लग्नाला अवघे सहा महिने झाले असतानाच एका तरुणाचा संसार दुर्दैवीरीत्या संपल्याची धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात उघडकीस आली आहे. पत्नीचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याने पती या नात्यात अडथळा ठरत होता. याच कारणातून पत्नीने कथित प्रियकराच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय
गोविंद शिवाजी कागदे (वय 27) असे मृत तरुणाचे नाव आहे. ते धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील गोलेगाव येथील रहिवासी होते. गोविंद यांचा अवघ्या सहा महिन्यांपूर्वी अंजली हिच्याशी विवाह झाला होता. मात्र, अंजलीचे विवाहापूर्वीपासूनच शुभम सुभाष खोसे याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप आहे. शुभम हा गोविंद यांचा नातेवाईक असल्याची माहितीही समोर आली आहे. विवाहानंतरही अंजली आणि शुभम यांचे संबंध सुरू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. गोविंद हे या संबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याने दोघांनी मिळून त्यांना संपवण्याचा कट रचल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला आहे.(Wife plots to kill husband)
Delhi 2021 trailer: कोरोना काळातील भयावह वास्तव पडद्यावर येणार; ‘दिल्ली 2021’चा ट्रेलर चर्चेत
कोरोना महामारीचा काळ आणि त्या काळात देशाने अनुभवलेली भयावह परिस्थिती आजही अनेकांच्या आठवणीत आहे. विशेषतः 2021 मधील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण ...
चर्चेच्या बहाण्याने बोलावले
19 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास गोविंद यांना फोन करून रामकुंड परिसरातील वाकवड तलावाजवळील कुंथलगिरीच्या डोंगराळ भागात बोलावण्यात आले. त्यानंतर तिथे त्यांच्यात चर्चा सुरू झाली. याच दरम्यान वाद झाल्याचे सांगितले जात आहे. या वादातून गोविंद यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. डोंगराळ भागात जनावरे चारत असलेल्या एका गुराख्याला आरडाओरड ऐकू आली. त्याने घटनास्थळाच्या दिशेने पाहिले असता दोन जण एका व्यक्तीला मारहाण करत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्याने तातडीने स्थानिक व्यक्तीला फोन करून घटनेची माहिती दिली. स्थानिक व्यक्तीने वाशी पोलिसांना याबाबत कळवले.(Husband murder conspiracy)
पोलिसांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर शिंदे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी संशयित अंजली आणि शुभम हे परिसरातून निघून जाण्याच्या प्रयत्नात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून दोघांनाही ताब्यात घेतले. घटनेनंतर अवघ्या काही वेळात पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली.
10 जानेवारीपासून जनगणना 2027 ची स्वयं-गणना; महाराष्ट्रात 25 जानेवारीपासून घरोघरी सर्वेक्षण
जनगणना 2027 च्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणनेचे काम अचूक, पारदर्शक आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने या कामास सर्वोच्च ...
नातेवाइकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
या प्रकरणी गोविंद यांचे नातेवाईक ज्ञानेश्वर बाजीराव कागदे यांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार अंजली गोविंद कागदे आणि शुभम सुभाष खोसे या दोघांनी संगनमत करून गोविंद यांची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) आणि 3(5) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
फॉरेन्सिक पथकाकडून तपास
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले. घटनास्थळावरून आवश्यक पुरावे गोळा करण्याचे काम करण्यात आले आहे. या प्रकरणात नेमका कट कसा रचण्यात आला, घटनेच्या दिवशी काय घडले आणि यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, या सर्व बाबींचा तपास पोलीस करत आहेत.(Marital dispute leads to murder plot)
अवघ्या सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या संसाराचा अशा प्रकारे अंत झाल्याने गोलेगावसह वाशी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रेमसंबंधातून पतीच्या हत्येचा आरोप असलेल्या या प्रकरणाने धाराशिव जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांच्या पुढील तपासातून या घटनेमागील संपूर्ण सत्य समोर येण्याची शक्यता आहे.