ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेला एक कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर

शाब्बास स्वप्नील… तुझ्या कांस्य पदकामुळे महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर पसरले हास्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


मुंबई : शाब्बास स्वप्नील… तुझ्या कांस्य पदकामुळे महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर हास्य पसरले आहे. तुझी कामगिरी महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. तू आमचा अभिमान आहेस, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमबाज स्वप्नील कुसाळेचे अभिनंदन केले. तसेच या कामगिरीसाठी स्वप्नीलला एक कोटी रुपयांचे पारितोषिक दिले जाईल, असे जाहीर केले.


मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पॅरीसमध्ये असलेल्या ऑलिंपिकवीर स्वप्नीलशी तसेच त्याच्या प्रशिक्षक दिपाली देशपांडे, विश्वजीत शिंदे यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संपर्क साधला.


मुख्यंमत्री श्री. शिंदे म्हणाले, स्वप्नीलचे रौप्य पदक अवघ्या ०.१ गुणांनी हुकले आहे. तरीही त्याने कांस्य पदक पटकावल्याने महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. महाराष्ट्राला वैयक्तिक कामगिरीसाठी ७२ वर्षांनी पदक मिळाले आहे. या कामगिरीसाठी स्वप्नीलला एक कोटी रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. त्याचा आणि त्याचे प्रशिक्षक, आई-वडील यांचा यथोचित सत्कारही केला जाईल. याशिवाय स्वप्नीलला नेमबाजीतील पुढील तयारीसाठी आवश्यक, त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. स्वप्नीलने आपल्या कामगिरीने इतिहास रचला आहे. या यशासाठी कुसाळे कुटुंबियांसह, त्याला मार्गदर्शन करणारे, प्रशिक्षक आदींची मेहनत महत्वाची ठरली आहे.


स्वप्नील कुसळे याने ऑलम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांच्यानंतर पहिले पदक मिळवले आहे. स्वप्नील कुसळे यांचे अभिनंदन करतो. देशाचा मान त्यांनी वाढवला त्यासाठी त्यांचे अभिनंदन करतो. - उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस


... म्हाया नातवानं करुन दावलं!


नातवानं ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर स्वप्नीलच्या आज्जीच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. आज्जीचे डोळे आंनदाश्रूंनी भरले होते. "लय चांगलं झालं... म्हाया नातवानं करुन दावलं, माझा नातू लय मोठ्ठा झाला... आमचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी हाय... लहानाचा मोठ्ठा झालाय, लहानपणापासून बाहेर गेलाय, लय चांगलं झालं, असे स्वप्नीलची आज्जी म्हणाली.


दरम्यान, पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीमध्येच सराव करताना नेमबाजीचा चांगला पाया घातला गेला. माझ्या यशात कुटुंबियांसह, आईच्या मायेने प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षक श्रीमती देशपांडे, श्री. शिंदे यांचा मोलाचा वाटा आहे, असे ऑलिंपिकवीर स्वप्नील म्हणाला.

Comments
Add Comment

संविधान दिनी राज्यातील 11 गड-किल्ल्यांवर स्वच्छता अभियान! रायगडावर 'गडांचा मान, संविधानाचा सन्मान'

रायगड : भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्यांची जाणीव आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा जतन

Uday Samant : ‘गाव तिथे उद्योजक’ योजना धाराशिवमधून सुरू होणार; नवउद्योजकांना 1 कोटीपर्यंत अर्थसहाय्य

धाराशिव : राज्यातील ग्रामीण भागात उद्योजकतेला चालना देण्यासाठी उद्योग विभागाच्या माध्यमातून ‘गाव तिथे

FDA Action : पुण्यातील इंडुकेअर फार्मास्युटिकलचे उत्पादन परवाने पुन्हा रद्द; परवानगीशिवाय 9 औषधांची निर्मिती केल्याचे उघड

पुणे : पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथील इंडुकेअर फार्मास्युटिकल अँड रिसर्च फाउंडेशन या कंपनीवर अन्न व औषध

Philately quiz : 'विकास आणि वारसा' थीमवर रंगली फिलाटेली प्रश्नमंजुषा; विदर्भातील २० संघांचा सहभाग, विजेता संघ परिमंडळ स्तरावर झळकणार

नागपूर : तरुण पिढीमध्ये टपाल तिकीट संग्रहाची (फिलाटेली) गोडी निर्माण व्हावी आणि या माध्यमातून देशाचा गौरवशाली

Shivaji University Recruitment 2026 : शिवाजी विद्यापीठात नोकरीची संधी! शिववाणी कम्युनिटी रेडिओसाठी थेट मुलाखती

कोल्हापूर: कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. विद्यापीठाच्या ‘पद्मश्री ग. गो.

Railway News : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! नगरसोल-तारूर मार्गावर 16 दिवसांचा ब्लॉक; अनेक गाड्या रद्द