Mumbai News : मुंबईत हायअलर्ट! दहशतवादी हल्ल्याची भीती

पोलीस ॲक्शन मोडवर


मुंबई : मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. दहशतवाद्यांकडून (Terrirst Attack) मुंबईला (Mumbai News) धोका असल्याची माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस ॲक्शन मोडवर आले असून पोलिसांकडून मुंबईतील प्रत्येक ठिकाणावर नजर ठेवण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सेंट्रल एजन्सीकडून मुंबई पोलिसांना (Mumbai Police) मुंबईवर दहशतवाद्यांकडून हल्ला होण्याची भीती असल्याची माहिती दिली. त्यामुळे मुंबई पोलीस सतर्क झाले असून मुंबईत पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच गर्दीची ठिकाणं आणि धार्मिक स्थळांवर 'मॉक ड्रिल्स' करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर शहरातील सर्व डीसीपींना त्यांच्या-त्यांच्या झोनमध्ये सुरक्षा व्यवस्थेवर विशेष लक्ष देण्यास सांगण्यात आलं आहे.


दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही दंगली किंवा गालबोट लागेल, असं काही होऊ नये यासाठी मुंबई पोलीस विशेष खबरदारी घेत आहे, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

Comments
Add Comment

Powai Lake : पवई तलावावर 180 मीटर लांबीचा म्युझिकल फाउंटन; महाराष्ट्राचा इतिहास आणि संस्कृती पाहता येणार

मुंबई : मुंबईतील पवई तलावाच्या सौंदर्यात आता अत्याधुनिक म्युझिकल फाउंटनची भर पडली आहे. 180 मीटर लांबीच्या या

Mumbai Police : मुंंबई पोलिसांना मिळणार OR कोड असलेले स्मार्ट ओळखपत्र

Mumbai News: पोलीस अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या तोतया पोलिसांना आळा घालण्यासाठी मुंबई

Mercedes Benz India: मुंबईत क्लासिक कार रॅलीचा जल्लोष! नेहरूंची ऐतिहासिक मर्सिडीज पाहून प्रताप सरनाईकही भारावले

मुंबई: मर्सिडीज-बेंझ इंडिया आणि ऑटोकार इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मर्सिडीज-बेंझ क्लासिक कार रॅली 2026’चा

Mumbai Water: मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी BMCचा नवा प्लॅन, भांडुपमध्ये 2 हजार MLD क्षमतेचे नवे जलशुद्धीकरण केंद्र

मुंबई: मुंबई शहराचा पाणीपुरवठा सुरळितपणे सुरू राहण्‍यासाठी भांडुप संकुल येथे 2 हजार दशलक्ष लीटर (MLD) प्रतिदिन

मुंबई सेंट्रलमध्ये इमारतीला भीषण आग; 8 जणांची सुखरूप सुटका, अग्निशमन अधिकारी जखमी

मुंबई सेंट्रलमधील गिल्डर लेन येथील एका निवासी इमारतीला रविवारी मध्यरात्रीनंतर भीषण आग लागली. या आगीत वृद्ध

Yachting Championship: समुद्राच्या लाटांवर रंगली यॉटिंगची स्पर्धा; 121 नौकानयनपटूंनी दाखवले कौशल्य

मुंबईच्या समुद्रकिनारी राष्ट्रीय यॉटिंग स्पर्धेचा उत्साह पाहायला मिळाला. देशातील विविध भागांतून आलेल्या