Mumbai Rain : मुंबईत होणार २६ जुलैची पुनरावृत्ती? हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

जाणून घ्या पुढील १५ दिवसांत कसे असेल मुंबईतील पावसाचे वातावरण?


मुंबई : काल रात्रीपासून मुंबईसह महाराष्ट्रात (Maharashtra) मुसळधार सरी कोसळत आहेत. अनेक ठिकाणी पूरजन्य स्थिती निर्माण झाली असून नागरिकांचेही मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसून येत आहेत. सलग पाच सहा दिवस पावसाच्या धारा (Heavy Rain) कोसळत असल्यामुळे, सखल भागात पाणी साचल्यामुळे वाहतूक सेवा देखील विस्कळीत झाली आहे. अशातच हवामान विभागाने पुढील पंधरा दिवस मुंबईत पावसाचे थैमान असेच कायम असणार असल्याचा अंदाज दिला आहे. त्यामुळे २६ जुलै २००५ साली निर्माण झालेल्या मुंबईपूराच्या कटू आठवणी डोळ्यांसमोर येऊन मुंबईकरांची चिंता आणखी वाढू लागली आहे.


हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे, आज मुंबईमध्ये ६० ते ७० प्रतितास किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यासोबत मुंबईमध्ये पुढील दोन आठवड्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 'स्कायमेट' या खासगी हवामान संस्थेने पुढील दोन आठवडे कसा पाऊस पडणार आहे याचा अंदाज व्यक्त केला आहे. जाणून घ्या कसे असेल मुंबईतील वातावरण.




  • २५ जुलै - ठराविक ठिकाणी प्रचंड पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

  • २६ जुलै - विजांच्या कडकडाटासहीत मुंबईमध्ये पाऊस पडेल असा अंदाज आहे.

  • २७ जुलै - शनिवारीही मुंबईमध्ये विजांच्या कडकडाटासहीत पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

  • २८ जुलै - रविवारी मुंबईकरांना सूर्याचं दर्शन होऊ शकतं आणि पाऊस विश्रांती घेईल असा अंदाज आहे.

  • २९ जुलै - सोमवारी रविवारच्या तुलनेत कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

  • ३० जुलै - ३० जुलैपासून पुढील ९ दिवस जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस मुंबईकरांना पहायला मिळेल असा अंदाज आहे.

  • ३१ जुलै - बुधवारीही मुंबईमध्ये विजांच्या कडकडाटासहीत पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

  • १ ऑगस्ट - महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

  • २ ऑगस्ट - पुढल्या शुक्रवारी मुंबईमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडून फ्लॅश फ्लडची शक्यता आहे.

  • ३ ऑगस्ट - या दिवशीही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

  • ४ ऑगस्ट - पुढल्या रविवारी मुंबईत विजांच्या कडकडाटासहीत पावसाची शक्यता आहे.

  • ५ ऑगस्ट - या दिवशीही आधीच्या दिवसासारखी स्थिती असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

  • ६ ऑगस्ट - सलग तिसऱ्या दिवशीही मुंबईत विजांच्या कडकडाटासहीत पाऊस पडेल असा अंदाज आहे.

  • ७ ऑगस्ट - तीन दिवसांनंतर मुंबईकरांना पुढल्या बुधवारी सूर्याचं दर्शन होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

  • ८ ऑगस्ट - या दिवशीही सूर्यदर्शन होईल. मात्र तुरळक पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज आहे.



दरम्यान, हवामान संस्थेने दिलेला अंदाज पाहता मुंबईकरांचा पुढील दोन आठवडे पावसाचा प्रवास करावा लागणार असून गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आव्हान देखील केले आहे.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर