BEST Bus : मिनी बस कंत्राटदार आणि बेस्टच्या वादात प्रवाशांचे हाल!

मुंबई : मोठा गाजावाजा करत बेस्टच्या ताफ्यात समाविष्ठ केलेल्या मिनी बसमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्यामुळे त्या बस आगारातच पडून आहेत. या बिघडलेल्या गाड्या दुरुस्त करण्यास कंत्राटदार नकार देत आहेत. यामुळे बेस्टचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने बेस्टच्या ताफ्यातील या सर्व मिनी बस हटवण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला. परंतु तडकाफडकी घेतलेल्या या निर्णयामुळे मुंबईकरांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत. तसेच या निर्णयामुळे सुमारे १२०० चालक आणि बसची देखभाल करणारे कर्मचारी बेरोजगार झाले आहेत.


मुंबईकर उपनगरीय रेल्वेसह बेस्ट बससेवेलाही प्राधान्य देतात. बेस्ट बसच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा कमी खर्चात सुखकर होणा-या प्रवासात आता गैरसोय होत आहे. मुंबई शहरातील पश्चिम उपनगरे म्हणजेच अंधेरी, गोरेगाव, जोगेश्वरी या ठिकाणी धावणाऱ्या मिनी बस कमी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. बेस्टला वेटलीज सर्विस देणाऱ्या कंपनीने तब्बल २६२ बस मागे घेतल्या आहेत. त्यामुळे मुंबई शहरातील बेस्ट बसची संख्या ३१९५ वरून २९३३ वर पोहोचली आहे. एकाचवेळी ८ टक्के बस संख्येत घट झाल्यामुळे बेस्टने प्रवास करणाऱ्यांचा त्रास यामुळे आणखी वाढला आहे.


बेस्टचे महाप्रबंधक अनिल दिग्गीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंत्राटदार अनेक आर्थिक अडचणींशी सामना करत आहे. त्यामुळे बससेवा सुरु ठेवण्यात अडचणी येत आहेत. या मुद्द्यावर सध्या चर्चा सुरू असून, प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची काळजी देखील घेतली जाणार आहे, असे दिग्गीकर यांनी सांगितले.



१२००हून अधिक चालक कर्मचारी झाले बेरोजगार


दरम्यान, कंत्राटदार आणि बेस्ट प्रशासनाच्या वादात बेरोजगार झालेल्या या १२०० कर्मचाऱ्यांच्या वतीने बेस्टच्या महाप्रबंधकांकडे एक अर्ज करण्यात आला आहे. त्यामध्ये त्यांनी श्रमिकांच्या नोकऱ्यांना सुरक्षितता देत कंत्राटदाराने सेवा पूर्ववत न केल्यास या कर्मचाऱ्यांना बेस्टमध्ये समाविष्ट करून घ्यावे, अशी मागणी केली आहे.

Comments
Add Comment

सांताक्रूझ स्कायवॉकला छत बसवण्याचा प्रस्ताव अद्यापही रखडलेला, BMC स्थायी समितीच्या मंजुरीकडे लक्ष

मुंबई: सांताक्रूझ पूर्वेकडील स्टेशन लगत असणाऱ्या स्कायवॉकचं छत बसवण्यासाठी निविदा काढून अनेक महिने उलटले आहेत.

कचऱ्यापासून 'कॉम्प्रेस्ड बायोगॅस' निर्मितीसाठी टास्क फोर्स स्थापन करा! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील शहरांना कचरामुक्त करण्यासोबतच कचऱ्यापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) निर्मितीला चालना

शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीसाठी तगादा लावल्यास कारवाई, मायक्रो फायनान्स कंपन्यांना महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा

मुंबई: शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीसाठी तगादा लावणाऱ्या बँका, मायक्रो फायनान्स कंपन्या आणि अवैध सावकारांविरोधात

Malad Accident : मुंबईत भीषण अपघात : मालाडमध्ये रिक्षा आणि बाईकच्या धडकेनंतर बसखाली आल्याने ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील मालाड पश्चिम (Malad West) येथील मार्वे रोडवर एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला आहे. एका भरधाव

Nana Patekar : ‘आठवणीतले नाना’ कार्यक्रमातून ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या स्मृतींना उजाळा

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या कलाप्रवासाची आठवण जागवण्यासाठी मुंबईत ‘आठवणीतले नाना’ या विशेष

Mumbai Water Supply : पिण्याच्या पाण्याचा गैरवापर केल्यास होणार कारवाई, महापालिका प्रशासनाने दिला कारवाईचा इशारा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा कोणत्याही ठिकाणी