११ मंदिरांमध्ये चोरी करणारा चोर, सीसीटीव्हीमुळे सापडला

पुणे : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, शिरुर, रांजणगाव, खेड परिसरातील मंदिरात चोरी करणाऱ्या चोरट्याला ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. चोरट्याने ग्रामीण भागातील ११ मंदिरात चोरी केल्याचे उघड झाले असून, त्याच्याकडून चार लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.


विनायक दामू जिते (रा. कान्हूर मेसाई ता. शिरुर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. आंबेगाव, शिरूर, शिक्रापुर, रांजणगाव, खेड भागातील मंदिरातून रोकड चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. पोलिसांनी मंदिरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले होते. सराईत चोरटा जितेने चोरी केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, अमोल वडेकर, संजय साळवे, मंगेश अभंग यांना तपासात मिळाली. तो शिक्रापूर परिसरात येणार असल्याची महिती मिळाली. त्यानंतर सापळा लावून त्याला पकडले, अशी माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे यावेळी उपस्थित होते.


जितेने ग्रामीण भागातील वेगवेगळ्या मंदिरात चोरी केल्याचे तपासात उघड झाल आहे. जिते सराइत चोरटा आहे. मंदिरात रात्रीच्या वेळी भाविकांची वर्दळ कमी असते. हीच संधी साधून जितेने मध्यरात्री गुन्हे केले. त्याच्याकडून एक लाख ६३ हजारांचे दागिने, एक लाख १७ हजारांचे चांदीचे मुखवटे, ८० हजारांचे पूजासाहित्य जप्त करण्यात आले.

Comments
Add Comment

संविधान दिनी राज्यातील 11 गड-किल्ल्यांवर स्वच्छता अभियान! रायगडावर 'गडांचा मान, संविधानाचा सन्मान'

रायगड : भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्यांची जाणीव आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा जतन

Uday Samant : ‘गाव तिथे उद्योजक’ योजना धाराशिवमधून सुरू होणार; नवउद्योजकांना 1 कोटीपर्यंत अर्थसहाय्य

धाराशिव : राज्यातील ग्रामीण भागात उद्योजकतेला चालना देण्यासाठी उद्योग विभागाच्या माध्यमातून ‘गाव तिथे

FDA Action : पुण्यातील इंडुकेअर फार्मास्युटिकलचे उत्पादन परवाने पुन्हा रद्द; परवानगीशिवाय 9 औषधांची निर्मिती केल्याचे उघड

पुणे : पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथील इंडुकेअर फार्मास्युटिकल अँड रिसर्च फाउंडेशन या कंपनीवर अन्न व औषध

Philately quiz : 'विकास आणि वारसा' थीमवर रंगली फिलाटेली प्रश्नमंजुषा; विदर्भातील २० संघांचा सहभाग, विजेता संघ परिमंडळ स्तरावर झळकणार

नागपूर : तरुण पिढीमध्ये टपाल तिकीट संग्रहाची (फिलाटेली) गोडी निर्माण व्हावी आणि या माध्यमातून देशाचा गौरवशाली

Shivaji University Recruitment 2026 : शिवाजी विद्यापीठात नोकरीची संधी! शिववाणी कम्युनिटी रेडिओसाठी थेट मुलाखती

कोल्हापूर: कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. विद्यापीठाच्या ‘पद्मश्री ग. गो.

Railway News : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! नगरसोल-तारूर मार्गावर 16 दिवसांचा ब्लॉक; अनेक गाड्या रद्द