Olympics 2024 : कोल्हापूरच्या पठ्ठ्याने जग जिंकले!

५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात पटकावले कांस्य


भारताला मिळाले तिसरे ऑलिम्पिक पदक


पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत तीन पदके जिंकली आहेत. स्टार नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंगनंतर पॅरिस ऑलिम्पिक २०२४च्या सहाव्या दिवशी कोल्हापुरच्या मराठमोळ्या स्वप्नील कुसाळे याने ५० मीटर रायफल ३ पोझिशन नेमबाजीत भारताला आणखी एक कांस्यपदक जिंकून दिले आहे.


१९९५ मध्ये महाराष्ट्रातल्या कोल्हापुर येथे जन्मलेला स्वप्नील कुसळेने पॅरिस ऑलिम्पिक २०२४च्या ५० मीटर रायफल ३ पोझिशनमध्ये ४५१.४ गुण नोंदवून इतिहास रचला. तसेच खाशाबा जाधवांच्यानंतर स्वप्नील कुसळेने महाराष्ट्राला दुसरे ऑलिम्पिक पदक जिंकून दिले आहे.





भारतीय नेमबाज स्वप्नील कुसळेने मंगळवारी झालेल्या क्वालिफायर फेरीत ५० मीटर रायफल ३ पोझिशन नेमबाजीत एकूण ५९० गुण मिळवून फायनलमध्ये धडक मारली होती. त्याने गुडघ्यावर बसून १९८, झोपून १९७ आणि नंतर उभे राहून १९५ गुण मिळवले. याच स्पर्धेत आणखी एका भारतीय ऐश्वर्या प्रताप सिंगची एकूण धावसंख्या ५८९ होती.


तो खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू ठरला आहे. ऑलिम्पिकच्या आतापर्यंतच्या इतिहासात वैयक्तिक पदक मिळवणारे मराठमोळे खेळाडू म्हणून केवळ खाशाबा जाधव यांना यश आले होते. हेलसिंकी १९५२ सालच्या ऑलिम्पिकमध्ये खाशाबा यांनी कुस्तीत ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले होते. आता असाच पराक्रम करून दुसरा मराठमोळा खेळाडू स्वप्नील बनला आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही खेळाडू कोल्हापूरचे असून, ऑलिम्पिकमधील या विशेष योगायोगची चर्चा सुरु आहे.


दरम्यान, ऑलिम्पिक स्पर्धेत ५० मीटर थ्री पोझिशन प्रकारात अंतिम फेरी गाठणाऱ्या कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळे एखाद्या नेमबाजाला नाही, तर भारताचा माजी क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंह धोनीला आपला आदर्श मानतो. धोनीच्या मैदानातील शांत आणि संयमी स्वभाव शैलीचा आपल्यावर कमालीचा प्रभाव असल्याचे स्वप्नीलने आपल्या पात्रता फेरीच्या कामगिरीनंतर सांगितले. योगायोग म्हणजे स्वप्नील धोनीप्रमाणे रेल्वेत तिकीट तपासनीस म्हणून नोकरी करतो.


‘‘मला रेंजवर शांत आणि संयमी राहायला आवडते. मी फारसा बोलत नाही. अचूक नेमबाजीसाठी शांत आणि संयम या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळेच मी धोनीचा प्रचंड चाहता आहे. क्रिकेटच्या मैदानावर सामना सुरू असताना कितीही मोठे दडपण असले, तरी धोनीचा संयम सुटलेला कधीही पाहिला नाही. मलाही असेच राहणे आवडते,’’ असेही स्वप्निल म्हणाला.

Comments
Add Comment

IPL 2027: पारस म्हाम्ब्रे पंजाब किंग्सचे गोलंदाजी प्रशिक्षक होणार! मिनी लिलावापूर्वी घडामोडींना वेग

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पंजाब किंग्स फ्रेंचायझी सुरूवातीपासून खेळत आहे. मात्र मागच्या 19 पर्वात पंजाब

अहिल्यानगरमध्ये कुस्तीचा थरार! 191 कुस्तीपटूंची जिल्हास्तरीय निवड चाचणी

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने भिस्तबाग, पवननगर येथील संभाजी महाराज कुस्ती

काही वेगळे नाही...! झंझावाती द्विशतकी खेळीनंतर वैभव सूर्यवंशीने अशा भावना मांडल्या

आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत भारत आणि युएई यांच्यात लढत झाली. या सामन्यात नाणेफेकीचा कौल युएईने जिंकला

द्विशतक, षटकार आणि बरंच काही..! आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत वैभव सूर्यवंशीकडू विक्रमाचा पाऊस

[caption id="attachment_1078717" align="aligncenter" width="800"] आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत वैभव सूर्यवंशीच्या वादळापुढे युएईने गुडघे टेकले.

Asia Cup Rising Stars 2026 : UAE वर भारताचा मोठा विजय; वैभव सूर्यवंशीच्या द्विशतकी खेळीने उपांत्य फेरी निश्चित

युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या स्फोटक द्विशतकी खेळीच्या जोरावर भारत 'अ' संघाने एसीसी पुरुष आशिया कप रायझिंग

ऐतिहासिक द्विशतक! वनडे क्रिकेटमध्ये वेगवान 200 धावा करणारा वैभव सूर्यवंशी पहिलाच भारतीय

क्रिकेटच्या मैदानावर आज इतिहास घडला आहे! अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने आपल्या आक्रमक फलंदाजीने