IND vs BAN: भारत-बांग्लादेश कसोटीसाठी लवकर होणार संघाची घोषणा, भारतीय संघात यांना मिळू शकते संधी

मुंबई: भारत आणि बांग्लादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना १९ सप्टेंबरला खेळवला जाईल. हा सामना चेन्नईत आयोजित करण्यात येईल. भारत-बांग्लादेश यांच्यात दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. यासाठी लवकरच संघाची घोषणा केली जाऊ शकते. भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात मैदानावर उतरणार आहे.


टीम इंडिया या मालिकेत अनुभवी खेळाडूंसह युवा खेळाडूंनाही संधी देऊ शकते. मात्र त्यांची निवड त्यांच्या फॉर्मवर अवलंबून आहे. सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल यांना संधी मिळू शकते.


यशस्वी जायसवाल चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे यशस्वी आणि शुभमन गिल यांची जागा साधारण निश्चित आहे. जर शुभमन गिलने दिलीप ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली तर त्याच्यासाठी ही महत्त्वाची संधी ठरू शकते. सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल यांनाही टीम इंडियात संधी मिळू शकते. सर्फराज आणि जुरेल यांनी भारतीय संघासाठी पदार्पण केले आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या रवींद्र जडेजालाही संधी मिळू शकते. जडेजा अनुभवी ऑलराऊंडर आहे.


टीम इंडिया स्पिनर्सवर विशेष लक्ष देऊ शकतात. कुलदीप यादव आणि रवीचंद्रन अश्विन भारतीय संघासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि मुकेश कुमार यांनाही संधी मिळू शकते. भारतीय संघ अर्शदीप सिंहच्या नावावरही विचार करू शकतो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीचे लक्ष खेळाडूंच्या दिलीप ट्रॉफीमधील प्रदर्शनावरही असणार आहे. विकेटकीपर ऋषभ पंतचे स्थान निश्चित आहे.


बांगलादेशविरुद् भारताचा संभाव्य संघ - रोहित शर्मा(कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, सर्फराज खान, देवदत्त पडिक्कल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप, अर्शदीप सिंह.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून