माजी आमदार तृप्ती सावंत यांची भाजपाला सोडचिठ्ठी देत मनसेतून उमेदवारी

मुंबई : मनसेने वांद्रे पूर्व विधानसभेतून आपला उमेदवार जाहीर केला असून, या उमेदवारामुळे महायुतीला मोठा फटका बसणार असल्याचे बोललं जातंय.


माजी आमदार आणि भाजपाच्या मुंबई उपाध्यक्ष तृप्ती सावंत यांनी मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी त्यांनी मनसेत प्रवेश केला. त्याचवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तृप्ती सावंत यांना एबी फॉर्म दिला. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून त्या निवडणूक लढविणार आहेत.


महाविकास आघाडीतर्फे वरुण सरदेसाई तर महायुतीतर्फे झिशान सिद्दिकी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विशेष म्हणजे मनसेकडून तृप्ती सावंत आता निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने इथे तिहेरी लढत होणार आहे.


भाजपामधून मनसेमध्ये प्रवेश करणाऱ्या तृप्ती सावंत या माजी आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी असून, त्या २०१९मध्ये देखील विधानसभेच्या रिंगणात अपक्ष उतरल्या होत्या. तृप्ती सावंत यांनी अपक्ष निवडणूक लढवल्याने त्याचा मोठा फटका शिवसेनेला बसला होता. तर काँग्रेसला त्याचा फायदा झाला आणि या जागेवरून झिशान सिद्धिकी निवडून आले होते. त्यानंतर तृप्ती सावंत यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता.


आमदार बाळा सावंत यांच्या निधनानंतर वांद्रे पूर्व येथे २०१५ मध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली होती. या निवडणुकीत त्या विजयी झाल्या होत्या. आता २०२४ मध्ये पुन्हा एकदा तृप्ती सावंत निवडणुकीच्या रिंगणात असल्याने या निवडणुकीत त्याचा फटका कोणाला बसतो, याचे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे.

Comments
Add Comment

Mumbai Book Festival: मुंबईत २४ नोव्हेंबरपासून पुस्तक महोत्सव; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : पुस्तकप्रेमी, साहित्यिक आणि वाचकांसाठी मुंबईत येत्या २४ नोव्हेंबरपासून सहा दिवसांचा पुस्तक महोत्सव

Maharashtra State Government Decision: क्राईम ब्रँच, आर्थिक गुन्हे शाखेला आता पोलीस ठाण्याचा दर्जा; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला (क्राईम ब्रँच) आणि आर्थिक गुन्हे शाखेला (ईओडब्ल्यू) आता अधिकृतपणे पोलीस

Anti-Narcotics Van: अमली पदार्थांविरोधी मोहिमांसाठी मुंबई पोलिसांना ‘अँटी-नार्कोटिक्स व्हॅन’

मुंबई : अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री रोखण्यासह गुन्ह्यांच्या तपासातील त्रुटी दूर करण्यासाठी मुंबई

Kurla Crime: कुर्ल्यात तरुण जोडप्याला हॉकी स्टिक, बेल्टने मारहाण; 8 अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल

कुर्ला येथील एका बागेत किशोरवयीन जोडप्याला मारहाण केल्याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी आठ मुलांना ताब्यात घेतले

Shiv Sena Blood Donation Camp: रक्ततुटवड्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुंबईत रक्तदान अभियान

मुंबई : गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या सामाजिक जबाबदारीतून शिवसेना रविवारी, 22 नोव्हेंबरपासून

पवई तलावावर साकारलंय देशातील सर्वात भव्य म्युझिकल फाउंटन, लाईट अँड साउंड शोमधून उलगडणार मराठ्यांच्या शौर्यगाथा!

मुंबई: मुंबईतील पर्यटनामध्ये भर घालण्यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य