काही वेगळे नाही...! झंझावाती द्विशतकी खेळीनंतर वैभव सूर्यवंशीने अशा भावना मांडल्या

भारत ए विरुद्ध युएई सामना आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत पार पडला. या सामन्यात भारताने युएईला सहज पराभूत केलं. या सामन्यात अवघ्या 52 चेंडूत वैभव सूर्यवंशीने द्विशतक ठोकलं. या खेळीनंतर त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. यानंतर त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.

आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत भारत आणि युएई यांच्यात लढत झाली. या सामन्यात नाणेफेकीचा कौल युएईने जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. युएईने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 गडी गमवून 248 धावा केल्या. तसेच विजयासाठी 250 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान भारताने 14.2 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं. वैभव सूर्यवंशीने या सामन्यात 204 धावांची खेळी केली. वैभव सूर्यवंशीने 53 चेंडूत 28 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 204 धावा केल्या. त्याने 384.91 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. या खेळीमुळे त्याला सामनावीरीच्या पुरस्कारने गौरविण्यात आलं. यावेळी समाचोलकांनी त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. विक्रम आणि फलंदाजीच्या दृष्टिकोनाबद्दल वैभव सूर्यवंशी म्हणाला की, 'मागच्या दोन सामन्यांमध्ये, मी स्थिरावलो होतो पण त्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रूपांतर करू शकलो नाही. त्यामुळे सुरुवातीला मैदानात उतरून वेळ घेण्याची योजना होती. पण एक-दोन चेंडू खेळल्यानंतर मला जाणवले की खेळपट्टीवरून गोलंदाजांना फारशी मदत मिळत नाहीये, म्हणून मी माझ्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला.'

फलंदाजी करताना मनात....


फलंदाजी करताना मनात काय चालते होतं? या प्रश्नावर वैभव सूर्यवंशी म्हणाला की, 'माझ्या मनात काही विशिष्ट विचार नव्हता. एकच विचार होता की जर खेळपट्टी गोलंदाजांना मदत करत असेल, तर मी वेळ घेऊन मोठी खेळी खेळेन. पण सुदैवाने तसे झाले नाही. खेळपट्टी चांगली होती, चेंडू बॅटवर चांगला येत होता, त्यामुळे मी माझ्या खेळावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न केला.' सामन्यात उतरतानाच्या मानसिकतेबद्दल वैभव सूर्यवंशीने सांगितलं की, 'काही वेगळे नाही, सर. शेवटपर्यंत फलंदाजी करण्याचा तोच दृष्टिकोन होता. जर सामना सुरुवातीला माझ्या नियंत्रणात नसेल, तर मी वेळ घेण्याचा विचार करायचो. पण सुदैवाने, मी लवकरच नियंत्रण मिळवू शकलो आणि मग मी माझ्या अटींवर खेळ खेळलो.'





थोडं दडपण जाणवतं...


प्रशिक्षकांच्या सल्ल्याबद्दल आणि सूचनांबद्दल वैभव सूर्यवंशी म्हणाला की, 'हृषी सर मला प्रत्येक सामन्यापूर्वी एकच गोष्ट सांगत असतात. ते अंडर-19 पासून हेच ​​सांगत आहेत. ते मला सांगतात की, जर मी चेंडूवर नीट लक्ष ठेवलं, तर सामना माझ्यासाठी सोपा होईल.' तुम्हाला युएईविरुद्ध फलंदाजी करायला मजा येते का? या प्रश्नावर वैभव सूर्यवंशी म्हणाला की, 'खूप छान वाटतं. माझा खेळातला लय परत आला आहे, त्यामुळे स्पर्धेतील उर्वरित सामन्यांमध्येही मी हाच लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करेन. आशा आहे की, आम्ही उपांत्य फेरी जिंकून अंतिम फेरीत पोहोचू आणि मी त्याच लयीत आणि माझ्या स्वतःच्या शैलीत खेळत राहू शकेन.' फलंदाजी करताना तुम्हाला कधी दडपण जाणवतं का? या प्रश्नावर वैभव म्हणाला की, 'नक्कीच, सर. नेहमीच. थोडं दडपण जाणवतं. हे सामान्य आहे, थोडी धाकधूक वाटणं हा मानवी स्वभाव आहे. पण दोन-चार चेंडूंनंतर मी शांत होतो आणि पुन्हा सामान्य होतो.'
Comments
Add Comment

द्विशतक, षटकार आणि बरंच काही..! आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत वैभव सूर्यवंशीकडू विक्रमाचा पाऊस

[caption id="attachment_1078717" align="aligncenter" width="800"] आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत वैभव सूर्यवंशीच्या वादळापुढे युएईने गुडघे टेकले.

Asia Cup Rising Stars 2026 : UAE वर भारताचा मोठा विजय; वैभव सूर्यवंशीच्या द्विशतकी खेळीने उपांत्य फेरी निश्चित

युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या स्फोटक द्विशतकी खेळीच्या जोरावर भारत 'अ' संघाने एसीसी पुरुष आशिया कप रायझिंग

ऐतिहासिक द्विशतक! वनडे क्रिकेटमध्ये वेगवान 200 धावा करणारा वैभव सूर्यवंशी पहिलाच भारतीय

क्रिकेटच्या मैदानावर आज इतिहास घडला आहे! अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने आपल्या आक्रमक फलंदाजीने

6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6...! वैभव सूर्यवंशीने अवघ्या 28 चेंडूत ठोकलं शतक, असा नोंदवला विक्रम

आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत भारताचा स्टार युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याची बॅट काही चालली नव्हती. नेपाळ

कसोटीत प्रतिस्पर्ध्यांना 100 धावांच्या आत सर्वाधिक वेळा ऑल-आऊट करण्याचा विश्वविक्रम कोणाच्या नावावर? जाणून घ्या

[caption id="attachment_1078646" align="aligncenter" width="800"] क्रिकेट इतिहासात अनेक विक्रम रचले आणि मोडले गेलेत. त्यामुळे प्रत्येक विक्रमाची चर्चा

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर शुभमन गिलने ठेवलेला प्रस्ताव आयसीसीने फेटाळला, असं कारण दिलं की...

भारत न्यूझीलंड कसोटी मालिका सुरू असून पहिला सामना अनिर्णित ठरला. पहिल्या सामन्यात भारताने 720 धावांचा डोंगर रचला