Vinesh Phogat : स्पर्धेत अपात्र पण भारतीयांच्या मनात अढळ स्थान; हरियाणा सरकार करणार विनेशचा खास सन्मान!

पदक विजेत्याप्रमाणे स्वागत आणि सत्कार होणार


चंदीगढ : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत (Paris Olympics 2024) अंतिम फेरीत पोहोचूनही सामन्याच्या दिवशी ५० किलोहून १०० ग्रॅम वजन अधिक आढळल्याने भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) अपात्र ठरली. रौप्यपदक निश्चित झाल्यानंतरही अशा प्रकारे झालेली निराशा भारतीयांच्या चांगलीच जिव्हारी लागली. यामुळे धक्का बसलेल्या विनेशने कुस्तीतून तिची निवृत्ती जाहीर केली. असं असलं तरी विनेशने आतापर्यंत न खचता केलेल्या प्रयत्नांमुळे भारतीयांच्या नजरेत तिचं स्थान उंचावलं आहे. मूळची हरियाणाची (Haryana)असलेल्या विनेशसाठी हरियाणा सरकारनेही तिच्या मेहनतीची जाण ठेवून तिचा खास सन्मान करण्याचं ठरवलं आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी एक्स पोस्टद्वारे विनेशचं कौतुक करत तिला १.५ कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.


हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी एक्स पोस्टमध्ये असं लिहिलं आहे की, 'हरियाणाची आमची शूर मुलगी विनेश फोगाटने ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. काही कारणांमुळे ती कदाचित ऑलिम्पिक फायनल खेळू शकली नसली तरी देखील ती आपल्या सर्वांसाठी चॅम्पियन आहे. आमच्या सरकारने ठरवले आहे की विनेश फोगाटचे पदक विजेत्याप्रमाणे स्वागत आणि सत्कार करण्यात येईल.'


'हरियाणा सरकार ऑलिम्पिक सिल्वर मेडल विजेत्याला जे सर्व सन्मान, बक्षिसे आणि सुविधा देतात. ते विनेश फोगाटच्या कृतज्ञतेसाठी दिले जाईल.', असे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हरियाणामध्ये सिल्वर मेडल जिंकण्यासाठी सरकार १.५ कोटी रुपयांचे बक्षीस देते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे आता विनेश फोगाटला १.५ कोटींचे बक्षीस मिळणार आहे.

Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा