Share Market : सावधान! शेअर बाजारात भीतीचे दडपण कायम!

मुंबई : गेल्या आठवड्यात युद्धाचे सावट, विदेशी गुंतवणूकदारांनी भारताकडे फिरवलेली पाठ तसेच इतर घडामोडीमुळे (Share Market) सेन्सेक्स तब्बल ४००० अंकांनी कोसळला तर निफ्टीमध्ये याच कालावधीत २००० अंकांची पडझड झाली ज्यामुळे गुंतवणूकदारांची (stock market) चिंता वाढली होती. पण आज आठवड्याची सुरुवात पॉझिटिव्ह केली आहे. मोठ्या घसरणीनंतर शेअर बाजार सावरला आहे. मात्र अजूनही बाजारात पडझड सुरूच राहील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.


भारतीय शेअर मार्केटमध्ये नुकताच आठवड्यातील सर्वाधिक घसरणीचा रेकॉर्ड झाला. जून २०२२ नंतर प्रथमच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये इतकी मोठी पडझड झाली. २७ सप्टेंबरपासून देशांतर्गत बाजारात घसरणीचा ट्रेंड सुरूच असून मागील आठवड्याभरातील पाच व्यापार दिवसांत सेन्सेक्स उच्चांकी पातळीवरून ४,१०० हून अधिक अंकांनी आपटला तर निफ्टी १२०० हून अधिक अंकांनी कोसळला. अशाप्रकारे शेअर बाजारातील गंटागळीत कंपन्यांसह गुंतवणूकदारांना १६ लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले. ही जून २०२२ नंतर शेअर बाजारातील ही सर्वात मोठी साप्ताहिक घसरण आहे. त्यातच इराण-इस्रायल संघर्ष आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी चीनच्या उपाययोजनांमुळे बाजारात गळती सुरू झाली असून घसरणीचा ट्रेंड अजून थांबलेला नाही. नवीन आठवड्यात बाजारात आणखी घसरण दिसून येऊ शकते. मध्यपूर्वेतील तणावाची परिस्थिती, चीन, परदेशी गुंतवणूकदारांकडून होणारी विक्री याशिवाय काही इतर घटकही बाजाराला आणखी खाली खेचू शकतात असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस गुंतवणूकदारांना ट्रेडिंग करताना सावधगिरी बाळगली पाहिजे.


मध्य-आशियातील या दोन्ही देशांमधील संघर्ष कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. अमेरिका आणि नाटो देशांच्या मदतीने इस्रायल इराणच्या तेल केंद्रांना लक्ष्य करण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी जगातील सर्व मुस्लिम देशांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. तसेच इस्त्रायलवर हल्ला झाल्यास जग तिसऱ्या महायुद्धाकडे जाऊ शकते, अशीही चर्चा असून याचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर दिसून येईल आणि भारतीय मार्केटही त्याला अपवाद ठरणार नाही.


दुसरीकडे डबघाईला आलेल्या चीनच्या शेअर मार्केटमध्ये मात्र सतत तेजीचा ट्रेंड दिसत आहे. अर्थव्यवस्था आणि शेअर बाजाराला चालना देण्यासाठी चीन सरकारने अलीकडेच अनेक सवलती जाहीर केल्या. ज्याअंतर्गत सरकारने मालमत्ता बाजाराला चालना देण्यासाठी बँकांना १४० अब्ज डॉलर्सचे प्रोत्साहन दिले. तसेच गृहकर्जाचे दरही कमी केले ज्यामुळे बाजारात तेजी खरेदी वाढली. परदेशी गुंतवणूकदारांचा कल देखील चीनकडेच आहे. यामुळे विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात विक्रीचा सपाटा लावला असून शुक्रवारी सुमारे ९९०० कोटी काढून घेतले तर गेल्या एका आठवड्यात ३७ हजार कोटींहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. तसेच आता नवीन आठवड्यात विदेशी गुंतवणूकदार भारतातून पैसे काढून चीनकडे जाऊ शकतात.


सोमवारपासून आरबीआयची पतधोरण बैठक सुरू होत असून ९ ऑक्टोबर, बुधवारी व्याजदराबाबत समितीचा निर्णय जाहीर केला जाईल. आरबीआयकडून सलग दहाव्यांदा व्याजदर स्थिर ठेवले जाऊ शकतात. चालू आर्थिक वर्षात आरबीआयच्या पतधोरणात कोणताही बदल होणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


तसेच लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच दोन राज्यात विधानसभा निवडणूक पार पडल्या. ज्यांच्या एक्झिट पोलने दिलेल्या निकालांचा बाजाराच्या वाटचालीवर परिणाम होऊ शकतो. विशेषत: हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल भाजपाच्या बाजूने आले नाहीत तर बाजारातील पडझड आणखी वाढू शकते. हरियाणात गेल्या दहा वर्षांपासून भाजपाचे सरकार असून यंदाच्या निवडणुकीनंतर फेरबदल होण्याची चर्चा आहे. दुसरीकडे जम्मू-काश्मीरमध्येही अनेक वर्षांनंतर निवडणुका होत आहेत. येथेही भाजपाला मोठे आव्हान असल्याने बाजारात सध्या गोंधळाचे वातावरण आहे.

Comments
Add Comment

75 टक्के स्वदेशी तंत्रज्ञान! INS समर्थक भारतीय नौदलात दाखल, काय आहेत क्षमता?

नवी दिल्ली : भारतीय सागरी सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलत भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘आयएनएस

सायबर सिक्युरिटीमध्ये करिअरची संधी? NISM चे 2 नवीन कोर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई : आर्थिक आणि तांत्रिक सुरक्षेला बळ देण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्सने (एनआयएसएम) एक

Jai Meena Asian Games : "पंतप्रधानांनी पाठ थोपटत म्हटलं, 'धन्यवाद आपका'..."; आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचणाऱ्या जय मीनाच्या खास आठवणी!

जपानमधील आयची-नागोया येथे पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये (Aichi-Nagoya Asian Games 2026) भारताचा प्रतिभावान खेळाडू

Himachal Pradesh: बर्फवृष्टीमुळे हिमाचलमध्ये निसर्गाचं नयनरम्य दृश्य, धरतीवरील नंदनवनात हिवाळ्याची चाहूल!

शिमला शिमलातील बर्फवृष्टी पाहण्यासाठी असते. शिमलाचे फोटो सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बर्फवृष्टी

Navi Mumbai Airport आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी तयार नाही? एमिरेट्सचा दावा; NMIA कडून खंडन!

मुंबई: भारतातील सर्वात मोठ्या परदेशी विमान कंपन्यांपैकी एक असलेल्या एमिरेट्स कंपनीने, खानपान आणि मालवाहू गोदाम

Lakme Fashion Week : लडाखच्या 'पश्मिना' आणि पारंपरिक हस्तकलेचा नवी दिल्लीत डंका!

नवी दिल्ली : लडाखचे जगप्रसिद्ध 'पश्मिना' (Pashmina), सुंदर शाली आणि तिथल्या हाताच्या अप्रतिम कलाकुसरीची जादू सध्या