दहावी परीक्षा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार ६ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह, तर २० ते ३० नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे.


राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहेत. तर व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले विद्यार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत आणि तुरळक विषय घेऊन परीक्षा देणारे विद्यार्थी, आयटीआयचे विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्रचलित पद्धतीने कनिष्ठ महाविद्यालयातर्फे भरायचे आहेत. त्यासाठी ५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र आता अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला आहे.


माध्यमिक शाळांनी अर्ज भरण्यापूर्वी शाळा, संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक याबाबतची माहिती भरून मंडळाकडे पाठवणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज ऑनलाइन भरायचे असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेमार्फत अर्ज भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी अर्जात भरलेली माहितीची पडताळणी करून ती अचूक असल्याची खात्री शाळांनी करावी. विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची मुदत संपल्यावर शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या आणि प्रीलिस्ट ४ डिसेंबरपर्यंत विभागीय मंडळाकडे जमा करायच्या असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Prahaar Marathi News Live, 22 November 2026: महाराष्ट्रासह देश-विदेशातील घडामोडी, एका क्लिकवर वाचा आजच्या घडामोडी!

Prahaar Marathi News Live दिनांक 22 नोव्हेंबर 2026 च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या,

Shocking crime news Maharashtra: ज्याच्यासोबत बांधली लग्नगाठ, त्याच्याच हत्येचा कट! पत्नीच्या कृत्याने परिसर हादरला

लग्नाला अवघे सहा महिने झाले असतानाच एका तरुणाचा संसार दुर्दैवीरीत्या संपल्याची धक्कादायक घटना धाराशिव

Pune Camp 8 hotels license suspended : पुणेकरांनो सावधान! बाहेर खाताय ? कॅम्पमधील ८ प्रसिद्ध हॉटेल्सवर FDA ची मोठी कारवाई!

पुणे : पुणे शहरातील खवय्यांच्या आरोग्याची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि महापालिकेने

10 जानेवारीपासून जनगणना 2027 ची स्वयं-गणना; महाराष्ट्रात 25 जानेवारीपासून घरोघरी सर्वेक्षण

जनगणना 2027 च्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणनेचे काम अचूक, पारदर्शक आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी

Sugar Price Hike : महागाईचा गोडवा कडू! सणासुदीशिवायच साखरेच्या दरात मोठी उसळी; जाणून घ्या प्रमुख शहरांतील ताजे दर

सर्वसामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघराचे आर्थिक गणित पुन्हा एकदा बिघडवणारी बातमी समोर आली आहे. कोणताही सण-उत्सव

गोशाळांच्या जमीन व्यवहारांना कृषिदर लागू होणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

मुंबई: गोशाळांचे आर्थिक बळ वाढविण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे गोशाळांसाठी जमीन