IND vs BAN: या दिवशी होणार बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा?

मुंबई: भारत आणि बांग्लादेश यांच्यात १९ सप्टेंबरपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. आतापर्यंत बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केलेली नाही. आता ही मालिका सुरू होण्यास अवघे १० दिवस शिल्लक आहेत. अशातच सर्वांनाच टीम इंडियाच्या निवडीची उत्सुकता आहे.


रिपोर्टनुसार उद्या म्हणजेच ९ सप्टेंबरला बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे. प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची ही पहिली कसोटी मालिका असणार आहे. रिपोर्टमध्ये असेही म्हटले जात आहे की गंभीर कर्णधार रोहित शर्मा आणि प्रमुख सिलेक्टर अजित आगरकरसोबत मिळून संघाची निवड करतील.


भारत आणि बांग्लादेश यांच्यात १९ ते २३ सप्टेंबरदरम्यान पहिला कसोटी सामना चेन्नईत खेळवला जाणार आहे. यानंतर दोन्ही संघादरम्यान २७ सप्टेंबरला कानपूरमध्ये दुसरा कसोटी सामना खेळवला जाईल. कसोटी मालिकेनंतर दोन्ही संघादरम्यान तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाईल. टी-२० मालिकेसाठी रविवारी टीम इंडियाची घोषणा केली जाऊ शकते.


बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेसाठी संभाव्य १५ सदस्यीय संघ - रोहित शर्मा(कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, सर्फराज खान, ऋषभ पंत(विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन. मोहम्मद सिराज, आकाशदीप, केएल राहुल(रिझर्व्ह ओपनर), ध्रुव जुरेल, कुलदीप यादव आणि नवदीप सैनी.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून