Anti-Narcotics Van: अमली पदार्थांविरोधी मोहिमांसाठी मुंबई पोलिसांना ‘अँटी-नार्कोटिक्स व्हॅन’

देशातील पहिल्या अत्याधुनिक व्हॅनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण; एआय आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर

मुंबई : अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री रोखण्यासह गुन्ह्यांच्या तपासातील त्रुटी दूर करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या ताफ्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त सुविधांची भर पडली आहे. देशातील पहिली ‘अँटी-नार्कोटिक्स व्हॅन’, अत्याधुनिक ‘फ्युजन सेंटर’ आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित ‘तपास सारथी’ प्रणाली अशा नव्या सुविधांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी लोकार्पण करण्यात आले. अमली पदार्थांविरोधातील कारवाईपासून ते गुन्ह्यांच्या तपासातील पुरावे सुरक्षित ठेवण्यापर्यंतच्या प्रक्रियेत या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे.(Mumbai Police Anti-Narcotics Cell)


यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आजकाल 30 ते 35 हजार लोकांच्या उपस्थितीत मोठे कार्यक्रम होतात. अशा ठिकाणी अनुचित प्रकार रोखण्यासाठी आणि तरुणांमध्ये जरब बसवण्यासाठी ही अँटी-नार्कोटिक्स व्हॅन अत्यंत उपयुक्त ठरेल. ड्रग्स डीलर किंवा संबंधितांवर कारवाई करताना पंचनामा, कॅमेरा रेकॉर्डिंग आणि पुराव्यांचे संकलन या व्हॅनच्या माध्यमातून योग्य पद्धतीने होईल. विशेष म्हणजे, गोळा केलेले पुरावे ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुरक्षित साठवले जातील. ‘नशामुक्त भारत’ आणि ‘नशामुक्त महाराष्ट्र’ या मोहिमांसाठी राज्याच्या इतर भागांतही अशा व्हॅन्स तयार केल्या जातील", असेही त्यांनी सांगितले.






गुन्ह्यांच्या तपासात तांत्रिक त्रुटींमुळे आरोपी निर्दोष सुटू नयेत, यासाठी सरकार ‘तपास सारथी’ ही प्रणाली विकसित करत आहे. एफआयआरपासून ते आरोपपत्र आणि पुरावे व्यवस्थापनापर्यंतची संपूर्ण साखळी एआयच्या मदतीने एकाच दुव्यात आणली जात आहे. आता 60 ते 90 दिवसांत आरोपपत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेचे देशभरात निरीक्षण केले जाते आणि त्यावर राज्याचे क्रमवारीत स्थान ठरते. हजारो पानांचे आरोपपत्र तयार करताना पुराव्यांची साखळी कशी असावी, यासाठी न्यायालयाचे जुने निर्णयही या प्रणालीत समाविष्ट केले जात आहेत. नवीन कायद्यांनुसार डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे ग्राह्य धरले जात असल्याने ‘हॅश व्हॅल्यू’च्या आधारे संपूर्ण प्रक्रिया सुरुवातीपासून शेवटपर्यंत डिजिटल करण्यावर भर दिला जात आहे. मुंबई पोलिसांनी देशात नेहमीच आपली वेगळी ओळख निर्माण केली असून, जागतिक स्तरावरही त्यांची कीर्ती आहे. आता सीसीटीव्ही, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन, डेटा विश्लेषण, सोशल मीडिया आणि डार्क नेटचे विश्लेषण करून घडणारे तसेच घडू शकणारे गुन्हे रोखण्यासाठी मुंबई पोलीस अधिक सज्ज झाले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.(Drug-Free Mumbai)





अँटी-नार्कोटिक्स व्हॅनची वैशिष्ट्ये


अमली पदार्थविरोधी कारवाईदरम्यान घटनास्थळावरील पंचनामा, चित्रिकरण आणि पुराव्यांचे संकलन एकाच ठिकाणी करता यावे, या उद्देशाने अँटी-नार्कोटिक्स व्हॅन तयार करण्यात आली आहे.


या प्रक्रियेत संकलित झालेल्या पुराव्यांची सुरक्षितता आणि विश्वासार्हता राखण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. दुसरीकडे, ‘तपास सारथी’ प्रणालीमुळे गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपपत्र दाखल करण्यापर्यंतच्या प्रक्रियेवर तंत्रज्ञानाच्या मदतीने लक्ष ठेवता येणार आहे.


सायबर गुन्हे, सोशल मीडिया आणि डार्क नेटच्या माध्यमातून होणाऱ्या गुन्हेगारी कारवायांचे स्वरूप बदलत असताना पोलिसांच्या तपासात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर या सुविधांमधून भर देण्यात आला आहे.(Drug Prevention Campaign)

Comments
Add Comment

Kurla Crime: कुर्ल्यात तरुण जोडप्याला हॉकी स्टिक, बेल्टने मारहाण; 8 अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल

कुर्ला येथील एका बागेत किशोरवयीन जोडप्याला मारहाण केल्याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी आठ मुलांना ताब्यात घेतले

Shiv Sena Blood Donation Camp: रक्ततुटवड्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुंबईत रक्तदान अभियान

मुंबई : गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या सामाजिक जबाबदारीतून शिवसेना रविवारी, 22 नोव्हेंबरपासून

पवई तलावावर साकारलंय देशातील सर्वात भव्य म्युझिकल फाउंटन, लाईट अँड साउंड शोमधून उलगडणार मराठ्यांच्या शौर्यगाथा!

मुंबई: मुंबईतील पर्यटनामध्ये भर घालण्यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य

उंबरमाळी स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीला धावली ‘लालपरी’, चालक-वाहकाच्या तत्परतेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून कौतुक

मुंबई: मध्य रेल्वेवरील मुंबई मंडळाच्या कसारा स्थानकावरील वाहतूक रात्री नऊ वाजल्यापासून विस्कळीत झाल्यामुळे

Chembur Accident: कर्तव्यावर असतानाच काळाचा घाला! लोखंडी गेट अंगावर कोसळून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

मुंबई : चेंबूर येथील रहेजा अक्रोपोलिस गृहसंकुलातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अ‍ॅडोनिस इमारतीमध्ये लोखंडी

देवनार डम्पिंग ग्राऊंडच्या हायमास्ट कंत्राटावर संशयाची सुई, BMC पालिका प्रशासनाकडून तपासणीचे आश्वासन

मुंबई (विशेष प्रतिनिधी): देवनार डम्पिंग ग्राऊंडवर रात्रीच्या वेळी कचऱ्याचे ढिग लावण्याचे काम हाती घेतले जात