राज्यातील सर्व शाळांमध्ये राज्य सरकार राबवणार विशेष स्वच्छता मोहीम, साफसफाई आणि किरकोळ दुरुस्तीवर देण्यात येणार भर

राज्यातील सर्व शाळांमध्ये ऑक्टोबर महिन्यात दोन टप्प्यामध्ये ‘चला शाळेत जाऊ या... विशेष शालेय स्वच्छता मोहीम’ राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबवण्यात येणार आहे. स्वच्छता मोहिमच्या काळामध्ये, शाळांची संपूर्ण साफसफाई आणि किरकोळ दुरुस्तीवर भर देण्यात येणार आहे. ‘चला शाळेत जाऊ या... विशेष शालेय स्वच्छता मोहीम’ राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या मोहिमेसाठी शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि स्थानिक समुदायाच्या सहभागातून शाळेची स्वच्छता, सुशोभीकरण आणि देखभाल करून शैक्षणिक वातावरण अधिक पोषक ठेवण्याचे काम करण्यात येणार आहे.



‘चला शाळेत जाऊ या... विशेष शालेय स्वच्छता मोहीम’ ही मोहिम राज्यातील सर्व शाळांमध्ये 18 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत राबवण्यात येणार आहे. शाळा परिसर स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि आनंददायी ठेवण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक जबाबदारी आणि शिस्तीची भावना रुजविणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. समग्र शिक्षा योजनेंतर्गत शाळांमध्ये आवश्यक मूलभूत सुविधा आणि अनुकूल शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याच्या प्रयत्नांना या मोहिमेमुळे चालना मिळणार आहे. शालेय शिक्षण विभागाने 16 ऑक्टोबर 2026 रोजी अर्थात आज यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे.



शालेय स्वच्छता मोहीम राज्यामध्ये दोन टप्प्यांमध्ये राबवण्यात येणार आहे. मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात 18 ते 24 ऑक्टोबरदरम्यान प्रत्येक शाळेत शाळा व्यवस्थापन समितीची विशेष बैठक घेऊन शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थ्यांचा सहभाग निश्चित करण्यात येईल. शाळेतील वर्गखोल्या, कार्यालय, प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक कक्ष, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि क्रीडांगणाची पाहणी करून स्वच्छता, दुरुस्ती व सुशोभीकरणाच्या कामांचा शाळानिहाय कृती आराखडा तयार करण्यात येईल. तर, दुसरा टप्पा 25 ते 31 ऑक्टोबरदरम्यान प्रत्यक्ष कामे केली जातील. वर्गखोल्या आणि विविध कक्षांसह फरशी, भिंती, दरवाजे, खिडक्या, छत आणि पंख्यांची सखोल साफसफाई करण्यात येईल. स्वच्छतागृहे, हात धुण्याची ठिकाणे, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आणि पाणीपुरवठा व्यवस्था स्वच्छ केली जाईल. शाळेचा परिसर, क्रीडांगण आणि प्रवेशद्वारातील कचरा आणि अनावश्यक वस्तू हटवून कचरा वर्गीकरणाची योग्य व्यवस्था तसेच डास, कीटक आणि आरोग्यविषयक समस्या निर्माण करणाऱ्या बाबी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील.



शाळेच्या स्वच्छता मोहिमेदरम्यान, विद्युत व्यवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे, फर्निचर, दरवाजे आणि खिडक्यांची पाहणी करून आवश्यक किरकोळ दुरुस्ती आणि देखभाल केली जाईल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक विद्युत जोडणी, तुटलेले फर्निचर आणि असुरक्षित भागांची तातडीने दुरुस्ती करण्यात येऊन अनुपयुक्त किंवा निरुपयोगी साहित्याचे वर्गीकरण करून विहित कार्यपद्धतीनुसार त्याची विल्हेवाट लावली जाईल. मोहिमेतील सखोल साफसफाई, किरकोळ देखभाल, दुरुस्ती आणि अन्य अनुज्ञेय बाबींवरील खर्च शाळांना समग्र शिक्षा योजनेंतर्गत मिळणाऱ्या एकत्रित अनुदानातून करण्यात येणार असून विद्यार्थ्यांकडून कोणत्याही स्वरूपाची अनिवार्य आर्थिक वर्गणी किंवा निधी गोळा करता येणार नाही, अशा स्पष्ट सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. ‘माझी शाळा-माझी जबाबदारी’ या भावनेतून या मोहिमेत शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी संघ, ग्रामस्थ, स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था तसेच उपलब्धतेनुसार सीएसआर आणि स्थानिक सामाजिक संस्थांचा सक्रिय सहभाग घेण्यात येणार असून मोहिमेच्या शाळास्तरीय अंमलबजावणीची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकांवर राहणार आहे.

Comments
Add Comment

नाचणीची भाकरी, भाजी अन् बांधावरील गप्पा; ग्रामस्थांशी संवाद साधत पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले जलसंधारण चळवळीला बळ

सिंधुदुर्ग : दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना पाण्याचा प्रत्येक थेंब अडविणे, जमिनीत जिरविणे आणि उपलब्ध

AstraZeneca Pharma India : जागतिक बाजारपेठेत भारतीय औषध उद्योगांची प्रभावी कामगिरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “अमेरिका आणि युरोपसारख्या नियंत्रित बाजारपेठांमध्ये भारतीय औषधे, विशेषतः जेनेरिक औषधे, प्रभावी कामगिरी

Jalna Healthcare Project : जालन्यात कर्करोग, हृदयरोगांसह गंभीर आजारांवर उपचार; 3 हेक्टर जागेला मंजुरी

मुंबई : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जालना येथील

नाशिकमधील दूषित पाणी प्रकरणाची NHRC कडून दखल; मुख्य सचिवांना दोन आठवड्यांत अहवाल देण्याचे निर्देश

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अंबड औद्योगिक परिसरालगत असलेल्या दत्तनगर भागातील बोअरवेलचे पाणी रासायनिक

Jalgaon : चाळीसगाव रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट! पार्सल हब म्हणून विकसित करण्याची रेल्वेची तयारी

चाळीसगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील चाळीसगाव रेल्वे स्थानकाला आता पार्सल हब म्हणून विकसित करण्याची

Dussehra 2026 : यंदा विजयादशमी २० की २१ ऑक्टोबरला ? जाणून घ्या रावण दहनाची योग्य वेळ आणि पूजेचे मुहूर्त!

भारतीय संस्कृतीमध्ये साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत पवित्र, आनंदाचा आणि उत्साहाचा सण म्हणजे 'दसरा' किंवा