Sharad Pawar on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी शरद पवारांनाही फसवले! शरद पवार यांनीच केला खुलासा!

पुणे : विधान परिषदेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे हे दिलेल्या शब्दाला जागले नाहीत. उद्धव ठाकरे यांनी गद्दारी करत विधान परिषदेच्या निवडणुकीत ऐनवेळी उमेदवार उभा केल्याने महाविकास आघाडीच्या जयंत पाटलांचा पराभव झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.


जयंत पाटलांना विधान परिषदेत उमेदवारी दिली असताना उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिला. निवडणुकीत आमचा उमेदवार नव्हता, तर जयंत पाटलांना आमची मते देऊ असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. दुसऱ्या क्रमांकाच्या मतांवरून सुद्धा आम्ही चर्चा केली होती. परंतु ऐनवेळी उमेदवार उभा केल्याने आमच्या उमेदवाराचा पराभव झाला, असे पवार म्हणाले.


आज पुण्यामध्ये पुणे श्रमिक पत्रकार संघाकडून आयोजित करणाऱ्या वार्तालापमध्ये शरद पवार यांनी विविध प्रश्नांवर दिलखुलास उत्तरे दिली. त्याचबरोबर जोरदार राजकीय फटकेबाजी सुद्धा केली. लोकसभा निवडणुकीत जास्त जागा घेऊन जास्त उमेदवार निवडून आणण्यात यश आले नाही. विधान परिषदेला सुद्धा उमेदवार दिला. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे हट्ट करतात का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. यावेळी शरद पवार यांनी उत्तर दिले.


शरद पवार म्हणाले की, थोडा स्वभाव असतो एखाद्याचा. कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता आपल्या पक्षाच्या हिताच्या दृष्टीने आग्रही भूमिका घेत असतात. पण थोडं अडजेस्ट करावं लागतं. लोकांसमोर सामूहिकपणे जात असताना तडजोड करायच्या असतात. मात्र, त्यांच्या स्वभावाला काय करणार? परंतु त्यामुळे आम्ही अस्वस्थ होत नाही.


त्यामुळे मविआमध्ये नेतृत्वावरून संघर्ष आहे का, असे विचारण्यात आले असता शरद पवारांनी अजिबात संघर्ष नसल्याचे सांगितले.

Comments
Add Comment

संविधान दिनी राज्यातील 11 गड-किल्ल्यांवर स्वच्छता अभियान! रायगडावर 'गडांचा मान, संविधानाचा सन्मान'

रायगड : भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्यांची जाणीव आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा जतन

Uday Samant : ‘गाव तिथे उद्योजक’ योजना धाराशिवमधून सुरू होणार; नवउद्योजकांना 1 कोटीपर्यंत अर्थसहाय्य

धाराशिव : राज्यातील ग्रामीण भागात उद्योजकतेला चालना देण्यासाठी उद्योग विभागाच्या माध्यमातून ‘गाव तिथे

FDA Action : पुण्यातील इंडुकेअर फार्मास्युटिकलचे उत्पादन परवाने पुन्हा रद्द; परवानगीशिवाय 9 औषधांची निर्मिती केल्याचे उघड

पुणे : पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथील इंडुकेअर फार्मास्युटिकल अँड रिसर्च फाउंडेशन या कंपनीवर अन्न व औषध

Philately quiz : 'विकास आणि वारसा' थीमवर रंगली फिलाटेली प्रश्नमंजुषा; विदर्भातील २० संघांचा सहभाग, विजेता संघ परिमंडळ स्तरावर झळकणार

नागपूर : तरुण पिढीमध्ये टपाल तिकीट संग्रहाची (फिलाटेली) गोडी निर्माण व्हावी आणि या माध्यमातून देशाचा गौरवशाली

Shivaji University Recruitment 2026 : शिवाजी विद्यापीठात नोकरीची संधी! शिववाणी कम्युनिटी रेडिओसाठी थेट मुलाखती

कोल्हापूर: कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. विद्यापीठाच्या ‘पद्मश्री ग. गो.

Railway News : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! नगरसोल-तारूर मार्गावर 16 दिवसांचा ब्लॉक; अनेक गाड्या रद्द