दिग्गज राजकारण्यांच्या उपस्थितीत Anirudh- Kavya Maran चा शाही रिसेप्शन सोहळा; पाहा Photos

संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रन आणि सनरायझर्स हैदराबादची सीईओ काव्या मारन यांच्या चेन्नईतील ग्रँड रिसेप्शन सोहळ्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्यासह अनेक दिग्गज मंडळींच्या उपस्थितीत रंगलेला हा सोहळा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

1/6 लोकप्रिय गायक- संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रन आणि सनरायझर्स हैदराबादच्या सह मालकिण- सीईओ काव्या मारन यांचा अलीकडेच ग्रीसमध्ये ग्रँडपद्धतीने लग्नसोहळा पार पडला. आता लग्नानंतर या स्वीट कपलच्या शाही रिसेप्शन सोहळ्याची चांद्यापासून बांद्यापर्यंत तुफान चर्चा रंगली आहे. काल, 21 नोव्हेंबर शनिवारी चेन्नईमध्ये रिसेप्शन सोहळा पार पडला. या खास सोहळ्यासाठी फक्त टॉलिवूड सेलिब्रिटींनीच नाही तर, देशातील अनेक मातब्बर राजकारण्यांनीही ह्या रिसेप्शन सोहळ्याला उपस्थिती लावली होती.

2/6 सर्वांच्याच लूकने अनिरूद्ध आणि काव्याच्या रिसेप्शन सोहळ्याला चार चाँद लावले होते. हा रिसेप्शन सोहळा चेन्नईतील आयटीसी ग्रँड चोला हॉटेलमध्ये रंगला. या खास सोहळ्यासाठी तामिळनाडूसह देशातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते. सर्वांचेच फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी नवविवाहित जोडप्याला आयुष्यातील नव्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या.

3/6 देशाचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी शनिवारी चेन्नईमध्ये झालेल्या संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रन आणि सनरायझर्स हैदराबादची सहमालकिन काव्या मारन यांच्या शाही रिसेप्शन सोहळ्याला हजेरी लावली होती.

4/6 केरळम राज्याचे मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांनी सुद्धा शनिवारी अनिरुद्ध आणि काव्याच्या रिसेप्शन सोहळ्याला उपस्थिती लावत नवविवाहित दाम्पत्याला आयुष्यातील नव्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या.

5/6 तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सुद्धा शनिवारी झालेल्या रिसेप्शन सोहळ्याला उपस्थिती लावत अनिरुद्ध आणि काव्या या नवविवाहित दाम्पत्याला आयुष्यातील नव्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या.

6/6 तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, डीएमके प्रमुख एम. के. स्टॅलिन आणि सुपरस्टार रजनीकांत यांनी नवविवाहित दाम्पत्य असलेल्या अनिरुद्ध आणि काव्या यांच्यासोबत खास शैलीमध्ये एक ग्रुप फोटो काढला. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Comments
Add Comment

Kota-Udaipur Accident: खाटू श्यामजींच्या दर्शनावरून परतताना काळाचा घाला! धुळ्यातील एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू

खाटू श्यामजींचे दर्शन घेऊन परतत असताना महाराष्ट्रातील एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. रविवारी मध्यरात्री

Yuzvendra Chahal in BJP: क्रिकेटपटू युजवेंद्र चहलचा भाजपमध्ये प्रवेश; ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत विशेष निमंत्रित म्हणून निवड

भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल याने शनिवारी (२१ नोव्हेंबर) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजप ओबीसी

पंतप्रधानांचं सहा महिन्यांपूर्वीचं विधान अखेर खरं ठरलं, सोनं खरेदीबद्दल PM मोदी नेमकं काय म्हणाले होते?

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लखनौमध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली होती, यावेळी त्यांनी सहा

JEE Main 2027 : Session 1 साठी नोंदणी उद्या संपणार; चुकवू नका ही शेवटची संधी

JEE Main 2027 Session 1 परीक्षेसाठी नोंदणी करण्याची मुदत उद्या, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी संपणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेने (NTA)

घरात बनवलेले नूडल्स ठरले जीवघेणे; 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, मोठी बहीण गंभीर

घरात बनवलेल्या नूडल्सने एका कुटुंबाचा घास घेतला आहे. नूडल्स खाल्ल्यानंतर ७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून तिची

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग; सुरत-बिलीमोरा मार्गावर वीज यंत्रणा सुरू

देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या दिशेने आणखी एक मोठं पाऊल पडलं आहे. मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल