Mumbai Local : मुंबईकरांची रेल्वे गर्दीतून होणार सुटका; दुप्पट वाढणार लोकल ट्रेन फेऱ्या!

रेल्वे प्रशासनाने आखला नवा प्लॅन


मुंबई : मुंबईतील लोकल ट्रेन (Mumbai Local) प्रवाशांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले की आगामी तीन वर्षांत लोकल ट्रेन फेऱ्या दुप्पट होणार असून, दोन लोकलमधील अंतर १८० सेकंदांवरून १५० सेकंदांवर आणले जाईल. यासाठी कम्युनिकेशन्स बेस्ड ट्रेन कंट्रोल (CBTC) प्रणाली लागू केली जाणार आहे. यामुळे प्रत्येक अडीच मिनिटांनी लोकल ट्रेन धावेल, त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि गर्दी कमी होईल.


मुंबईतील तिन्ही मार्गांवर ही प्रणाली लागू होणार आहे. सध्या, तांत्रिक अडचणी आणि वेळापत्रकातील अनियमितता यांमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. मात्र, CBTC प्रणालीमुळे हे प्रश्न सुटतील आणि ट्रेन सेवा अधिक नियमित आणि वेगवान होईल. या तंत्रज्ञानाचा वापर करणारे मुंबई हे देशातील पहिले शहर ठरणार आहे.


याशिवाय, ट्रेनच्या सुरक्षिततेसाठी कवच अँटी-कोलिजन तंत्र देखील वापरले जाणार आहे, जे अपघातांचा धोका कमी करेल. CBTC आणि कवच यंत्रणांच्या संयुक्त वापरामुळे ट्रेनमधील अंतर कमी होईल, अपघात टाळता येतील, आणि प्रवास अधिक सुरक्षित होईल. हा प्रकल्प मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प (MUTP) फेज 3A अंतर्गत राबवला जात आहे, जो मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने विकसित केला आहे.


ही प्रणाली येत्या काही महिन्यांत अंमलात येईल, आणि त्यानंतर मुंबईतील प्रवास जलद, अधिक सुरक्षित आणि आरामदायी होईल. प्रवाशांना अडीच मिनिटांच्या अंतराने उपलब्ध होणाऱ्या ट्रेनमुळे त्यांचा दैनंदिन प्रवास अधिक सुकर होईल.

Comments
Add Comment

BMC : मोठ्या मंडळांसाठी समन्वय अधिकारी नेमा; समन्वय समितीची महापालिकेकडे मागणी!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत मोठ्याप्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात, अशा मंडळांसाठी महापालिकेने समन्वय

Malad Accident : "तिला मला शेवटचं पाहायचं आहे..."; जखमी पतीने व्हीलचेअरवरून घेतले पत्नीचे अखेरचे दर्शन

मुंबई : मालाडमध्ये रविवारी रात्री झालेल्या भीषण रस्ता अपघाताने एका कुटुंबावर मोठा आघात केला. या अपघातात ३४

Western Railway New Timetable : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून पश्चिम रेल्वेचे नवे वेळापत्रक लागू; जाणून घ्या नवीन बदल

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा अविभाज्य भाग असलेल्या पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवांमध्ये १ सप्टेंबर

Kalwa Hospital News : कळवा रुग्णालयातील रुग्णाच्या जेवणात झुरळ? संतापाची लाट; कंत्राटदारावर कारवाईची मागणी

ठाणे : ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णाला देण्यात आलेल्या जेवणात झुरळ आढळल्याचा

Chemical Leak : चेंबूरमध्ये टँकरमधून बेन्झीनची गळती; म्हैसूर कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : चेंबूरच्या म्हैसूर कॉलनी परिसरात उभ्या असलेल्या टँकरमधून बेन्झीन केमिकलची गळती झाल्याने खळबळ उडाली.

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १