Mercedes Benz India: मुंबईत क्लासिक कार रॅलीचा जल्लोष! नेहरूंची ऐतिहासिक मर्सिडीज पाहून प्रताप सरनाईकही भारावले

मर्सिडीज-बेंझ इंडिया आणि ऑटोकार इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मर्सिडीज-बेंझ क्लासिक कार रॅली 2026’चा शुभारंभ रविवारी ताज लँड्स एंड, वांद्रे येथे आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून उदघाटन करण्यात आला.

मुंबई: मर्सिडीज-बेंझ इंडिया आणि ऑटोकार इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मर्सिडीज-बेंझ क्लासिक कार रॅली 2026’चा शुभारंभ रविवारी ताज लँड्स एंड, वांद्रे येथे आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून उदघाटन करण्यात आला.



मंत्री प्रताप सरनाईक काय म्हणाले?


सुरक्षितता आणि आरामदायी प्रवास ही मर्सिडीज-बेंझची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. मर्सिडीज-बेंझ ही केवळ एक आलिशान मोटारगाडी नसून सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाचे प्रतीक आहे. अशा प्रकारचा सुरक्षित आणि सुखकर प्रवास हे आपल्या देशातील सर्वसामान्य नागरिकांचेही स्वप्न आहे. आधुनिक तंत्रज्ञानासोबतच वाहनांचा ऐतिहासिक वारसा जतन करण्याचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या रॅलीमध्ये देशभरातील दुर्मीळ,आकर्षक आणि ऐतिहासिक मर्सिडीज-बेंझ मोटारगाड्यांचे प्रदर्शन करण्यात आले होते.


विशेष म्हणजे, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी प्रवासासाठी वापरलेल्या ऐतिहासिक मर्सिडीज-बेंझ मोटारगाडीने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. या ऐतिहासिक गाडीला पाहताच तिच्यासोबत छायाचित्र काढण्याचा मोह परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनाही आवरता आला नाही. त्यांनी या गाडीसोबत छायाचित्र काढून आपल्या आठवणींना उजाळा दिला.






तसेच सरनाईक यांनी रॅलीतील विविध क्लासिक कार मॉडेल्सची आवर्जून पाहणी केली. प्रत्येक गाडीची निर्मिती, तिची वैशिष्ट्ये, तांत्रिक रचना आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी याबाबत संबंधितांकडून माहिती जाणून घेतली. तसेच जुन्या काळातील मोटारगाड्यांची कलात्मकता, अभियांत्रिकी कौशल्य आणि काळानुसार विकसित होत गेलेले ऑटोमोबाईल तंत्रज्ञान याबद्दलही त्यांनी उत्सुकता व्यक्त केली.


सन 2014 पासून आयोजित करण्यात येणारी ही क्लासिक कार रॅली यंदा मर्सिडीज-बेंझच्या 140 वर्षांच्या गौरवशाली ऑटोमोबाईल इतिहासाचे औचित्य साधून विशेष स्वरूपात आयोजित करण्यात आली होती. जुन्या आणि दुर्मीळ मोटारगाड्यांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासोबतच ऑटोमोबाईल क्षेत्रातील ऐतिहासिक प्रवासाचे दर्शन घडविणारा हा उपक्रम ठरला. या कार्यक्रमाला मर्सिडीज-बेंझ इंडिया, ऑटोकार इंडिया यांचे प्रतिनिधी, ऑटोमोबाईल क्षेत्रातील मान्यवर, क्लासिक कारप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

Mumbai Water: मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी BMCचा नवा प्लॅन, भांडुपमध्ये 2 हजार MLD क्षमतेचे नवे जलशुद्धीकरण केंद्र

मुंबई: मुंबई शहराचा पाणीपुरवठा सुरळितपणे सुरू राहण्‍यासाठी भांडुप संकुल येथे 2 हजार दशलक्ष लीटर (MLD) प्रतिदिन

मुंबई सेंट्रलमध्ये इमारतीला भीषण आग; 8 जणांची सुखरूप सुटका, अग्निशमन अधिकारी जखमी

मुंबई सेंट्रलमधील गिल्डर लेन येथील एका निवासी इमारतीला रविवारी मध्यरात्रीनंतर भीषण आग लागली. या आगीत वृद्ध

Yachting Championship: समुद्राच्या लाटांवर रंगली यॉटिंगची स्पर्धा; 121 नौकानयनपटूंनी दाखवले कौशल्य

मुंबईच्या समुद्रकिनारी राष्ट्रीय यॉटिंग स्पर्धेचा उत्साह पाहायला मिळाला. देशातील विविध भागांतून आलेल्या

विधान भवन आणि एअर इंडिया इमारतीजवळील खाद्य स्टॉल्सवर FDAचा दंड; ज्यूस स्टॉलचा परवाना निलंबित

विधान भवन आणि नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारतीच्या परिसरात कार्यरत असलेले खाण्याचे स्टॉल्स आणि खाद्य

Better Roads For Dharavi: धारावीतील खराब रस्त्यांची होणार सुधारणा

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी शहरांसह उपनगरांतील डांबरी रस्त्यांसह जुन्या

काळाचौकीच्या टेक्सटाईल म्युझियमची जागा BMC कडे हस्तांतरित, मुंबई महापालिकेला भरावा लागणार मेट्रो सेस

मुंबई (सचिन धानजी): मुंबईत मेट्रो रेल्वेचे जाळे पसरले असून या मेट्रो रेल्वेचा पसारा वाढू लागल्यानंतर यासाठीचा