Paris Olympics 2024: आज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा पहिला दिवस, जाणून घ्या वेळापत्रक

मुंबई: पॅरिस ऑलिम्पिक २०२४मध्ये(Paris Olympics 2024) भारताची सुरूवात आजपासून म्हणजे २५ जुलैपासून होत आहे. खेळाच्या महाकुंभाचे उद्घाटन २६ जुलै शुक्रवारपासून होत आहे. मात्र भारताच्या अभियानाची सुरूवात एक दिवस आधीच होत आहे. यावेळेस ११७ सदस्यीय संघाचे भारतीय दल या स्पर्धेत भाग घेत आहे.


भारत तिरंदाजीने सुरूवात करत आहे. दरम्यान, आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये एकदाही भारताला पदक मिळालेले नाही. त्यामुळे भारताला पहिल्या दिवशी पदक मिळवण्याचे ध्येय तिरंदाजांचे असेल.



पहिल्या दिवशी तिरंदाजीत भारताचे वेळापत्रक


महिला - दुपारी १ वाजता महिला वैयक्तिक रँकिंग राऊंड असेल. महिलांमध्ये दीपिका कुमारी, अंकिता भक्त आणि भजन कौर भाग घेईल.


पुरुष - त्यानंतर संध्याकाळी पावणेसहा वाजता पुरुषांच्या वैयक्तिक रँकिंग राऊंड असेल. पुरुषांमध्ये बी धीरज, तरुणदीप राय आणि प्रवीण जाधव भाग घेत आहेत.



कुठे पाहू शकता लाईव्ह?


पहिल्या दिवशी होणारे तिरंदाजीचे खेळ भारतात वायकॉम १८च्या स्पोर्ट्स आणि डीडी स्पोर्ट्स १.० च्या माध्यमातून लाईव्ह प्रसारित केले जातील. याशिवाय जिओ सिनेमाच्या माध्यमातून तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.

Comments
Add Comment

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम