10 जानेवारीपासून जनगणना 2027 ची स्वयं-गणना; महाराष्ट्रात 25 जानेवारीपासून घरोघरी सर्वेक्षण

महाराष्ट्रात जनगणना 2027 च्या दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, १० ते २४ जानेवारी २०२७ दरम्यान नागरिकांना ऑनलाइन स्वयं-गणनेद्वारे माहिती नोंदवता येणार आहे. त्यानंतर २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारीदरम्यान प्रगणक घरोघरी जाऊन लोकसंख्या गणना करणार आहेत. या प्रक्रियेत नागरिकांची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि लोकसंख्याशास्त्रीय माहिती संकलित करण्यासाठी ४० प्रश्नांची डिजिटल प्रश्नावली वापरण्यात येणार आहे.

जनगणना 2027 च्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणनेचे काम अचूक, पारदर्शक आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने या कामास सर्वोच्च प्राधान्य द्यावे. जनगणनेच्या माध्यमातून संकलित होणारी माहिती पुढील नियोजन आणि विविध विकासकामांसाठी महत्त्वपूर्ण असल्याने सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले. जनगणना 2027 च्या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रधान जनगणना अधिकाऱ्यांची राज्यस्तरीय परिषद 21 नोव्हेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे उद्घाटन मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या आभासी उपस्थितीत झाले.


जनगणना 2027 चे राज्यातील वेळापत्रक


महाराष्ट्रात 10 ते 24 जानेवारी 2027 या कालावधीत नागरिकांना ऑनलाइन स्वयं-गणना पोर्टलद्वारे स्वतःची माहिती नोंदवता येणार आहे. त्यानंतर 25 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2027 या कालावधीत प्रगणक घरोघरी जाऊन लोकसंख्या गणना करतील. 28 फेब्रुवारीच्या मध्यरात्री बेघर लोकसंख्येची गणना करण्यात येईल, तर 1 ते 5 मार्च 2027 या कालावधीत पुनरावलोकन फेरी होणार आहे. या टप्प्यात नागरिकांची लोकसंख्याशास्त्रीय, सामाजिक आणि आर्थिक माहिती संकलित करण्यासाठी 40 प्रश्नांची डिजिटल प्रश्नावली वापरण्यात येणार आहे. यामध्ये नाव, कुटुंबप्रमुखाशी असलेले नाते, लिंग, वय, वैवाहिक स्थिती, धर्म, जात, दिव्यांगत्व, मातृभाषा, शिक्षण, व्यवसाय, रोजगार आणि स्थलांतर यासंबंधी माहितीचा समावेश आहे.






परिषदेत जनगणना अधिनियम व नियम, पीई मोबाइल ॲप, एचएलबीसी आणि सीएमएमएस पोर्टल, गणना क्षेत्रांची निश्चिती, जनजागृती आणि देखरेख यासंबंधी तांत्रिक सत्रे घेण्यात आली. मास्टर ट्रेनर्स, जिल्हा व चार्ज अधिकारी आणि तांत्रिक सहाय्यकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून क्षेत्रीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण सुरू आहे. यानंतर प्रगणक आणि पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. परिषदेस नवी दिल्ली येथील भारताचे महानिबंधक कार्यालयाचे उपमहानिबंधक (सी अँड टी) जसपाल सिंग, सर्व विभागीय आयुक्त, राज्यातील प्रधान जनगणना अधिकारी, जनगणना कार्य संचालनालय, मुंबई तसेच महाराष्ट्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Sugar Price Hike : महागाईचा गोडवा कडू! सणासुदीशिवायच साखरेच्या दरात मोठी उसळी; जाणून घ्या प्रमुख शहरांतील ताजे दर

सर्वसामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघराचे आर्थिक गणित पुन्हा एकदा बिघडवणारी बातमी समोर आली आहे. कोणताही सण-उत्सव

गोशाळांच्या जमीन व्यवहारांना कृषिदर लागू होणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

मुंबई: गोशाळांचे आर्थिक बळ वाढविण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे गोशाळांसाठी जमीन

Narhari Zirwal : लाचखोरी प्रकरणात मंत्री नरहरी झिरवळ यांचा माजी खासगी सचिव निलंबित

मुंबई : अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयाशी संबंधित लाचखोरी प्रकरणी त्यांचे तत्कालीन

Kartiki Ekadashi 2026: ‘बळीराजाला संकटात वाऱ्यावर सोडणार नाही’; विठुरायाच्या चरणी शिंदेंचे साकडे

पंढरपूर: कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि विठुरायाच्या

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘ओटीएस’ कर्जमुक्तीची पहिली यादी जाहीर; लाखो शेतकऱ्यांना मिळणार योजनेचा लाभ

मुंबई: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत एकवेळ समझोता (ओटीएस) साठी पात्र

Eknath Shinde : पर्यावरण जनजागृतीसाठी राज्यभर फिरणार 5 विशेष रथ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

पंढरपूर : पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना लहान वयातच समजावे, यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण