर मार्गावर 16 दिवसांचा ब्लॉक; अनेक गाड्या रद्द

ST प्रवाशांसाठी मोठा दिलासा! NCMC कार्डमध्ये धमाकेदार बदल, कोणाचे पैसे वाचणार आणि कसे?

महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सवलतधारक प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने सुरू केलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड

शंभराव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा शरणकुमार लिंबाळे यांच्याकडे; निवडणुकीविना ऐतिहासिक निवड!

पुणे: 100 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या 28 जानेवारी 2027 ते 31 डिसेंबर 2027 दरम्यान पुण्यातील सावित्रीबाई फुले

पेपरफुटीप्रकरणी १० कोटींचा दंड, १० वर्षांपर्यंत कारावासाची शिफारस

मुंबई : राज्यातील भरती आणि स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी तसेच अन्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर

Godavari Pollution: गोदावरी प्रदूषणप्रकरणी 199 अधिकारी न्यायालयाच्या रडारवर

मुंबई : गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरल्याप्रकरणी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात 199 अधिकाऱ्यांची

MPSC पेपरफुटीचा मुख्य सूत्रधार आयोगातीलच अधिकारी, 300 प्रश्न लॅपटॉपवर टाईप केल्याचा आरोप; सहा आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात आयोगातीलच