‘येक नंबर’च्या टायटल साँगमध्ये पाहायला मिळणार मलायका अरोराचा जलवा

मुंबई : नुकताच 'येक नंबर' चा ट्रेलर लाँच सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या चित्रपटाच्या ट्रेलरचा गाजावाजा सर्वत्र होताना दिसत आहे. ट्रेलर प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरत असून त्यावर कौतुकाचा वर्षावही होत आहे. सोशल मीडियावर व्ह्यूजचा आकडाही दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रेक्षकांकडून असा भरभरून प्रतिसाद मिळत असतानाच आता या चित्रपटातील भन्नाट शीर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. एनर्जीने भरलेल्या या गाण्याला अजय-अतुल यांचे संगीत आणि शब्द लाभले असून या जबरदस्त गाण्याला जोनिता गांधीचा आवाज लाभला आहे. तर रॅप सौरभ अभ्यंकर यांचे आहे. गणेश आचार्य यांचे नृत्यदिग्दर्शन लाभलेल्या या गाण्याची खासियत म्हणजे अवघ्या बॉलिवूडला भुरळ घालणारी मलायका अरोरा या गाण्याच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. या रॅपसाँगमधून मलायका आपल्या अदाकारीने रसिकांना घायाळ करणार आहे आणि यात तिला साथ लाभणार आहे महाराष्ट्राचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधवची. अशी तगडी टीम लाभलेले हे गाणे केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात धुमाकूळ घालणार असल्याचे दिसतेय.


हे आयटम साँग ऐकायला जितके एनर्जेटिक आहे तितकेच ते पाहायलाही कमाल आहे. प्रत्येकाला ठेका धरायला लावणाऱ्या या गाण्यात सिद्धार्थ एका अनोख्या अंदाजात दिसत आहे. मलायका आणि सिद्धार्थला एकत्र पडद्यावर पाहाणे, म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. खूप हॅपनिंग आणि एनर्जीने भरलेले हे गाणे प्रत्येकाच्या ओठांवर रुळणारे आहे.



या गाण्याबद्दल अजय गोगावले म्हणतात, "पूर्वी चित्रपटात हमखास आयटम साँग असायचे. हा प्रकार हल्ली जरा कमी झाला होता. मात्र पुन्हा एकदा आम्हाला येक नंबरच्या निमित्ताने आयटम साँग करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात आयटम साँग असले तरी ते विनाकारण नाही. कारण मुळात कथेची गरज होती. परंतु आपल्याकडे नृत्य म्हटले की मराठी ठेका, आपली एक मराठी शैली येते. परंतु आम्हाला यात काहीतरी वेगळे करायचे होते. त्यामुळे याचाच आधार घेत आम्ही रॅप, हिपहॉप पद्धतीने हे गाणे करण्याचा एक नवीन प्रयत्न केला आहे.''


झी स्टुडिओज आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित, 'येक नंबर'चे तेजस्विनी पंडित, वरदा नाडियाडवाला निर्माते आहेत. तर झी स्टुडिओजच्या उमेश कुमार बन्सल यांचेही या चित्रपटाला सहकार्य लाभले आहे. येत्या १० ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजेश मापुस्कर दिग्दर्शित या चित्रपटात धैर्य घोलप, सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Comments
Add Comment

Kaun Banega Crorepati : स्वप्न सत्यात उतरलं! KBC च्या मंचावर भूषण ठाकरे ठरला या सीजनचा पहिला करोडपती

मुंबई :  जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर एखादी व्यक्ती किती मोठे यश मिळवू शकते, याचे उदाहरण जळगावच्या 28 वर्षीय

महागुरु सचिन पिळगावकरांना मानद डॉक्टरेट! ग्वाल्हेरच्या ITM विद्यापीठाकडून गौरव

Sachin Pilgaonkar Doctorate University: मराठी चित्रपटसृष्टीतील महागुरुंचा ग्वालेरमध्ये डॉक्टर ऑफ लिट्रेचर पदवीने गौरव करण्यात आला आहे.

Nitesh Rane : ‘सिरीयल किलर’ नाटकाच्या 100 व्या प्रयोगाला मंत्री नितेश राणे यांची खास उपस्थिती; टीमचे केले कौतुक

मुंबई : मराठी रंगभूमीवरील ‘सिरीयल किलर’ या नाटकाने 100 प्रयोगांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. मुंबईतील दादर

गोव्यात IFFI महोत्सवात महाराष्ट्राचे विशेष दालन; चित्रनगरीच्या 50 वर्षांचा गौरव

गोवा: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट

KBC मधील पंजाबवरील प्रश्नामुळे वाद; अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्हीला कायदेशीर नोटीस

Kaun Banega Crorepati: महानायक अमिताभ यांचा कौन बनेगा करोडपती या सोनी टीव्हीवरील शोमुळे खुद्द बिग बी आणि चॅनेल दोघांच्या

Krrish 4: हृतिक रोशनच्या 'क्रिश 4' ला मिळणार भव्य रूप? नमित मल्होत्रा यांच्यासोबत चर्चा सुरू

Krrish 4: हृतिक रोशनच्या 'क्रिश' या चित्रपटाच्या पुनरागमनाची चर्चा गेल्या काही काळापासून सुरू आहे. आता 'क्रिश 4'