Bigg Boss Marathi Suraj Chavan : सूरजने ‘ते’ शब्द खरे करून दाखवले! Bigg Boss ची ट्रॉफी घेऊन आधी गेला जेजुरीला, नंतर बारामतीत जंगी स्वागत, व्हिडिओ पाहा

गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात 'झापूक झुपक', म्हणजेच सूरज चव्हाण हे नाव चांगलचं गाजलंय. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात सहभाग घेतल्यावर हा ‘गुलीगत किंग’ एवढी मोठी बाजी मारेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. मात्र, पहिल्या आठवड्यापासूनच त्याचा चाहतावर्ग त्याला भक्कम पाठिंबा देत होता. इतकचं नव्हे तर, ‘बिग बॉस’मध्ये प्रवेश केल्यापासून त्याला संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षक मोठ्या प्रमाणात वोटिंग आणि भरभरून साथ देऊन सकारात्मक प्रतिसाद देऊ लागले. अखेर या सगळ्याची पोचपावती ७० दिवसांनी ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीच्या रुपात सूरजला मिळाली.


सुरुवातीला ‘बिग बॉस’मध्ये ( Bigg Boss Marathi ) अभिजीत सावंतशी संवाद साधताना सूरजने “यंदाची ट्रॉफी मीच जिंकणार” असं वक्तव्य केलं होतं. ट्रॉफी जिंकलो की, “ट्रॉफी हातात घेऊन सर्वात आधी मी खंडोबाला माझ्या पप्पांकडे जाणार… त्यानंतर, मी आई मरीमातेकडे जाणार इच्छा पूर्ण होऊ द्या पप्पा… ओम नम:शिवाय” असं सूरजने अभिजीतला सांगितलं होतं आणि अगदी खरंच महाराष्ट्राला आज हे शब्द त्याने खरे करून दाखवले आहेत.



ट्रॉफी घेऊन सूरज पोहोचला जेजुरीला


मुंबईत सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेऊन सूरज चव्हाण त्याच्या गावी रवाना झाला. पण, आधीच सांगितल्याप्रमाणे सूरजने सर्वात आधी जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेतलं. जेजुरीच्या गडावर जाऊन त्याने आशीर्वाद घेतले. यानंतर बारामतीच्या मोढवे गावी त्याच्या स्वागतासाठी जंगी तयारी करण्यात आली होती. जेजुरी, मोरगावच्या मोरेश्वराचं दर्शन घेऊन सूरज आता मोढवे गावी पोहोचला आहे.




 सूरजचं त्याच्या गावी स्वागत होत असल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्याच्या गावात त्याची विजयी मिरवणूक काढण्यात आली. झापुक झुपूक करणाऱ्या सूरजला बऱ्याच दिवसांनी गावी परतताना पाहून त्याचे चाहते देखील आनंदी झाले होते. सूरजबरोबर फोटो काढण्यासाठी संपूर्ण गावात गर्दी झाली होती.


गावी पोहोचल्यावर सूरजचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर त्याने सर्वांची भेट घेऊन गेले ७० दिवस सपोर्ट केल्याबद्दल खूप आभार मानल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय. सध्या संपूर्ण कलाविश्वातून ‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) प्रेक्षकांसह सूरज चव्हाणवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.


Comments
Add Comment

Kaun Banega Crorepati : स्वप्न सत्यात उतरलं! KBC च्या मंचावर भूषण ठाकरे ठरला या सीजनचा पहिला करोडपती

मुंबई :  जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर एखादी व्यक्ती किती मोठे यश मिळवू शकते, याचे उदाहरण जळगावच्या 28 वर्षीय

महागुरु सचिन पिळगावकरांना मानद डॉक्टरेट! ग्वाल्हेरच्या ITM विद्यापीठाकडून गौरव

Sachin Pilgaonkar Doctorate University: मराठी चित्रपटसृष्टीतील महागुरुंचा ग्वालेरमध्ये डॉक्टर ऑफ लिट्रेचर पदवीने गौरव करण्यात आला आहे.

Nitesh Rane : ‘सिरीयल किलर’ नाटकाच्या 100 व्या प्रयोगाला मंत्री नितेश राणे यांची खास उपस्थिती; टीमचे केले कौतुक

मुंबई : मराठी रंगभूमीवरील ‘सिरीयल किलर’ या नाटकाने 100 प्रयोगांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. मुंबईतील दादर

गोव्यात IFFI महोत्सवात महाराष्ट्राचे विशेष दालन; चित्रनगरीच्या 50 वर्षांचा गौरव

गोवा: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट

KBC मधील पंजाबवरील प्रश्नामुळे वाद; अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्हीला कायदेशीर नोटीस

Kaun Banega Crorepati: महानायक अमिताभ यांचा कौन बनेगा करोडपती या सोनी टीव्हीवरील शोमुळे खुद्द बिग बी आणि चॅनेल दोघांच्या

Krrish 4: हृतिक रोशनच्या 'क्रिश 4' ला मिळणार भव्य रूप? नमित मल्होत्रा यांच्यासोबत चर्चा सुरू

Krrish 4: हृतिक रोशनच्या 'क्रिश' या चित्रपटाच्या पुनरागमनाची चर्चा गेल्या काही काळापासून सुरू आहे. आता 'क्रिश 4'