किल्ला सुरक्षेसाठी आंदोलनाला बसलेल्या गडप्रेमींना पोलिसांची नोटीस

भाईंदर : मीरा भाईंदर शहरातील ऐतिहासिक घोडबंदर किल्यावर सुरक्षा रक्षक नसल्यामुळे वाढलेल्या असामाजिक लोकांच्या वावरामुळे किल्ल्याचे पावित्र्य धोक्यात आले आहे. यासाठी आंदोलनाला बसलेल्या गडप्रेमींना पोलिसांनी नोटीस बजावल्याने अनेक सामाजिक संस्था, राजकीय नेते, पत्रकार यांनी गडप्रेमींना पाठिंबा दर्शवत आंदोलनाच्या ठिकाणी एकच गर्दी केली आहे.


मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात असलेला घोडबंदर किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद स्पर्शाने पावन झालेला किल्ला असल्याची नोंद इतिहासात आहे. पुरातत्व विभागाने सुरक्षा आणि संवर्धन करण्यासाठी हा किल्ला महापालिकेकडे सोपवला आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेला हा किल्ला महापालिकाकडे आल्यावर प्रशासनाने त्याची सुरक्षा देखभाल करण्यासाठी सुरक्षा रक्षक तैनात करणे तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक होते. परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे किल्ल्यावर असामाजिक लोकांचा वावर वाढला आहे.


किल्ल्यावर मद्यपानाच्या बाटल्या, नशेच्या बाटल्यांचा खच पडू लागला आहे. त्यामुळे किल्ला जतन समितीच्या वतीने रोहित सुवर्णा आणि समिती सदस्यांनी महापालिका आयुक्त संजय काटकर यांची भेट घेऊन त्यांना किल्यावर सुरक्षा रक्षक नेमणे आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबतचे निवेदन दिले होते. परंतु गड- प्रेमींची मागणी पुर्ण करण्यास आयुक्तांनी असमर्थता दर्शविली. त्यामुळे गडप्रेमींनी सोमवारपासून भाईंदर पश्चिम येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते.


मंगळवारी सकाळी भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६८ प्रमाणे गडप्रेमी आंदोलकांना नोटीस बजावली आहे. सदर बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि गडप्रेमींना पाठिंबा दर्शविण्यासाठी अनेक सामाजिक संस्था, राजकीय नेते, पत्रकार यांनी आंदोलनाच्या ठिकाणी एकच गर्दी केली आहे.

Comments
Add Comment

गवळी, गोल्लार, वडार आणि चर्मकार समाजाच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; हिवाळी अधिवेशनात मार्ग काढणार

मुंबई: विधान भवन येथे सोमवारी राज्यातील विविध समाजांचे प्रश्न आणि प्रलंबित मागण्या जाणून घेण्यासाठी विधान

Pratap Movie: 'स्वतःची ओळख कधीही गमावू नका'; ईशा देओलचा तरुणांना संदेश

मुंबई: आगामी 'प्रताप' चित्रपटाच्या प्रोमोशन निमित्ताने अभिनेत्री ईशा देओल, अभिनेता अमित साध आणि चित्रपट

अमृता खानविलकरच्या 'अमूल्य'ची बॉलिवूडमध्ये चर्चा; माधुरी, श्रद्धाही मराठमोळ्या साजात!

[caption id="attachment_1078242" align="alignnone" width="800"] बॉलिवूडच्या तारकांनाही मराठमोळ्या साजाची भुरळ; अमृताच्या नऊवारी साड्यांची चर्चा

महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय चित्रपट सहनिर्मितीसाठी स्वतंत्र यंत्रणा; कमी बजेटच्या सिनेमांसाठीही नवा प्लॅन

गोवा: गोवा येथे 57 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरु आहे. या चित्रपट महोत्सवात अनेक कार्यक्रमांची

Avinash Mishra-Eisha Singh: 'पुरावे सार्वजनिक करण्याची वेळ आणू नका'; ईशा सिंहचा सोशल मीडियावरून इशारा

Avinash Mishra-Eisha Singh: टीव्ही अभिनेत्री अभिनेत्री ईशा सिंह आणि खतरो के खिलाडी विजेता अविनाश मिश्रा यांच्या नात्यात दुरावा

Rakesh Bedi: 'एक दुजे के लिए'च्या यशाची आठवण; राकेश बेदी म्हणाले, 'धुरंधर'पेक्षा मोठा हिट होता

Rakesh Bedi: बॉलिवूड अभिनेता राकेश बेदी यांचा 'धुरंधर' आणि 'धुरंधर द रिव्हेंज'मधील जमील जमाली ही भूमिका प्रेक्षकांना खूप