Government Job : पालिकेच्या नोकरीला ७१ जणांनी केला रामराम!

पुणे : सरकारी कामाची बदलती पद्धती, कामाचा व्याप, काम करताना होणारा मानसिक त्रास यामुळे गेल्या वर्षभरात ७१ जणांनी पालिकेच्या नोकरीला रामराम ठोकल्याचे समोर आले आहे. तर, पालिकेत कायमस्वरूपी असलेल्या १३ कर्मचाऱ्यांनी निवृत्ती (व्हीआरएस) घेतली आहे. दोन वर्षांपूर्वी पालिकेत नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून इतर ठिकाणी चांगल्या पदावर संधी मिळाल्याने त्यांनी पालिकेची सेवा सोडली असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून केला जात आहे.


पुणे महापालिकेत नोकरभरतीचा वाद न्यायालयात असल्याने, तसेच पालिकेची सेवा प्रवेश नियमावलीला अंतिम मान्यता न मिळाल्याने गेली दहा ते बारा वर्षे पालिकेत कोणत्याही पदावर भरती झालेली नव्हती. गेल्या दहा ते बारा वर्षांमध्ये पालिकेतून अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाले. मात्र, भरती प्रक्रियेवर बंदी असल्याने पालिकेने कंत्राटी पद्धतीने पदे भरून कामे सुरू ठेवली होती.


राज्य सरकारने नोकरभरतीवरील स्थगिती उठविल्याने २०२२ मध्ये पुणे महापालिकेने १३५ कनिष्ठ अभियंत्यांसह विविध पदांसाठी ४४८ जणांची भरती प्रक्रिया राबविली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ३२० जागांची भरती प्रक्रिया पूर्ण केली. या दोन टप्प्यांत आत्तापर्यंत पालिकेने सुमारे ८०८ पदांची भरती केली आहे. यातील लिपिक, कनिष्ठ अभियंता, फायरमन, सहायक अतिक्रमण निरीक्षक, विभागीय वैद्यकीय अधिकारी यांसह अन्य काही पदांवरील ७१ जणांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता या जागा रिक्त झाल्या आहेत.


पालिकेत काम करताना होणारा त्रास, माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधींकडून टाकला जाणारा दबाव, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणारा मानसिक त्रास यामुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याचे कारण पुढे करून राजीनामे देण्यात आल्याची चर्चा पालिकेत सुरू आहे. मात्र, हे कर्मचारी स्पर्धा परीक्षा देऊन पालिकेच्या सेवेत दाखल झाले होते. त्यांना इतर काही ठिकाणांवरून पालिकेपेक्षा अधिक चांगल्या प्रकारची नोकरीची संधी मिळाल्याने त्यांनी राजीनामा दिला असल्याचे पालिकेच्या प्रशासन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Nitesh Rane : शिवणाटाकळी तलावातील पाणीपातळीत घट; पंचनाम्यानंतर पात्र मच्छीमारांना मदत मिळवून देणार - मंत्री नितेश राणे

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

‘मफलरवाला’ नेता कोण? १० ऑक्टोबरला नाव जाहीर करणार- अजित पवारांच्या अपघातप्रकरणी रोहित पवारांचा दावा

व्हीएसआर कंपनीला सत्तेच्या जोरावर वाचविले जात असल्याचा आरोप मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या

Illegal Sand Mining : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यावर महसूल विभागाची कारवाई

- अवैध वाळू उत्खननप्रकरणी ४.९० कोटींचा दणका; दंडातून वगळण्याचा तहसीलदारांचा आदेश रद्द मुंबई : मनोज जरांगे पाटील

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाची चिंता कायम; 265 तालुक्यांत दुष्काळाची नोंद; ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात यंदा पावसाची स्थिती चिंताजनक असल्याचे चित्र आहे. राज्यातील अनेक भागांत अजूनही

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे आज दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौऱ्यावर

मुंबई : दुष्काळामुळे तलावांमधील मत्स्यव्यवसायावर झालेला परिणाम आणि नुकसानग्रस्त मच्छीमारांच्या समस्या जाणून

Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रामध्ये पुन्हा हवामान बदल, 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट; मुंबई- पुण्याची स्थिती काय?

मुंबई: गणेशोत्सवानंतर राज्यातील हवामानात पुन्हा मोठे फेरबदल जाणवणार आहेत. सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या