'उत्सव निवडणुकीचा' आज गेटवे ऑफ इंडिया येथे होणार लेझर शो

मतदान जनजागृतीचा राज्यस्तरीय शुभांरभ


मुंबई : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ निमित्त भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभागासाठी सुनियोजित कार्यक्रम अंतर्गत, मतदार जनजागृतीसाठी 'उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा' हे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ गेटवे ऑफ इंडिया येथे उद्या ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता करण्यात येणार आहे.


महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ च्या मतदान पूर्वतयारीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे उप निवडणूक आयुक्त हिर्देश कुमार, उप निवडणूक आयुक्त संजय कुमार, संचालक पंकज श्रीवास्तव, प्रधान सचिव अविनाश कुमार, सचिव सुमन कुमार, अवर सचिव अनिल कुमार हे शिष्टमंडळ मुंबई दौऱ्यावर येणार आहे. त्यांच्या उपस्थितीत 'उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा' या विशेष अभियानाचा शुभारंभ होईल. तसेच मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात एकाच वेळी मतदार जनजागृती अभियानाची सुरुवात होणार आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम, मुंबई उपनगर जिल्हा व मुंबई शहर जिल्हा यांचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, सर्व अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी देखील या शुभारंभास उपस्थित राहणार आहेत.


क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेता सुबोध भावे, अभिनेत्री वर्षा उसगांवकर, सिने कलाकार अर्जुन कपूर, हास्य कलाकार भारती सिंग, हर्ष लिंबाचिया, गायक मिलिंद इंगळे, गायिका वैशाली माडे, गायक राहुल सक्सेना यांच्यासह विविध नामवंत कलाकार, अभिनेते तसेच दिव्यांग अधिकार क्षेत्रातील विराली मोदी, राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे सदिच्छा दूत श्रीगौरी सावंत आणि निलेश सिंगीत याप्रसंगी उपस्थित राहतील.


या विशेष अभियानाचा मुख्य उद्देश मतदारांमध्ये निवडणुकीतील सहभागाबद्दल जागरूकता निर्माण करणे व मतदारांची सक्रिय भागीदारी सुनिश्चित करणे हा आहे. त्यादृष्टीने या शुभारंभ कार्यक्रमात विविध कला सादरीकरणातून मतदार जनजागृतीचा संदेश देण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई पोलीस दलाच्या वाद्यवृंद पथकाकडून सादरीकरण करण्यात येणार आहे. तर, डाक कार्यालयाने निवडणूक विषयक तयार केलेल्या डाक तिकिटाचे अनावरण केले जाईल. त्याचप्रमाणे मतदान करण्याविषयी शपथ देण्यात येईल. मतदार जनजागृतीचा संदेश देणारी विद्युत रोषणाई देखील समुद्रातील बोटींवर करण्यात येणार आहे. मतदार जागृती रॅली, मतदार जागृती व्हॅनचे लोकार्पण, फ्लॅश मॉब देखील यानिमित्ताने आयोजित करण्यात आले आहे.



गेट वे ऑफ इंडिया ते कुलाब्यापर्यंत मतदार जागृती रॅली


या कार्यक्रमानंतर गेटवे ऑफ इंडिया ते कुलाब्याच्या निवासी ठिकाणापर्यंत विशेष मतदार जागृती रॅली आयोजित करण्यात येईल. यामध्ये नागरिकांना मतदान प्रक्रियेतील महत्त्व आणि त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी जागरूक केले जाईल.

Comments
Add Comment

Mumbai Book Festival: मुंबईत २४ नोव्हेंबरपासून पुस्तक महोत्सव; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : पुस्तकप्रेमी, साहित्यिक आणि वाचकांसाठी मुंबईत येत्या २४ नोव्हेंबरपासून सहा दिवसांचा पुस्तक महोत्सव

Maharashtra State Government Decision: क्राईम ब्रँच, आर्थिक गुन्हे शाखेला आता पोलीस ठाण्याचा दर्जा; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला (क्राईम ब्रँच) आणि आर्थिक गुन्हे शाखेला (ईओडब्ल्यू) आता अधिकृतपणे पोलीस

Anti-Narcotics Van: अमली पदार्थांविरोधी मोहिमांसाठी मुंबई पोलिसांना ‘अँटी-नार्कोटिक्स व्हॅन’

मुंबई : अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री रोखण्यासह गुन्ह्यांच्या तपासातील त्रुटी दूर करण्यासाठी मुंबई

Kurla Crime: कुर्ल्यात तरुण जोडप्याला हॉकी स्टिक, बेल्टने मारहाण; 8 अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल

कुर्ला येथील एका बागेत किशोरवयीन जोडप्याला मारहाण केल्याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी आठ मुलांना ताब्यात घेतले

Shiv Sena Blood Donation Camp: रक्ततुटवड्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुंबईत रक्तदान अभियान

मुंबई : गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या सामाजिक जबाबदारीतून शिवसेना रविवारी, 22 नोव्हेंबरपासून

पवई तलावावर साकारलंय देशातील सर्वात भव्य म्युझिकल फाउंटन, लाईट अँड साउंड शोमधून उलगडणार मराठ्यांच्या शौर्यगाथा!

मुंबई: मुंबईतील पर्यटनामध्ये भर घालण्यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य