भिवंडीत २१ लाखांचा १०६ ग्रॅम एमडीसह पिस्टल जप्त; तीनजण अटकेत

भिवंडी : भिवंडीत शांतीनगर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाईत तिघा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून २१ लाख २० हजार रुपये किमतीचा १०६ ग्रॅम एमडी व १५ लाखांची बीएमडब्ल्यू कार व पिस्टल असा एकूण ३७ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


गुन्हेगारी कारवायांमुळे शहरातील हद्दपार केलेला मोहम्मद अली अब्दुल अजीज शेख हा शहरात एमडी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यावर शांतीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस पथकाने त्यास शांतीनगर परिसरातून ११ लाख २० हजार रुपये किमतीचा ५६ ग्रॅम एमडी जप्त केला.


त्याचवेळी तपासात नाशिक येथील दोन जण एमडी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाल्यावर साईबाबा मंदिर परिसरात पोलिसांनी सापळा रचून संशयित बीएमडब्ल्यू कारमधील दोघा जणांची झडती घेतली असता त्यांच्या जवळ १० लाख रुपये किमतीचा ५० ग्रॅम एमडी आढळून आला. मुज्जफर मोबिन शेख व समीर फिरोज रोकडीया दोघे रा. नाशिक रोड यांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळील मोबाईल ताब्यात घेऊन तपासले असता त्यामध्ये हातात पिस्टल घेऊन वावरत असतानाचा व्हिडिओ आढळून आला.


त्यानुसार पोलिसांनी नाशिक रोड येथील त्याच्या घरातून पिस्टल जप्त केले आहे. या दोन्ही प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule News: महसुलमंत्र्यांचा 'आदर्श नोंदणी पॅटर्न' आता देशभरात, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे केंद्रीय सचिवांकडून कौतुक

मुंबई: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून अस्तित्वात आलेल्या मॉडेल नोंदणी कार्यालयांच्या

Sindhudurg News: सिंधुदुर्गात ऑनलाइन गेमिंग, मटक्याविरोधात विशेष यंत्रणा, मंत्री नितेश राणे यांची माहिती

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑनलाइन गेमिंग, ऑनलाइन मटका आणि जुगाराच्या वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी

Miraj Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालय परिसर हादरला; प्रवेशकमानीचा स्लॅब कोसळून ७ मजूर गंभीर जखमी

सोमवारी मिरज येथील शासकीय रुग्णालय परिसरात एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली. रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर

CM Devendra Fadnavis : जगाला कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी देशनिहाय ‘स्किल पासपोर्ट’ तयार करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्रासाठी जागतिक कार्यबल गतीशिलता धोरण २०२६ जाहीर

मुंबई : जागतिक रोजगाराच्या बदलत्या गरजांनुसार महाराष्ट्रातील युवक-युवतींना कौशल्य आणि भाषा प्रशिक्षण देऊन

Pravin Darekar : भाजप गटनेते प्रवीण दरेकरांच्या ताफ्यातील कारचा अपघात

मुंबई : भाजपचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील एका कारला मुंबईतील फ्रीवेवर सोमवारी

Train Safety System : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात 'कवच ४.०' सुरक्षा ऑडिट चाचणी यशस्वी; रेल्वे सुरक्षेत महत्त्वपूर्ण टप्पा गाठला

सोलापूर : मध्य रेल्वेने रेल्वे सुरक्षेच्या आधुनिकीकरणात एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सोलापूर विभागाने