भिवंडीत डिझेल विक्री करण्यासाठी आलेल्या दोघा जणांना टँकर व १५ हजार लिटर डिझेलसह घेतले ताब्यात

भिवंडी : भिवंडी शहरात टँकर घेऊन डिझेल विक्रीसाठी घेऊन आलेल्या दोघा जणांना शांतीनगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्या जवळून टँकर व १५ हजार लिटर डिझेल असा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.


भिवंडी कल्याण रस्त्यावरील साईबाबा मंदिर हिना गॅरेज समोरील रस्त्यावर दोन व्यक्ती अवैध डिझेलची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त बातमी शांतिनगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे यांना मिळाल्यानंतर त्यांच्या पथकातील पोलीस पथकाने घटनास्थळी सापळा रचून अजित चोविसलाल यादव, वय ३४ रा.बेलापूर नवी मुंबई,व चालक आरीफ जलालुदीन खान, वय ४२ रा. मानखुर्द, मुंबई यांना ताब्यात घेतले.


त्यांच्या जवळ टँकर मधील डिझेल बाबत कोणतीही कागदपत्रे आढळून न आल्याने त्यांनी हे डिझेल विक्रीसाठी घेऊन आल्याचे निष्पन्न झाल्याने शांतीनगर पोलिसांनी १० लाख ८० हजार रुपये किमतीचे १५ हजार ५०० लिटर डिझेल व १० लाख रुपयांचा टँकर असा एकूण २० लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याी माहिती विनायक गायकवाड यांनी दिली.

Comments
Add Comment

Bhiwandi Crime : वर्षभर अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी भिवंडीतील मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला अटक

ठाणे : अल्पवयीन विद्यार्थिनीवर दीर्घकाळ लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर आरोपावरून नरपोली पोलिसांनी २६ वर्षीय

Bhiwandi Hit and Run : क्षणात दुचाकीला उडवलं अन् चालक पसार! भिवंडीतील हिट अँड रनचा थरार CCTVमध्ये कैद

ठाणे : भिवंडी शहरातील कामतघर परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास हिट अँड रनची धक्कादायक घटना घडली. भरधाव

Thane Rain Alert : गणेशोत्सवात पावसाची हजेरी! ठाण्यात IMD चा यलो अलर्ट; पुढील २४ तास महत्त्वाचे

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावण्यास

Thane Plastic Ban : ठाण्यात प्लास्टिकविरोधात महापालिकेची धडक कारवाई! ९९ किलो प्लास्टिक जप्त, ७९ हजारांचा दंड

Thane : ठाणे शहरात प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात ठाणे महापालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. शहरातील विविध भागांमध्ये

Dombivali Local Train : डोंबिवलीहून सुटलेल्या गर्दीच्या लोकल ट्रेनमधून महिला थेट ट्रॅकवर पडली अन्...व्हिडिओ व्हायरल

ठाणे : डोंबिवली स्थानकातून (Dombivali Railway Station) सकाळी ७:५६ वाजता सुटलेल्या तुफान गर्दीच्या लोकल ट्रेनमधून एक महिला प्रवासी

गणेशोत्सव २०२६ : गणेश विसर्जनाच्या दिवशी ठाण्यात अवजड वाहनांना बंदी; वाहतूक पोलिसांकडून नियमावली जाहीर

गणेशोत्सव २०२६ दरम्यान विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पडाव्यात आणि शहरातील वाहतूक कोंडी टाळावी, यासाठी ठाणे