पंतप्रधान मोदींची आज नाशिकला सभा

नाशिक :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेचे आयोजन शुक्रवारी, ८ नोव्हेंबरला येथील तपोवन मैदानावर करण्यात आले असून किमान एक लाख जनसमुदाय उपस्थित राहिल याचे नियोजन स्थानिक भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे.


सभेची वेळ भर दुपारची असल्याने जलरोधक तंबूमध्ये लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह महायुतीचे अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.


प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दृकश्राव्य माध्यमातून गुरुवारी सभेच्या तयारीचा आढावा घेतला. जिल्ह्यातील मालेगाव मध्य वगळता सर्व १४ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सभेला उपस्थित राहतील.


विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर मोठ्या नेत्याची आणि त्यातही थेट पंतप्रधानांचीच पहिली सभा शहरात होत असल्याने तिच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी आणि शुक्रवारी शहरातील वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे.


सभेच्या ठिकाणापासून दूरवर लोकांना वाहने पार्क करावी लागणार आहेत. मात्र, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे आवश्यक ठरले आहे. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात वाहने आणि कार्यकर्ते या सभेसाठी येणार असल्याने त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ही काळजी घेण्यात आली आहे.

Comments
Add Comment

लोहगड हत्याकांड : २५०० पानांचे चार्जशीट दाखल! पोलिसांचा तपास पूर्ण, कोर्टात धक्कादायक पुरावे सादर

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावर घडलेल्या व्यावसायिक केतन अग्रवाल (Ketan Agrawal) यांच्या हत्येच्या प्रकरणाला

Bhootam Bhayam : ‘ऑरेंज ज्युस गँग’ची पहिली फिल्म आता घरबसल्या; ‘भूतम् भयम्’ २५ सप्टेंबरपासून OTTवर रिलीज

मुंबई : सोशल मीडियावर लोकप्रिय ठरलेल्या ‘ऑरेंज ज्युस गँग’ची पहिलीच फिल्म ‘भूतम् भयम्’ आता OTTवर दाखल होण्यासाठी

Nashik News : 8 महिन्यांची चिमुकली बेपत्ता, संशयिताची आत्महत्या; आता आजोबाही गायब, नांदगाव प्रकरणाचं गूढ वाढलं

Nashik News : नांदगाव तालुक्यातील मन्याड चौकी परिसरातील बाभुळवाडी येथून आठ महिन्यांची चिमुकली बेपत्ता झाल्याच्या

Pune Crime News : मामाचा गळा चिरून खून, भाच्यानेही संपवलं जीवन ; सुसाईड नोटमध्ये धक्कादायक कारण समोर

Pune Crime News : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे मामा-भाच्याच्या नात्याला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.

Gondhal Movie News: ऑस्करवारीनंतर ‘गोंधळ’ च्या दिग्दर्शकांनी केली महत्त्वाची घोषणा, संतोष डावखरांची OTT रिलीजवरही प्रतिक्रिया

मुंबई: दिग्दर्शक संतोष डावखर यांच्या पहिल्याच कलाकृतीने ऑस्कर गाठलं आहे. त्यांचा दिग्दर्शक म्हणून 'गोंधळ'

IIT Bombay student suicide news : ChatGPT चा वापर अन् दुर्दैवी अंत! IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येने खळबळ; नक्की काय घडलं ?

मुंबई : IIT बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या दुर्दैवी आत्महत्येच्या प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळालं आहे.