Ajit Pawar : तुम्हाला इथे काय झक मारायला ठेवले का?

अजित पवारांनी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांच्या कामाचे काढले वाभाडे


पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे जीएसटी भवन इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांच्या कामाचे वाभाडे काढत या अधिकाऱ्यांना झाप झाप झापले. अजित पवारांना उत्तर देताना अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली आणि अक्षरश: ततपप झाल्याचे पाहायला मिळाले.



अजित पवारांचा पारा का चढला?


त्याचे झाले असे की, अजित पवार (Ajit Pawar) इमारत चढत होते. यावेळी पहिल्याच पायरीवर सिमेंट असल्याने अजित पवार यांच्या निदर्शनास आले. ते पाहून संतापलेल्या उपमुख्यमंत्र्यांनी अधिका-यांना फैलावर घेतले. हे कशाला झक मारायला ठेवलंय का? हे काय मला काढायला ठेवलं आहे का? असा सवाल अजित पवारांनी यावेळी अधिकाऱ्यांना केला. यावेळी अजित पवार चांगलेच संतापल्याचा पाहायला मिळाले.



अजितदादा अधिकाऱ्यांवर का भडकले?


जीएसटी भवनची पाहणी करताना अजितदादांनी अधिकाऱ्यांना चांगलेच झापले. छाछूगिरी करू नका, ड्रेनेज लाईनचे काम करताना लक्षात नाही आलं का तुमच्या? असा सवाल त्यांनी केला. जीएसटी भवनाच्या नव्या इमारतीत ड्रेनेज लाईनचे झाकण वरती आल्यामुळे अजितदादा अधिकाऱ्यांवर भडकले होते.


अजित पवार आपल्या कडक स्वभावासाठी ओळखले जातात. कामात निष्काळजीपणा केल्याबद्दल अनेकदा अजित पवारांनी अधिकाऱ्यांना झापले आहे. त्याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली.

Comments
Add Comment

Central Railway : महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे 15 अनारक्षित विशेष गाड्या चालवणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत दादरच्या चैत्यभूमीवर येणाऱ्या लाखो

Chandrashekhar Bawankule : राज्यात 9 नवीन अपर तहसीलदार कार्यालये सुरु होणार; नागपूर, गडचिरोलीसह 6 जिल्ह्यांना लाभ

मुंबई : राज्यातील नागरिकांची महसूलविषयक कामांसाठी होणारी धावपळ कमी करण्याच्या उद्देशाने 9 नवीन अपर तहसीलदार

शेतकऱ्यांची एक इंचही जमीन सरकार घेणार नाही; कुळ कायद्याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण

राज्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी कुळ कायद्यांतर्गत शासनाच्या व्यवस्थापनाखाली जाणार नाहीत. स्वतःची

लोकप्रतिनिधींच्या कामाचा दस्तऐवज समाजासाठी दिशादर्शक ठरेल -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विधानपरिषदेतील कामकाज आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सभागृहात केलेल्या संघर्षाचा लेखाजोखा मांडणाऱ्या डॉ. नीलम

Central Railway special block : मध्य रेल्वेचा विशेष ब्लॉक; कोकण कन्यासह अनेक एक्सप्रेस गाड्या थांबवल्या जाणार, वेळापत्रकातही बदल

मुंबई : पनवेल-कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्सच्या (Panvel- Kalmboli Coaching complex) कामातील अडथळे दूर करण्यासाठी आणि पायाभूत

खासदार रामराव वडकुते यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतले अंत्यदर्शन; कुटुंबीयांचे केले सांत्वन

महाराष्ट्रातील भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुटे यांचं रविवारी (२२ नोव्हेंबर) निधन झालं. दिल्लीतील एम्स