Naad The Hard Love : 'नाद' चित्रपटाचा अ‍ॅक्शनपॅक्ड ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : मराठी चित्रपटांची (Marathi Cinema) परंपरा खऱ्या अर्थाने जपत रसिकांचे परिपूर्ण मनोरंजन करणारा 'नाद - द हार्ड लव्ह' (Naad The Hard Love) हा मराठी चित्रपट २५ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात काय पाहायला मिळणार याची चुणूक दाखवणाऱ्या टिझरनंतर रिलीज (Teaser Release) झालेल्या अ‍ॅक्शनपॅक्ड ट्रेलरने (Trailer) खऱ्या अर्थाने लक्ष वेधण्याचे काम केले आहे. अलिकडच्या काळात मराठी सिनेसृष्टीत (Marathi Industry) बनणाऱ्या विविधांगी आणि नावीन्यपूर्ण चित्रपटांपैकी एक असलेल्या 'नाद - द हार्ड लव्ह'च्या ट्रेलरवर राज्यभरातून प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटत आहेत. चित्रपटाच्या टॅगलाईनसारखाच ट्रेलरही 'हार्ड' असल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरू आहे.


निर्माते संजय पगारे आणि रुपेश दिनकर यांनी शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकरच्या बॅनरखाली 'नाद - द हार्ड लव्ह' चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे निर्मिती व्यवस्थापक रुपाली दिपक पवार आणि वैशाली नितीन पवार आहेत. प्रकाश जनार्दन पवार यांनी 'नाद'चं दिग्दर्शन केलं आहे. 'नाद'ची कथा संतोष दाभोळकर आणि दिपक पवार यांनी लिहिली असून, डॉ. विनायक पवार यांनी पटकथा व संवादलेखन केलं आहे. 'नाद'ची व्याख्या सांगत टिझर प्रदर्शित झाल्यानंतर अ‍ॅक्शनचा धमाका असलेला ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.



चित्रपटाचे स्वरुप काय?


'नाद - द हार्ड लव्ह' हा चित्रपट शीर्षकाप्रमाणेच एक हार्ड लव्हस्टोरी सांगणारा आहे. प्रसंगानुरूप असलेले दमदार आणि रोमँटिक संवाद ट्रेलरमध्ये आहेत. या जोडीला हिंदी आणि दक्षिणात्य चित्रपटांमध्येही आजवर पाहायला मिळाले नसतील अशी लाल मातीतील अ‍ॅक्शन दृश्ये नजर खिळवून ठेवतात. गाण्यांची झलक ट्रेलरमध्ये आहेच, पण रोमँटिक दृश्येही लक्ष वेधतात. प्रेम म्हणजे नेमकं काय? हे आजवर कोणीही सांगू शकलेले नाही. आजतागायत बऱ्याच दिग्दर्शकांनी प्रेमाचे विविध पैलू रूपेरी पडद्यावर सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. 'नाद - द हार्ड लव्ह' या चित्रपटात हार्ड लव्ह म्हणजेच खरंखुरं प्रेम काय असतं ते पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत कधीही न उलगडलेल्या प्रेमाच्या पैलूंसोबतच प्रेमाच्या गुलाबी रंगांमधीलही विविधांगी छटा यात बघायला मिळतील.

Comments
Add Comment

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी