Thane News : ठाणे जिल्हा क्रीडा महोत्सवात हर्षिताला पहिले स्थान!

ठाणे : आनंदीबाई केशव जोशी विद्यालयाच्या ८ वर्षीय हर्षिता विनायक ठोंबरेने तिरंदाजीत (Archery) चमकदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हिंगोली येथे नुकत्याच झालेल्या सातव्या महाराष्ट्र राज्य मिनी तिरंदाजी स्पर्धेत आपल्या वयाच्या दोन वर्षे मोठ्या वयोगटाच्या पारंपरिक भारतीय तिरंदाजी स्पर्धेत लक्ष्यवेध करताना हर्षिताने तिसरे स्थान मिळवले.


त्याआधी कल्याण येथे जगन्नाथ (अप्पासाहेब) शिंदे क्रीडा गौरव समिती आणि ठाणे जिल्हा आट्यापाट्या संघटना आयोजित विविध खेळांच्या पहिल्या ठाणे जिल्हा क्रीडा महोत्सवात हर्षिताने आपल्या वयोगटात पहिले स्थान मिळवत सर्वांना आपली दखल घ्यायला लावली होती. हर्षिता कान्हा आर्चरी ट्रेनिग सेंटरमध्ये श्रीमंत कळणे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाचा कसून सराव करते. हर्षिताच्या या यशाबद्दल शाळेच्या समन्वयिका अंजना कपूर यांनी तिचे विशेष अभिनंदन केले आहे.


स्पर्धेत आपल्या वयाच्या दोन वर्षे मोठ्या वयोगटाच्या पारंपरिक भारतीय तिरंदाजी स्पर्धेत लक्ष्यवेध करताना हर्षिताने तिसरे स्थान मिळवले. त्याआधी कल्याण येथे जगन्नाथ (अप्पासाहेब) शिंदे क्रीडा गौरव समिती आणि ठाणे जिल्हा आट्यापाट्या संघटना आयोजित विविध खेळांच्या पहिल्या ठाणे जिल्हा क्रीडा महोत्सवात हर्षिताने आपल्या वयोगटात पहिले स्थान मिळवत सर्वांना आपली दखल घ्यायला लावली होती. हर्षिता कान्हा आर्चरी ट्रेनिग सेंटरमध्ये श्रीमंत कळणे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाचा कसून सराव करते. हर्षिताच्या या यशाबद्दल शाळेच्या समन्वयिका अंजना कपूर यांनी तिचे विशेष अभिनंदन केले आहे.

Comments
Add Comment

Miraroad Crime: रात्री पार्टीसाठी बोलावलं अन्… काशीगावमधील धक्कादायक प्रकरण, चार आरोपींचा शोध सुरू

मीरा रोड येथील काशीगावमधून सामूहिक बलात्काराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १६ नोव्हेंबर रोजी एका मैत्रिणीने

Thane News : अनधिकृत गौण खनिज उत्खनन भोवले; ठाण्यात 52 जणांसह कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Thane News: ठाणे तालुक्यात अनधिकृत गौण खनिज उत्खनन, साठवणूक आणि वाहतूक केल्याप्रकरणी दंडाची रक्कम न भरणाऱ्या 52 जणांवर

'सत्तेसाठी बाळासाहेबांचा वापर'; उद्धव ठाकरेंवर आनंद परांजपे यांचा हल्लाबोल

ठाणे:  मुख्यमंत्री होण्यासाठी हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेससोबत युती केल्याबद्दल उद्धव

खासगी टँकरच्या पाण्याचे दर ठरवा, GPS ट्रॅकिंग सक्तीचे करा; निरंजन डावखरे यांची मागणी

शहरात सध्या १० टक्के पाणीकपात सुरू आहे. त्यामुळे अनेक भागात पाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. याच

Thane News : कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरकरांनो काळजी घ्या! 19 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून 24 तास पाणीपुरवठा बंद

ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC) बारवी जलशुद्धीकरण प्रकल्पातील देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी

Mumbra Crime: मुंब्रा पोलिसांकडून डिजिटल अरेस्ट रॅकेटचा पर्दाफाश; 71 वर्षीय वृद्धाची 3.55 लाखांची फसवणूक

मुंब्रा पोलिसांनी डिजिटल अरेस्ट या एका मोठ्या सायबर खंडणी रॅकेटचा यशस्वीपणे पर्दाफाश केला असून, दोन संशयितांना