भीषण अपघात! आंध्रप्रदेशात मिनी ट्रक पलटला; अपघातात ७ जणांचा मृत्यू

देवरापल्ली : आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात मिनी ट्रक उलटून ७ जणांचा मृत्यू झाला. ही घटना देवरापल्ली मंडलातील चिन्नईगुडेममधील चिलाका पाकला भागात मंगळवारी मध्यरात्रीनंतर २ वाजेच्या सुमाराला घडली. पूर्व गोदावरी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नरसिंह किशोर यांनी याबाबत माहिती दिली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काजूने भरलेला मिनी ट्रक टी नरसापुरम मंडलातील बोरामपालम येथून निदादावोलू मंडलातील ताडीमल्लाकडे जात होता. यावेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला. अपघातानंतर काजूच्या गोण्यांखाली दबल्यामुळे लोकांचा मृत्यू झाला. पोलिस आणि स्थानिकांनी पोत्याखालून मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयात नेले. मृतांमध्ये देबाबत्तुला बुरैया (४०), तम्मीरेड्डी सत्यनारायण (४५), पी. चिन्मुसलय (३५), कट्टाव कृष्णा (४०), कट्टावा सत्तीपांडू (४०), तडीमल्ला येथील तड्डी कृष्णा (४५) आणि कटकोटेश्वर येथील समिश्रगुडेम मंडल यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

UP Vidhan Sabha election strategy यूपी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा 'मास्टरप्लॅन' तयार! आमदार, खासदारांवर सोपवली मोठी जबाबदारी

लखनऊ : पुढच्या विधानसभा निवडणुकांसाठी उत्तर प्रदेशमध्ये भाजपने आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

Himachal Pradesh royal wedding : जर्मनीत जुळलं प्रेम, हिमाचलमध्ये रंगला शाही विवाह! इंग्लंडच्या वऱ्हाडाला पाहून मंडीचे गावकरी थक्क

मंडी : प्रेमाला भूगोलाच्या रेषा, भाषेचे अडथळे किंवा संस्कृतीच्या भिंती रोखू शकत नाहीत, याचा प्रत्यय हिमाचल

पाण्याच्या गुणवत्तेवरील आरोपांवर 'बिसलेरी' कंपनीकडून स्पष्टीकरण, म्हणाले...

मुंबई: FSSAI ने बाटली बंद पिण्याच्या पाण्याची असलेल्या 'बिसलेरी' कंपनीच्या विरोधात खटला चालवण्यासाठी मंजुरी

HPV Vaccination : देशात एचपीव्ही लसीकरणाचा 1 कोटींचा टप्पा पूर्ण ! सहा राज्यांची 100 टक्के कामगिरी, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अभियानाचे कौतुक

HPV Vaccination : देशातील मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण यश समोर आले आहे. देशभरात सुरू असलेल्या राष्ट्रीय

PUC Validity Check: गाडीचा PUC संपलाय का? मोबाईलवर एका क्लिकमध्ये घरबसल्या तपासा

PUC Validity Check: जर तुम्ही कार किंवा बाईक चालवत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आता तुम्ही घरबसल्या तुमच्या फोनच्या

आईच्या निधनानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यना भावूक, शेअर केले भावनिक पत्र

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मातोश्री सावित्री देवी यांचे दोन