Navra Maza Navsacha 2 : 'नवरा माझा नवसाचा २'ने कमावला २१ कोटींपेक्षाही अधिक गल्ला!

मुंबई : 'नवरा माझा नवसाचा २' (Navra Maza Navsacha 2) चित्रपट २० सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचा पाचवा आठवडा सुरु झाला आहे. जेव्हापासून या सिनेमाची घोषणा झालेली अगदी तेव्हापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली. पुढे जसजसे सिनेमाचे टीझर आणि ट्रेलर येत गेले तसे या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहू लागले. चित्रपटाने आतापर्यंत तब्बल २१ कोटींपेक्षाही अधिक गल्ला जमवला आहे.

सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या 'नवरा माझा नवसाचा २' या चित्रपटाची निर्मिती, कथा - पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले असून संवादलेखन संतोष पवार यांचे आहे. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे यांच्यासह मोठी स्टारकास्ट आहे. नवस फेडण्यासाठी जातानाचा रेल्वे प्रवास, त्यात होणाऱ्या गमतीजमती हा चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. सोनू निगम, जॉनी लिवर, श्रिया पिळगांवकर हे पाहुण्या कलाकराच्या भूमिकेत असून प्रेक्षकांना हे सरप्राइज पसंतीस पडले आहे.

एकोणीस वर्षानंतर पुन्हा एकदा गणपतीपुळेला निघालेला हा प्रवास थिएटरमध्ये सुद्धा चांगली गर्दी करतोय ही नक्कीच मराठी सिनेसृष्टीसाठी आनंदाची बाब आहे.

Comments
Add Comment

गोव्यात IFFI महोत्सवात महाराष्ट्राचे विशेष दालन; चित्रनगरीच्या 50 वर्षांचा गौरव

गोवा: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट

KBC मधील पंजाबवरील प्रश्नामुळे वाद; अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्हीला कायदेशीर नोटीस

Kaun Banega Crorepati: महानायक अमिताभ यांचा कौन बनेगा करोडपती या सोनी टीव्हीवरील शोमुळे खुद्द बिग बी आणि चॅनेल दोघांच्या

Krrish 4: हृतिक रोशनच्या 'क्रिश 4' ला मिळणार भव्य रूप? नमित मल्होत्रा यांच्यासोबत चर्चा सुरू

Krrish 4: हृतिक रोशनच्या 'क्रिश' या चित्रपटाच्या पुनरागमनाची चर्चा गेल्या काही काळापासून सुरू आहे. आता 'क्रिश 4'

Kartik Aaryan Upcoming Movie: कार्तिक आर्यन बनला निर्माता! वाढदिवशी 'कालिया'ची घोषणा, करण जोहरसोबत नवा प्रोजेक्ट

Kartik Aaryan Upcoming Movie: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा 36 वा वाढदिवस आज, 22 नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. या खास प्रसंगी

Tiger Shroff: महिनाभरानंतर टायगर श्रॉफची दमदार एन्ट्री; पारंपरिक लूकमध्ये ‘देवा श्री गणेशा’वर डान्स

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ऑक्टोबर महिन्यात घडलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर

सस्पेन्स- थ्रिलर Drishyam The Conclusion पाहायचा राहून गेला? आता घरबसल्या पहा, कुठे आणि केव्हा रिलीज होणार चित्रपट

मुंबई: अजय देवगण आणि तब्बूचा 'दृश्यम: द कन्क्लुजन' 2 ऑक्टोबरला बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता. अभिषेक पाठक