परतीच्या पावसाने मुंबई, नवी मुंबईला झोडपले

मुंबई : परतीच्या पावसाने जाता जाता रौद्र रुप दाखविण्यास सुरुवात केली असून गुरुवारी सांयकाळनंतर मुसळधार पावसाने मुंबई शहर, उपनगर व नवी मुंबईला झोडपून काढले आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेल, उरणच्या काही भागात पाऊस जोरदार पडला आहे.


मुंबईत विविध ठिकाणी सांयकाळी आठनंतर पावसाने सुरुवात केली. तब्बल दीड तास संततधार पाऊस पडल्यानंतर पावसाने रौद्र रुप दाखविण्यास सुरुवात केली. मुंबईतील वीजाचा कडकडाट व ढगांचा गडगडाट पहावयास मिळाला. घरी परतणाऱ्यांचे या पावसामुळे हाल झाले. पावसामुळे रेल्वे सेवेवरही परिणाम झाला. फेरीवाल्यांनाही आपला धंदा आटोपता घेऊन मिळेल त्या ठिकाणी आश्रय घ्यावा लागला. बससेवेवरही या पावसाचा परिणाम झाल्याने रिक्षा व टॅक्सी या खासगी वाहनांचा मुंबईकरांना आधार घ्यावा लागला. या पावसाने तब्बल तीन ते चार तास झोडल्याने मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले आहेत.


नवी मुंबईमध्ये वाशी, नेरूळ, सानपाडा, ऐरोली, कोपरखैराणे, बेलापूर, घणसोली भागात रात्री सातनंतर तब्बल तीन ते चार तास सलग पाऊस पडला. मुसळधार पावसासोबत वीजा कडाडत असल्याने नवी मुंबईकरांची तारांबळ उडाली. नवरात्रीच्या अनेक देवी मंडपामध्ये पाणी घुसल्याने कार्यकर्त्यांची धावपळ उडाली. नवरात्रीच्या अखेरच्या दिवसांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने गरबाप्रेमींची निराशा झाली असून त्यांना घरी जावे लागले आहे. अंर्तगत रस्त्यावर पाणी तुंबले असल्याने वाहने काढताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागली आहे. सानपाडा मार्गे ठाणे बेलापूर रोडकडे जाताना पुलाखाली पाणी साचले होते. शिरवणेतील गणपती मंदिराजवळील पुलाखालीही पाणी तुंबले होते.

Comments
Add Comment

Powai Lake : पवई तलावावर 180 मीटर लांबीचा म्युझिकल फाउंटन; महाराष्ट्राचा इतिहास आणि संस्कृती पाहता येणार

मुंबई : मुंबईतील पवई तलावाच्या सौंदर्यात आता अत्याधुनिक म्युझिकल फाउंटनची भर पडली आहे. 180 मीटर लांबीच्या या

Mumbai Police : मुंंबई पोलिसांना मिळणार OR कोड असलेले स्मार्ट ओळखपत्र

Mumbai News: पोलीस अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या तोतया पोलिसांना आळा घालण्यासाठी मुंबई

Mercedes Benz India: मुंबईत क्लासिक कार रॅलीचा जल्लोष! नेहरूंची ऐतिहासिक मर्सिडीज पाहून प्रताप सरनाईकही भारावले

मुंबई: मर्सिडीज-बेंझ इंडिया आणि ऑटोकार इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मर्सिडीज-बेंझ क्लासिक कार रॅली 2026’चा

Mumbai Water: मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी BMCचा नवा प्लॅन, भांडुपमध्ये 2 हजार MLD क्षमतेचे नवे जलशुद्धीकरण केंद्र

मुंबई: मुंबई शहराचा पाणीपुरवठा सुरळितपणे सुरू राहण्‍यासाठी भांडुप संकुल येथे 2 हजार दशलक्ष लीटर (MLD) प्रतिदिन

मुंबई सेंट्रलमध्ये इमारतीला भीषण आग; 8 जणांची सुखरूप सुटका, अग्निशमन अधिकारी जखमी

मुंबई सेंट्रलमधील गिल्डर लेन येथील एका निवासी इमारतीला रविवारी मध्यरात्रीनंतर भीषण आग लागली. या आगीत वृद्ध

Yachting Championship: समुद्राच्या लाटांवर रंगली यॉटिंगची स्पर्धा; 121 नौकानयनपटूंनी दाखवले कौशल्य

मुंबईच्या समुद्रकिनारी राष्ट्रीय यॉटिंग स्पर्धेचा उत्साह पाहायला मिळाला. देशातील विविध भागांतून आलेल्या