Cyclone Dana : पूर्व किनापट्टीवर धडकले दाना चक्रीवादळ!

ओडिशा, बंगालमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस


१४ जिल्ह्यांमधील सुमारे दहा लाख लोकांचे केले स्थलांतर


भुवनेश्वर : ‘दाना’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशा आणि बंगालमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशाच्या बहुतांश भागांतून नैऋत्य मौसमी पाऊस माघारी फिरला असताना आता पूर्व किनारपट्टीवर या वेगवान वादळाचा धोका निर्माण झाला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले ‘दाना’ चक्रीवादळ आता ओडिशाच्या किनारपट्टीपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे आज मध्यरात्रीनंतर ते ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकणार असा अंदाज आहे. दरम्यान किनारपट्टी भागात याचा परिणाम सुरू झाला असून ताशी ७० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. तर चक्रीवादळानंतर वाऱ्याचा वेग ताशी १०० किलोमीटरपेक्षाही अधिक असेल.


बंगालच्या उपसागरात उगम पावलेले ‘दाना’ हे चक्रीवादळ ओडिशातील भितरकनिका राष्ट्रीय उद्यान आणि धामरा बंदराजवळ उतरेल. ही प्रक्रिया किमान पाच तास तरी चालेल आणि त्यानंतर ओडिशाच्या उत्तरेकडील भागातून हे चक्रीवादळ ताशी १२० किलोमीटर वेगाने पुढे जाईल. दरम्यान, या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे. ओडिशातील १४ जिल्ह्यांमध्ये सुमारे दहा लाख लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. या चक्रीवादळामुळे दोन दिवसांपासून विमानाची अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. तर रेल्वेदेखील रद्द करण्यात आल्या आहेत. पर्यटकांना येथून परत पाठवण्यात आले आहे.


दरम्यान, महाराष्ट्रात देखील पुढील २४ तासांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.



‘दाना’मुळे विमान सेवेवर १६ तासांसाठी बंदी


'दाना' या वादळामुळे ५०० हून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. विमानांना १६ तासांसाठी बंदी घालण्यात आली आहे. 'दाना' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफने ओडिशा आणि पश्चिम बंगालसह पाच राज्यांमध्ये एकूण ५६ टीम तैनात केल्या आहेत. डॉक्टरांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या असून त्यांना त्यांच्या संबंधित आरोग्य केंद्रात परत बोलावण्यात आले आहे.



महाराष्ट्रातील काही भागात हलक्या सरी बरसण्याची शक्यता


'दाना' चक्रीवादळाचा चार राज्यांना धोका आहे. तर महाराष्ट्रातही ऑक्टोबर महिन्यात पाऊस पडत आहे. मुंबईतील काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर येत्या २ ते ३ दिवसात महाराष्ट्रातील काही भागात हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Haryana Dowry Case: ९.५ लाखांची कार नाकारली, १३ लाखांची ब्रेझा मागितली; कार न मिळाल्याने लग्न मोडलं

हरियाणाच्या सोनिपतमध्ये नवरदेवाने मारुती ब्रेझा कारची मागणी पूर्ण न झाल्याने ठरलेलं लग्न मोडल्याची घटना घडली.

हाय स्पीड बुलेट ट्रेनचं काम कुठपर्यंत आलं? कधीपासून येणार प्रवाशांच्या सेवेत; रेल्वेमंत्र्यांनी दिली अपडेट

[caption id="attachment_1077702" align="aligncenter" width="800"] रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती दिली

दिग्गज राजकारण्यांच्या उपस्थितीत Anirudh- Kavya Maran चा शाही रिसेप्शन सोहळा; पाहा Photos

[caption id="attachment_1077649" align="aligncenter" width="800"] लोकप्रिय गायक- संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रन आणि सनरायझर्स हैदराबादच्या सह मालकिण- सीईओ

Kota-Udaipur Accident: खाटू श्यामजींच्या दर्शनावरून परतताना काळाचा घाला! धुळ्यातील एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू

खाटू श्यामजींचे दर्शन घेऊन परतत असताना महाराष्ट्रातील एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. रविवारी मध्यरात्री

Yuzvendra Chahal in BJP: क्रिकेटपटू युजवेंद्र चहलचा भाजपमध्ये प्रवेश; ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत विशेष निमंत्रित म्हणून निवड

भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल याने शनिवारी (२१ नोव्हेंबर) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजप ओबीसी

पंतप्रधानांचं सहा महिन्यांपूर्वीचं विधान अखेर खरं ठरलं, सोनं खरेदीबद्दल PM मोदी नेमकं काय म्हणाले होते?

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लखनौमध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली होती, यावेळी त्यांनी सहा