द्विशतक, षटकार आणि बरंच काही..! आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत वैभव सूर्यवंशीकडू विक्रमाचा पाऊस

आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात भारत आणि युएई यांच्यात लढत झाली. ही लढत भारताने वैभव सूर्यवंशीमुळे सहज जिंकली. इतकंच काय तर या सामन्यात विक्रमांचा पाऊस पाडला. एका पाठोपाठ एक धडाधड विक्रम रचले.

1/5 आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत वैभव सूर्यवंशीच्या वादळापुढे युएईने गुडघे टेकले. वैभव सूर्यवंशी जोरदार प्रहार करत युएईला डोकंच वर काढू दिलं नाही. युएईने विजयासाठी 250 धावांचं आव्हान दिलं होतं. त्यात वैभव सूर्यवंशीने एकट्याने 204 धावा केल्या. यासह भारताने हा सामना वघ्या 14.2 षटकात जिंकला. (Photo: BCCI Twitter)

2/5 वैभव सूर्यवंशीने अवघ्या 52 चेंडूत द्विशतक ठोकलं. तसेच 53 चेंडूत 204 धावा करून बाद झाला. यासह त्याने टी20 क्रिकेटमध्ये इतिहास रचला. लिस्ट ए क्रिकेटमध्ये भारताकडून 14 फलंदाजांनी मिळून एकूण 18 द्विशतके झळकावली आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय वनडेत रोहित शर्मा (3), शुभमन गिल (2), सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि इशान किशन यांनी द्विशतक ठोकले आहे. याशिवाय देशांतर्गत आणि 'ए' संघांच्या 50 षटकांच्या सामन्यांमध्ये पृथ्वी शॉ (2 वेळा), नारायण जगदीशन (277 धावा - विश्वविक्रम), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, स्वस्तिक सामल, यशस्वी जयस्वाल, कर्ण वीर कौशल आणि समर्थ व्यास यांनीही द्विशतकी खेळी केली आहे. (Photo: BCCI Twitter)

3/5 व्यावसायिक क्रिकेटच्या एकाच डावात सर्वाधिक 28 षटकार मारण्याचा विश्वविक्रम भारताच्या वैभव सूर्यवंशीने केला आहे. या यादीत तन्मय अग्रवाल (26 षटकार, 2024) दुसऱ्या, तर कॉलिन मुनरो (23 षटकार, 2015) आणि डार्सी शॉर्ट (23 षटकार, 2018) संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत. (Photo: BCCI Twitter)

4/5 लिस्ट-ए वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान द्विशतक ठोकण्याचा विश्वविक्रम भारताच्या वैभव सूर्यवंशीने (52 चेंडू, भारत 'ए' विरुद्ध यूएई, 2026) केला आहे. या यादीत न्यूझीलंडचा चॅड बोवेस (103 चेंडू, 2024) दुसऱ्या, तर भारताचा एन. जगदीशन (114 चेंडू, 2022) आणि इंग्लंडचा हॅरी ब्रूक (114 चेंडू, 2026) संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत. (Photo: BCCI Twitter)

5/5 लिस्ट-ए वनडे शतकी खेळीत सर्वाधिक स्ट्राईक रेटचा विश्वविक्रम भारताच्या वैभव सूर्यवंशीने (384.90 स्ट्राईक रेट - 53 चेंडूंत 204 धावा, भारत 'ए' विरुद्ध यूएई, 2026) केला आहे. या यादीत एबी डिव्हिलियर्स (338.63 स्ट्राईक रेट - 44 चेंडूंत 149 धावा, 2015) दुसऱ्या, तर जेक फ्रेझर-मॅकगर्क (328.94 स्ट्राईक रेट -38 चेंडूंत 125 धावा, 2023) तिसऱ्या स्थानावर आहे. (Photo: BCCI Twitter)

 
Comments
Add Comment

Asia Cup Rising Stars 2026 : UAE वर भारताचा मोठा विजय; वैभव सूर्यवंशीच्या द्विशतकी खेळीने उपांत्य फेरी निश्चित

दोहा येथे झालेल्या यूएई विरुद्ध भारत या सामन्यात भारताने आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 च्या उपांत्य भेरीत आपले

ऐतिहासिक द्विशतक! टी-20 क्रिकेटमध्ये 200 धावा करणारा वैभव सूर्यवंशी पहिलाच भारतीय

क्रिकेटच्या मैदानावर आज इतिहास घडला आहे! अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने आपल्या आक्रमक फलंदाजीने

6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6...! वैभव सूर्यवंशीने अवघ्या 28 चेंडूत ठोकलं शतक, असा नोंदवला विक्रम

आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत भारताचा स्टार युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याची बॅट काही चालली नव्हती. नेपाळ

कसोटीत प्रतिस्पर्ध्यांना 100 धावांच्या आत सर्वाधिक वेळा ऑल-आऊट करण्याचा विश्वविक्रम कोणाच्या नावावर? जाणून घ्या

[caption id="attachment_1078646" align="aligncenter" width="800"] क्रिकेट इतिहासात अनेक विक्रम रचले आणि मोडले गेलेत. त्यामुळे प्रत्येक विक्रमाची चर्चा

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर शुभमन गिलने ठेवलेला प्रस्ताव आयसीसीने फेटाळला, असं कारण दिलं की...

भारत न्यूझीलंड कसोटी मालिका सुरू असून पहिला सामना अनिर्णित ठरला. पहिल्या सामन्यात भारताने 720 धावांचा डोंगर रचला

वेलिंग्टन कसोटीत ड्रॉ? अश्विनचा संताप शिगेला! शुभमन गिलच्या निर्णयावर थेट हल्ला, कोहलीची आठवण काढत म्हणाला...

India vs New Zealand : वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या 5 व्या दिवशी भारताने अनपेक्षितपणे