‘गोमूत्र’ म्हणजे अंतःकरण शुद्धी

श्री स्वामी समर्थांनी अंतःकरण शुद्धीला ‘गोमूत्र’ म्हटले आहे. शरीरातील टाकाऊ विषारी द्रव्ये जशी मूत्ररूपाने बाहेर टाकली जातात, तसेच आपल्या इंद्रियांना पडलेले कुवळण, निर्माण झालेले दोषही प्रयत्नपूर्वक काढून टाकावयाचे असतात. या प्रक्रियेला ‘गोमूत्र’ म्हणावयाचे, असा गूढ अर्थ येथे आहे. म्हणून श्री स्वामी समर्थांनी मूळव्याधीवर अर्थपूर्ण आणि बोधप्रद असा उपाय येथे सांगितला आहे. ‘गोमूत्र ध्यावे म्हणजे व्याधी जाईल.’


समर्थ कृपा - विलास खानोलकर


नारायण परशुराम सोलापूरकर हे व्यवसायाने वकील होते. श्री स्वामी समर्थ त्यास ‘गणपती’ म्हणून हाका मारीत. श्री स्वामी समर्थ चरणी त्यांची निष्ठा होती. त्यांना ‘मूळव्याधीचा’ आजार झाला. पुष्कळ वैद्य-डॉक्टर झाले; पण गुण येईना. एकदा नाइलाजास्तव त्यांनी डॉक्टरांकडून मूळव्याधीचे मोड कापले. त्यामुळे रक्तस्राव होऊ लागला. या दुखण्याने ते पूर्वीपेक्षाही अधिक बेजार झाले. दिवसेंदिवस त्यास जास्त अशक्तपणा येऊ लागला. घरातल्या घरातही त्यांना फिरवेना.
तेव्हा त्यांनी ही सर्व हकिकत अक्कलकोट येथे असलेल्या मोरोपंत सेवेकऱ्यास लिहून कळविली. त्यास श्री स्वामी समर्थ महाराजांस त्यावर औषध विचारावे, असेही लिहिले. त्याप्रमाणे मोरोपंतांनी श्री स्वामींस विचारले असता ‘गोमूत्र घ्यावे म्हणजे व्याधी जाईल’ असे सांगितले. त्याप्रमाणे नारायणरावांनी उपचार करताच ते निखालस बरे झाले.


या लीलाकथेतील नारायण सोलापूरकर हे तुमच्या आमच्यासारखे सामान्य मनुष्य आहेत. व्यवसायाने ते वकील आहेत. व्यवसायाचा भाग म्हणून ते युक्त्या-प्रयुक्त्या करणारच. पण, श्री स्वामींप्रती त्यांची निष्ठा होती, हे निश्चित. या लीलेतून खोलवर बोध घेण्याचा अथवा शोधण्याचा प्रयत्न केल्यास, पेशाने वकील असलेल्या नारायणरावांचा युक्ती-प्रयुक्तीने येणारा पैसा ‘सदोष’ असणार, असा अतिरिक्त सदोष पैसा अनेकदा सुख-समाधान-शांती नाहीशी करतो, हिरावून घेतो. हीच नारायणराव वकिलाची ‘मूळव्याधी’ म्हणता येईल. श्री स्वामी महाराज त्यास ‘गणपती’ म्हणून हाक मारीत, गणपती ही बुद्धीची देवता असल्याचे सर्वमान्य आहे; परंतु पेशाने वकील बुद्धी करामत कसरत करून मिळविलेला अतिरिक्त पैसा त्यामुळे त्यांचे सारेच बिघडलेले.


श्री स्वामी समर्थांनी अंतःकरण शुद्धीला ‘गोमूत्र’ म्हटले आहे. शरीरातील टाकाऊ विषारी द्रव्ये जशी बाहेर टाकली जातात, तसेच आपल्या इंद्रियांना पडलेले कुवळण, निर्माण झालेले दोषही प्रयत्नपूर्वक काढून टाकावयाचे असतात. या प्रक्रियेला ‘गोमूत्र’ म्हणावयाचे, असा गूढ अर्थ येथे आहे. म्हणून श्री स्वामी समर्थांनी मूळव्याधीवर अर्थपूर्ण आणि बोधप्रद असा उपाय येथे सांगितला आहे. ‘गोमूत्र ध्यावे म्हणजे व्याधी जाईल.’


‘शारीरिक रोग’ बरा करण्यापेक्षाही वृत्ती प्रवृत्तीतल्या व्याधी बऱ्या करणे केव्हाही चांगले. ते केले म्हणजे व्याधी जातील. ते स्वामी सेवेतून, स्वामी कृपेने आपोआप होत असते. काया-वाचा-मनाची शुद्धी, आचार-विचारांची शुद्धी, निर्मोही निर्लेप मन आणि काम-क्रोध-लोभ-मोह-मत्सर-माया या षड्रिपू विरहित अवस्थेनेच मूळव्याधी निखालस बरी होते. मानसिक स्वास्थ्य लाभते, तदनंतर नारायण वकील स्वामी भक्तीने सुखी झाले.


vilaskhanolkarkardo@gmail.com

Comments
Add Comment

Radha Ashtami : सुख, शांती आणि समृद्धीसाठी राधा अष्टमीची पूजा कशी करावी? वाचा टप्प्याटप्प्याने संपूर्ण विधी

राधाष्टमीनिमित्त बरसाणामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे. शनिवारी वृषभानू नंदिनी राधाराणी यांची जयंती

Difference Between Guru Purnima and Teachers Day : गुरुपौर्णिमा आणि शिक्षक दिन यांच्यातील मुख्य फरक अन् महत्त्व काय ? जाणून घ्या एका क्लिकवर

आपल्या आयुष्याला योग्य दिशा दाखवण्यात, उत्तम संस्कार करण्यात आणि चांगल्या-वाईटाची ओळख करून देण्यात

Shravan Putrada Ekadashi 2026 : श्रावण पुत्रदा एकादशी 23 ऑगस्टला; जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि धार्मिक महत्त्व

Shravan Putrada Ekadashi : श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला ‘श्रावण पुत्रदा एकादशी’ किंवा ‘पवित्रा एकादशी’ असे

Babulnath Temple : मुंबईतील प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी!

मुंबई : पवित्र श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी (३ ऑगस्ट २०२६) संपूर्ण मुंबई शहर शिवभक्तीत चिंब भिजल्याचे

कर्म हेच ब्रह्मदेव

अंधारातून प्रकाशाकडे म्हणजेच अज्ञानातून ज्ञानाकडे या विषयाअंतर्गत आपण संचित प्रारब्ध ह्या संकल्पना समजावून

दशदिक्षु स्थितं दैवं, दशशक्तिसमन्वितम्

प्रभाती सूर नभी रंगती दशदिशा भूपाळी म्हणती पानोपानी अमृत शिंपित उषा हासरी हसते धुंदीत जागी होऊन फुले