Raj Thackeray : दसरा मेळाव्यात आवाज कुणाचा?

शिंदेंची तोफ आणि राजवाणी समोर मशाल पेटणार का ?


मुंबई: यंदाही दरवर्षीप्रमाणे ठाकरे आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात, ठाकरे गटाचा दसरा मेळावा तर शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे. मेळाव्याची दोन्ही गटाकडून जोरदार तयारी देखील सुरु झाली आहे. आता मात्र राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे.


दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच उद्या मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) जनतेशी संवाद साधणार आहेत. पॉडकास्टच्या माध्यमातून राज ठाकरे महाराष्ट्रातील जनतेशी साधणार संवाद आहेत. पॉडकास्टच्या माध्यमातून निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे जनतेसमोर आपलं मत मांडणार आहेत. त्यामुळे ठाकरे, शिंदे यांच्यासोबत 'राज' वाणीचा आवाजही आता घुमणार, असून शिंदे आणि राज ठाकरे यांच्या समोर उबाठाची मशाल पेटणार का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.



आजच्या वृत्तपत्रांच्या फ्रंट पेजला जाहिराती-


राज ठाकरेंच्या आजच्या अनेक वृत्तपत्रात पहिल्याच पानावर जाहीरात आहेत. यामध्ये माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो...चला पूर्वीसारखा राजकीय सुसंस्कृत आणि सर्व राज्यांपेक्षा प्रगत महाराष्ट्र उभारुया...मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा...असं राज ठाकरेंच्या जाहीरातीमध्ये म्हटलंय.


विधानसभा निवडणुकांचं राज ठाकरे यांनी रणशिंग फुंकलं असून मनसेचे ७ उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर, लातूर ग्रामीणमधून संतोष नागरगोजे, पंढपूरमधून दिलीप धोत्रे, चंद्रपूरमधून मनदीप रोडे, हिंगोलीतून बंडू कुटे, राजुता येथून सचिन भोयर, आमि वणी मतदारसंघातून राजू उंबरकर यांना मनसेकडून आगामी विधानसभेसाठी तिकीट देण्यात आलंय. त्यामुळे उद्या होणाऱ्या या पॉडकास्टमध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.



राज ठाकरेंनी घोषित केलेले मनसेचे ७ उमेदवार


१. बाळा नांदगावकर - शिवडी, मुंबई
२. लातूर ग्रामीण - संतोष नागरगोजे
३. दिलीप धोत्रे - पंढरपूर
४. चंद्रपूर - मनदीप रोडे
५. हिंगोली विधानसभा - बंडू कुटे
६. राजुरा - सचिन भोयर
७. वणी - राजू उंबरकर


Comments
Add Comment

Powai Lake : पवई तलावावर 180 मीटर लांबीचा म्युझिकल फाउंटन; महाराष्ट्राचा इतिहास आणि संस्कृती पाहता येणार

मुंबई : मुंबईतील पवई तलावाच्या सौंदर्यात आता अत्याधुनिक म्युझिकल फाउंटनची भर पडली आहे. 180 मीटर लांबीच्या या

Mumbai Police : मुंंबई पोलिसांना मिळणार OR कोड असलेले स्मार्ट ओळखपत्र

Mumbai News: पोलीस अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या तोतया पोलिसांना आळा घालण्यासाठी मुंबई

Mercedes Benz India: मुंबईत क्लासिक कार रॅलीचा जल्लोष! नेहरूंची ऐतिहासिक मर्सिडीज पाहून प्रताप सरनाईकही भारावले

मुंबई: मर्सिडीज-बेंझ इंडिया आणि ऑटोकार इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मर्सिडीज-बेंझ क्लासिक कार रॅली 2026’चा

Mumbai Water: मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी BMCचा नवा प्लॅन, भांडुपमध्ये 2 हजार MLD क्षमतेचे नवे जलशुद्धीकरण केंद्र

मुंबई: मुंबई शहराचा पाणीपुरवठा सुरळितपणे सुरू राहण्‍यासाठी भांडुप संकुल येथे 2 हजार दशलक्ष लीटर (MLD) प्रतिदिन

मुंबई सेंट्रलमध्ये इमारतीला भीषण आग; 8 जणांची सुखरूप सुटका, अग्निशमन अधिकारी जखमी

मुंबई सेंट्रलमधील गिल्डर लेन येथील एका निवासी इमारतीला रविवारी मध्यरात्रीनंतर भीषण आग लागली. या आगीत वृद्ध

Yachting Championship: समुद्राच्या लाटांवर रंगली यॉटिंगची स्पर्धा; 121 नौकानयनपटूंनी दाखवले कौशल्य

मुंबईच्या समुद्रकिनारी राष्ट्रीय यॉटिंग स्पर्धेचा उत्साह पाहायला मिळाला. देशातील विविध भागांतून आलेल्या