चिकणी येथील श्रेयस खेडेकरचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश









मुरुड : मुरुड तालुक्यातील काशिद-चिकणी येथील बालपणापासून स्पर्धा परीक्षेची आवड असलेला रायगड जिल्हा परिषदेच्या काशिद प्राथमिक शाळेचा इ. ५ वी. तील विद्यार्थी श्रेयस योगेश खेडकर याने शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेत मुरुड तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावला. याबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.


काशीद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश नांदगावकर, स्कॉलरशिप तज्ञ नरेश पाकले व प्रमोदिनी म्हात्रे तसेच कटाक्षाने लक्ष देणारे वडील योगेश खेडेकर व त्याची आई जान्हवी खेडेकर यांचे श्रेयसला मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याने मिळवलेल्या यशाबद्दल तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुनिल गवळी, केंद्र प्रमुख दिनेश म्हात्रे, सर्व शिक्षकवृंद, काशिद ग्रामपंचायत, शालेय व्यवस्थापन समिती, काशिद चिकणी ग्रामस्थ, समाजातील विविध मान्यवरांकडून अभिनंदन व कौतुक होत आहे.

Comments
Add Comment

संविधान दिनी राज्यातील 11 गड-किल्ल्यांवर स्वच्छता अभियान! रायगडावर 'गडांचा मान, संविधानाचा सन्मान'

रायगड : भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्यांची जाणीव आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा जतन

Raigad Road Accident: श्रीवर्धनहून परतताना काळाचा घाला! म्हसळा बायपासवर कारचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, दोघे जखमी

रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथे रात्री उशिरा भीषण रस्ते अपघाताची घटना घडली. श्रीवर्धन-माणगाव मार्गावरील म्हसळा

Alibaug Traffic Tragedy: सायरन वाजत होता, आई-वडील रडत होते; पण वाहतूक कोंडीने हिरावला २० महिन्यांच्या चिमुरड्याचा जीव!

रस्त्यांवरील वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या नियोजनामुळे एखाद्याचा किती मोठा नुकसान होऊ शकते, याची जाणीव करून देणारी

Raigad Fire : उरणमध्ये तेल निर्मिती प्रकल्पाला भीषण आग; आकाशात धुराचे लोट, सिडको अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू

Uran : महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील उरणजवळील वेश्वी गावात सोमवारी एका औद्योगिक गोदामाला भीषण आग लागल्याची

Uran Water Shortage: उरणकरांनो पाणी जपून वापरा! ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये नागरिकांवर पाणी कपातीचे संकट

उरण: उरण शहरामध्ये ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या टप्प्यापासून पाणी कपात केली जाणार आहे. त्यामुळे उरण शहरातील

पनवेलमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे भव्य "कोजागिरी पौर्णिमा उत्सव 2026" चे आयोजन; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची असणार विशेष उपस्थिती

पनवेल: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी, पनवेल महानगरपालिका क्षेत्राच्या वतीने 24 व 25 ऑक्टोबर 2026 रोजी