Single Screen Cinema Hall : सिंगल स्क्रीन सिनेमा गृह बंद होण्याच्या मार्गावर!

डोंबिवली : एकेकाळी फर्स्ट डे फर्स्ट पाहण्यासाठी सकाळपासून तिकीट खिडकीबाहेर रांगा लागायच्या. अमुक एका चित्रपटाचे (Movie Theater) पहिले तिकीट खरेदी कले की अभिमानाने मिरवत आसत. पण आता गेल्या तीन चार वर्षांपासून एकदाही सिनेमागृह (Cinema Hall) गेलो नाही. हे दुर्दैवाने अभिमानाने सांगितले जात आहे.


सिनेमागृहे मल्टीप्लेक्स मध्ये झाल्यांने सिंगल स्क्रीन सिनेमा गृह एकापाठोपाठ बंद होत चालली आहेत. याविषयी बोलताना चित्रपटगृहांचे व्यावस्थापक आशिष ठक्कर जड अंतःकरणाने म्हणाले, पुर्वी सिंगल स्क्रीन थिएटर सुमारे एक हजार आसन क्षमतेची होती. एकढी मोठी आसन क्षमतेची थिएटर यापुढे चालवणे जिकीरीचे आहे. कारण मिल्टीप्लेक्समध्ये चित्रपटगृहामुळे तसेच आसन क्षमतेने टॉकीज होऊ लागली. कोरोनानंतर सिनेप्रेक्षक थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघण्याचे प्रमाण फारच कमी झालेले आहे. तसेच सिंगल स्क्रीन चित्रपटाचे तिकीटाचे दर ही प्रमाणात बाहेर वाढले हे एक कारण आहे. अशी सिंगल स्क्रीन थिएटर मालकांनची तक्रार आहे. तसेच आठवडाभर सगळे दिवस पिक्चर चालला नाही तर त्याचा मोठा तोटा सहन करावा लागतो. पाच स्क्रीन आसले तरी शो लावणे परवडत नाही हे दुर्दैव आहे. मल्टिप्लेक्स आले तेंव्हापासून सिंगल स्क्रीन व्यावसायिकांचा संघर्ष सुरू झाला आहे. त्यात कोरोना सारख्या महामारीमुळे व्यावसायावर परिणाम झाला आहे असे थिएटर मालकांनाचे म्हणणें आहे.



आता हाऊसफुल्ल अशक्य


एकेकाळी तिकीट मिळत नसायची फर्स्ट डे फर्स्ट शो बघणारे रद्दी होते.आतातर वर्षानवर्षे न येणारे नागरिक आहेत.काळानुसार बदल होणे अपेक्षित असले तरी सिंगल स्क्रीनबाबत होत्याचे नव्हते झाले,असे सिनेमा गृह मधील कर्मचारी म्हणतात. तसेच पूर्वी टीव्ही छोटे होते आणि टॉकीज मधील स्क्रीन मोठी होती. आता घरोघरी मोठे टीव्ही आलेत व होम थिएटर संकल्पना आली. त्यानंतर मोबाईलवर सर्व प्रकारची करमणूक उपलब्ध झाली. या सर्व कारणांमुळे टॉकीज मधील दिवसेंदिवस गर्दी कमी झाली आहे, असे आशिष ठक्कर सिनेमा थिएटर व्यावसायिक यांनी म्हटले.

Comments

prashant bhanage    May 23, 2025 10:58 AM

सिंगल स्क्रीन बंद पडण्यामागे आपण म्हटल्या प्रमाणे इंटरनेट होम थिएटर हे जसे काराणीभूत आहेत तसेच सिनेमा वितरक सुध्दा पुर्वी फिक्स रेंट वर सिनेमा मिळायचा आता वितरक टक्के वारी वर सिनेमा देतात 60% वितरक घेऊन जातात किंवा भाडे तत्वावर सिनेमागृह मालकास एक तूट पुंज रक्कम देतात त्यावर सिनेमागृह चालवण्यास परवडत नाही त्यामुळे सिनेमा व्यवसाय तोट्यात गेला असून त्यामुळे सिंगल स्क्रीन बंद पडत आहे

Add Comment

दुष्काळी भागात ताकदीने काम करा; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे नगराध्यक्षांना निर्देश

राज्यातील दुष्काळाची दाहकता पाहता दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जोमाने काम करा, असे निर्देश

PM SVANidhi Awards 2026 : पीएम स्वनिधी पुरस्कार 2026 मध्ये महाराष्ट्राची बाजी; राज्याला 5 पुरस्कार, कर्जवितरणात देशात प्रथम क्रमांक

Maharashtra News: पथविक्रेत्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांना संस्थात्मक कर्जसुविधा उपलब्ध करून

Central Railway : महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे 15 अनारक्षित विशेष गाड्या चालवणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत दादरच्या चैत्यभूमीवर येणाऱ्या लाखो

Chandrashekhar Bawankule : राज्यात 9 नवीन अपर तहसीलदार कार्यालये सुरु होणार; नागपूर, गडचिरोलीसह 6 जिल्ह्यांना लाभ

मुंबई : राज्यातील नागरिकांची महसूलविषयक कामांसाठी होणारी धावपळ कमी करण्याच्या उद्देशाने 9 नवीन अपर तहसीलदार

शेतकऱ्यांची एक इंचही जमीन सरकार घेणार नाही; कुळ कायद्याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण

राज्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी कुळ कायद्यांतर्गत शासनाच्या व्यवस्थापनाखाली जाणार नाहीत. स्वतःची

लोकप्रतिनिधींच्या कामाचा दस्तऐवज समाजासाठी दिशादर्शक ठरेल -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विधानपरिषदेतील कामकाज आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सभागृहात केलेल्या संघर्षाचा लेखाजोखा मांडणाऱ्या डॉ. नीलम