Bengaluru : अरे बाप रे! ७ मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे क्षणात कोसळली; ७ जणांचा मृत्यू

Bengaluru : कर्नाटकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे २२ ऑक्टोबर रोजी बेंगळुरूमध्ये एक बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली. कर्नाटकमधील बाबूसापल्य परिसरामध्ये इमारत कोसळल्यानंतर आणखी ६ मृतदेह बाहेर काढण्यात आले. अपघातात झालेल्या मृतांची संख्या सात झाली आहे. २१ जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. एका मजुराचा २२ ऑक्टोबरच्या रात्री मृतदेह सापडला. १३ कामगारांना वाचवण्यात यश आलं असून सहा जण जखमी झाले आहेत.


एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितल की, ज्यांच्या नावावर इमारत बांधली जात होती भवन रेड्डी आणि कंत्राटदार मुनियप्पा यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या अधिकाऱ्याने सांगितले की, या इमारतीत केवळ ४ मजले बांधण्यास परवानगी देण्यात आली होती, मात्र ७ मजले बांधले जात आहेत. एनडीआरएफच्या पथकाने ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी रात्रभर बचावकार्य केले. आज सकाळी श्वानपथक पथकालाही पाचारण करण्यात आले. टीमने ढिगारा हटवण्यासाठी मोठ्या मशिन्ससुद्धा मागवल्या आहेत.


कर्नाटकात इमारत कोसळल्यानंतर राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेसवर विरोधी पक्ष जेडीएसने बेंगळुरूची दुर्दशा निर्माण केल्याचा आरोप केला आहे. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले की, दुबई आणि दिल्लीत काय चालू आहे ते तुम्ही पाहिलं असेलच. देशाच्या विविध भागांत हीच परिस्थिती आहे. आपण निसर्गाला रोखू शकत नाही, परंतु आपण व्यवस्थापन करत आहोत.



बेकायदेशीरपणे इमारत बांधली जात आहे


कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार मंगळवारी रात्री घटनास्थळी पोहोचले होते. २१ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची त्यांनीच माहिती दिली. ६०/४० जागेवर बेकायदेशीरपणे इमारत बांधली जात असल्याचं त्यांनी सांगितले. यावेळी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.






बिहारमधील ३ मृत


अतिरिक्त आयुक्त म्हणाले की, ५ मृतांपैकी ३ मजूर बिहारचे होते, त्यांची नावे हरमन (२६), त्रिपाल (३५), मोहम्मद साहिल (१९) अशी आहेत. त्याच वेळी, सत्य राजू (२५) आणि शंकर यांची माहिती अद्याप समोर आलेली नाही.



गेले तीन दिवस कर्नाटकात पाऊस


गेल्या ३ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बंगळूरसह कर्नाटकातील अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झालं आहे. उत्तर बंगळूरच्या येलाहंका आणि आसपासच्या अनेक भागात पूर आलाय. येलहंकामधील मध्य विहार कंबरभर पाण्याने भरले आहे. मदत आणि बचाव कर्मचाऱ्यांनी बोटीच्या मदतीने लोकांना बाहेर काढले आहे.


Comments
Add Comment

Bullet Train News : बुलेट ट्रेन प्रकल्पाची मोठी झेप : साबरमती नदीवर उभारला ४८० मीटर लांब अन् ३६ मीटर उंच भव्य पूल

अहमदाबाद : देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन (Mumbai Ahemdabad Bullet Train)  प्रकल्पाच्या कामाला वेगाने गती मिळत असून, या

Mumbai Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला मोठं यश; साबरमती नदीवरील 12 मजली उंचीचा पूल तयार

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. अहमदाबादमधील साबरमती नदीवर

Vivo V80 Phone: 7200mAh दमदार बॅटरी, 144Hz डिस्प्लेसह विवोचा नवा 5G फोन येतोय; भारतात केव्हा लाँच होणार?

मुंबई: जर तुम्ही नवा मोबाईल घेण्याच्या विचारात असाल तर, थांबा... Vivo कंपनीकडून V सीरीजमधील एक नवा कोरा मोबाईल लाँच

कर्तव्य, धैर्य अन् त्याग! फ्लायदुबई घटनेनंतर उजळल्या नीरजा भानोत यांच्या शौर्याच्या आठवणी

बुधवारी (३० सप्टेंबर २०२६) फ्लायदुबई FZ1073 विमानात झालेला थरार कोणीही विसरू शकत नाही. विमानाचे कॅप्टन स्मित मच्छार

Flydubai Incident : ओमानमध्ये बंदी, बॅगमध्ये फ्री पॅलेस्टाईनच्या चिठ्ठ्या अन्....स्मित मच्छार यांच्यावर हल्ला करणाऱ्याची ओळख पटली, हादरवणारी माहिती समोर

Flydubai Incident : दुबईवरुन इस्त्रायलच्या तेल अवीवला जाणारे फ्लाय दुबईचे (Fly dubai) प्रवासी विमान क्रॅश होण्यापासून वाचवणारे

Captain Smit Machchhar: 174 प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या वैमानिक स्मित माच्छर यांना अशोक चक्र पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी

नवी दिल्ली: इस्त्राईल- तेल अवीवला घेऊन जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' कंपनीच्या विमानात वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर