लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्रित देणार

१० ऑक्टोबरपर्यंत खात्यात ३ हजार जमा होणार!


बीड : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशानं पुरवणी अर्थसंकल्प जाहीर करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केलेली आहे. या योजनेचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील हप्ता १० ऑक्टोबरपर्यंत मिळणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रितपणे महिलांना मिळतील. लाडकी बहीण योजनेचे ३ हजार रुपये महिलांना दिवाळी बोनस म्हणून मिळणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील परळीतील सभेत बोलताना घोषणा केली आहे.


लाडकी बहीण योजनेसाठी पहिल्यांदा ३ हजार रुपये दिले आहेत. आता सप्टेंबर महिन्याचे १५०० रुपये मिळाले आहेत. आज मी तुम्हाला सांगतो, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे १० ऑक्टोबरच्या आत, भाऊबीजेची ओवाळणी बहिणींच्या खात्यात जाणार आहे, हा शब्द तुम्हाला देतो. बहिणींनी काही काळजी करु नये, असं अजित पवार यांनी म्हटलं. लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात टाकणार आहे. आताच मी अदिती तटकरे यांच्यासोबत बोललो आहे. तिनं सांगितलं इतके हजार कोटी लागतील, तुमची सभा झाल्यानंतर मुंबईला जाणार आहे. उद्या सुट्टी असेल, जे पैसे लागतील त्याची तरतूद करणार आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं.


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा पुरवणी अर्थसंकल्प मांडला गेला त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्या योजनेनुसार जुलै महिन्यापासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात करण्यात आली होती. जुलै महिन्यात अर्ज दाखल करणाऱ्या महिलांना १७ ऑगस्ट रोजी दोन महिन्यांचे पैसे पाठवण्यात आले होते. ऑगस्ट महिन्यात ज्या महिलांनी अर्ज दाखल केले होते त्यांना ३१ ऑगस्टला तीन हजार रुपये देण्यात आले. सप्टेंबर महिन्यात अर्ज दाखल करणाऱ्या महिलांना देखील २९ सप्टेंबरला पैसे देण्यात आले. आतापर्यंत तीन महिन्यांचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केल्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज सादर करणाऱ्या महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे ३ हजार रुपये १० ऑक्टोबरपर्यंत मिळणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्याच्या महिला व बाल विकास विभागाकडून चालवली जाते.

Comments
Add Comment

Devsthan Inam Land : देवस्थान इनाम जमीन प्रारूप समितीला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ; राज्यभरातून प्राप्त झालेल्या हरकतींमुळे निर्णय

मुंबई : राज्यातील देवस्थान इनाम जमिनींच्या व्यवस्थापनात आणि कायदेशीर चौकटीत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यासाठी

BMC Encroachment Drive : ‘पेडेस्ट्रियन फर्स्ट’ : दादरच्या एम. सी. जावळे मार्गावरील दुकानाच्या वाढीव बांधकामांवर हातोडा

सहाअनधिकृत स्टॉलसह ५६ ओटे तोडले मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या जी/उत्तर विभागामार्फत

गणेशोत्सवामध्ये BMC कडून हजारो मेट्रिक टन विसर्जनोत्तर साहित्याचे संकलन, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सेवेने प्रभावी स्वच्छता कार्य

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये कृत्रिम तलाव, नैसर्गिक तलाव आणि चौपाट्यांवर सार्वजनिक गणेश

Goregaon Mulund Link Road केव्हापासून मुंबईकरांच्या सेवेमध्ये दाखल होणार? समोर आली तारीख...

मुंबई: गोरेगाव आणि मुलुंडवाकरांसाठी आनंदाची बातमी म्हणता येईल. गोरेगाव - मुलुंड लिंक रोड (GMLR)प्रकल्पाचा गोरेगाव

‘शेतकरी एकटा नाही’… देवाभाऊंचा शेतकऱ्यांना आधार; आमदार चित्रा वाघ काय म्हणाल्या ?

मुंबई : शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी पाहून निर्णय घेणं, हीच खरी संवेदनशीलता असल्याचे प्रतिपादन करत भाजपाच्या

Matang Samaj : मातंग समाज मुंबईत धडकणार! उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी 29 सप्टेंबरला महामोर्चा

मुंबई : अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी मातंग समाजाकडून 29 सप्टेंबर रोजी मुंबईत