Sharad Pawar : शरद पवार यांच्या पक्षात इनकमिंगला वेग!

दीपक मोहिते


मुंबई : महायुतीचे नेते एकीकडे विविध योजनेच्या माध्यमातून पैश्याची खिरापत वाटत असताना दुसरीकडे शरद पवार यांनी त्यांच्या पायाखालची चादर ओढण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी लिहिलेल्या लेखात महायुतीचे अनेक नेते शरद पवार यांच्या "सिल्व्हर ओक" या निवासस्थानी प्रवेशासाठी रांगेत उभे असल्याचे म्हंटले होते. आज त्या नेत्यांची यादी आमच्या हाती लागली आहे. पण शरद पवार हे प्रवेश देताना आता ताक देखील फुंकून पीत आहेत. या रांगेत कोण कोण उभे आहेत,यावर एक नजर टाकूया.




  • विवेक कोल्हे - कोपरगाव

  • बाळ भेंगडे - मावळ

  • बाबू पठारे - वडगाव शेरी

  • हर्षवर्धन पाटील - इंदापूर

  • मदन भोसले - वाई

  • प्रशांत परिचारक - पंढरपूर

  • राजन पाटील - मोहोळ

  • दिलीप सोपल - बार्शी

  • रणजित शिंदे - माढा

  • गणेश नाईक - नवी मुंबई

  • रमेश कदम - मोहोळ

  • रामराजे निंबाळकर - फलटण


या व्यतीरिक्त २२ ते २३ असे एकूण ४२ ते ४५ जण रांगेत उभे आहेत.तसेच पक्षाकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्याही गगनाला पोहोचली आहे.पक्षाकडे एकूण ६१२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.पवार यांच्या सांगण्यावरून ३० ते ४० जागांवर संभाव्य उमेदवारांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.


या निवडणुकीत शरद पवार यांनी महाविकास आघाडीकडे ८० जागा मागितल्या आहेत व त्यांना त्या मिळतील. शरद पवार यांच्या पक्षात सुरू असलेले इनकमिंग पाहून महायुतीच्या नेत्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुतीचे दोन मोठे नेते त्यांच्या गोटात सामील होणार आहेत. त्यांच्या पक्ष प्रवेशानंतर महायुतीच्या नेत्यांचे उरले सुरले अवसान देखील गळून पडणार आहे. चिपळूण येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अनेक जण पक्षात सामील झाले. तसेच पालघर जिल्ह्यात एकनाथ शिंदे गटातील काही महिला पदाधिकारी देखील त्याच वाटेवर आहेत.

Comments
Add Comment

राज्यातील सर्व शाळांमध्ये राज्य सरकार राबवणार विशेष स्वच्छता मोहीम, साफसफाई आणि किरकोळ दुरुस्तीवर देण्यात येणार भर

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबवण्यात येणार आहे. स्वच्छता

Jalna Healthcare Project : जालन्यात कर्करोग, हृदयरोगांसह गंभीर आजारांवर उपचार; 3 हेक्टर जागेला मंजुरी

मुंबई : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जालना येथील

नाशिकमधील दूषित पाणी प्रकरणाची NHRC कडून दखल; मुख्य सचिवांना दोन आठवड्यांत अहवाल देण्याचे निर्देश

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अंबड औद्योगिक परिसरालगत असलेल्या दत्तनगर भागातील बोअरवेलचे पाणी रासायनिक

Jalgaon : चाळीसगाव रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट! पार्सल हब म्हणून विकसित करण्याची रेल्वेची तयारी

चाळीसगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील चाळीसगाव रेल्वे स्थानकाला आता पार्सल हब म्हणून विकसित करण्याची

Dussehra 2026 : यंदा विजयादशमी २० की २१ ऑक्टोबरला ? जाणून घ्या रावण दहनाची योग्य वेळ आणि पूजेचे मुहूर्त!

भारतीय संस्कृतीमध्ये साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत पवित्र, आनंदाचा आणि उत्साहाचा सण म्हणजे 'दसरा' किंवा

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे