Nita Ambani : नीता अंबानी पुन्हा एकदा बनल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्या!

रिलायन्स फाऊंडेशनने दिली अधिकृत माहिती 


पॅरिस : नुकतंच मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) याचा शाही विवाहसोहळा पार पडला. राधिका मर्चंटसह (Radhika Merchant) तो लग्नबंधनात अडकला. हा लग्नसोहळा देशभरातच नव्हे तर विदेशातही प्रचंड चर्चेचा विषय ठरला होता. यानंतर आता नीता अंबानी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (International Olympic Committee) त्यांना पुन्हा एकदा सदस्या बनण्याचा बहुमान दिला आहे. रिलायन्स फाऊंडेशनने (Reliance Foundation) समाजमाध्यमावर अधिकृतपणे तशी माहिती दिली आहे.


सध्या जगभरात पॅरिसमधील ऑलिम्पिक स्पर्धेची चर्चा आहे. या स्पर्धेत भारत कशी कामगिरी करणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर नीता अंबानी यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) सदस्य म्हणून पुन्हा एकदा निवड झाली आहे. रिलायन्स फाऊंडेशनने आपल्या समाजमाध्यम खात्यावर या निवडीची अधिकृत घोषणा केली आहे. नीता अंबानी या रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा आहेत.



काय म्हणाल्या नीता अंबानी?


"आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवर पुन्हा एकदा निवड झाल्यामुळे मला फार सन्मानित झाल्यासारखं वाटत आहे. राष्ट्रपती थॉमस बाक आणि आयओसीच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. या आनंदाच्या आणि अभिमानाच्या क्षणाला भारतीय नागरिकांसोबत शेअर करायचे आहे. भारत तसेच जगभरात ऑलिम्पिकचा आणखी प्रचार आणि ऑलिम्पिकच्या मजबुतीकरणाच्या प्रयत्नांना कायम ठेवण्यासाठी मी तत्पर आहे," अशा भावना नीता अंबानी यांनी व्यक्त केल्या आहेत.



याआधी २०१६ साली झाली होती निवड


नीता अंबानी यांची सर्वप्रथम २०१६ साली रिओ येथील ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान आयओसीच्या सदस्य म्हणून निवड करण्यात आली होती. त्यानंतर आता आठ वर्षांनंतर पुन्हा एकदा या समितीच्या सदस्य होण्याचा सन्मान नीता अंबानी यांना मिळाला आहे. भारताकडून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्य होण्यासाठी त्यांना सर्व ९३ मतदारांनी पाठिंबा दिला.



क्रीडा क्षेत्रात मोठी गुंतवणूक


नीता अंबानी या आयपीएलमधील सर्वाधिक प्रसिद्ध संघांपैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्स या संघाच्या मालकीण आहेत. त्या फुटबॉल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट लिमिटेडच्या संस्थापक आणि अध्यक्षा आहेत. या संस्थेकडून इंडियन सुपर लीगचे (ISL) आयोजन केले जाते. मुंबई इंडियन्स या संघासह त्या मुंबई एमआय केप टाउन (२०२२), एमआय अमिरात (२०२२) आणि मुंबई इंडियन्स महिला संघाच्या (२०२३) सह-मालकीण आहेत.

Comments
Add Comment

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.

Nepal Floods : नेपाळच्या महापुरात बँक बुडाली, पण आत सापडला कोट्यवधींचा खजिना; ५० कोटींचे सोने, रोकड आणि चांदी सुरक्षित बाहेर

काठमांडू : नेपाळमध्ये भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला आहे. पूर आणि

PM Modi SCO Summit : बिश्केकमध्ये पंतप्रधान मोदींची पुतीन, पेझेश्कियन यांच्याशी भेट; वर्ल्ड नोमॅड गेम्सच्या उद्घाटन सोहळ्यालाही उपस्थिती

बिश्केक : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या किर्गिस्तानच्या दौऱ्यावर असून, बिश्केक येथे होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन

US Iran Conflict : अमेरिकेच्या हल्ल्याला इराणचा पलटवार; जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला, होर्मुजमध्ये तणाव वाढला

तेहरान : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा एकदा चिघळला आहे. अमेरिकेने इराणच्या लारक बेटावरील दोन रॉकेट

North Cyprus Ferry Accident : मोठी बातमी! २७० प्रवाशांना घेऊन जाणारी फेरी बोट उलटली; १०० हून अधिक जणांची सुटका, बचावकार्य सुरू

उत्तर सायप्रस : उत्तर सायप्रसच्या किनाऱ्याजवळ आज दुपारी मोठी दुर्घटना घडली. २७० प्रवाशांना घेऊन जाणारी प्रवासी