तापमानाने नीचांकी पातळी गाठल्याने नाशिक गारठले

नाशिक : आठवडाभरापासून कमी होणाऱ्या तापमानाने मंगळवारी हंगामातील १०.८ अंश ही नीचांकी पातळी गाठली. तर निफाडच्या कृषी विज्ञान केंद्रात ८.८ अंश तापमानाची नोंद झाली. नोव्हेंबरच्या अखेरीस तापमान या पातळीवर आल्याने सर्वत्र सुखद गारव्याची अनुभूती मिळत आहे.


कडकडीत उन्हाळा, मुसळधार पावसानंतर नाशिकची वाटचाल आता वेगाने कडाक्याच्या थंडीच्या दिशेने सुरू झाली आहे. एरवी दिवाळीनंतर वातावरणात गारवा जाणवू लागतो. तशी सुरुवात यंदाही झाली होती. नोव्हेंबरच्या मध्यावर तापमान १६.६ अंशावर होते. ११ दिवसांत तापमान ५.८ अंशाने खाली आले आहे. मागील आठवड्यात गुरुवार आणि शुक्रवार असे सलग दोन दिवस तापमान १२.४ अंशावर होते. सोमवारची सकाळ नाशिकला थंड करणारी ठरली. या दिवशी शहरात १२ अंश तर, निफाडमध्ये १० अंश तापमानाची नोंद झाली होती. मंगळवारी ते आणखी खाली आले. नाशिक शहरात १०. ८ तर निफाडमध्ये ८.८ अंश तापमानाची नोंद झाल्याचे हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. या हंगामातील हे नीचांकी तापमान आहे. शहर आणि ग्रामीण भागात कमालीचा गारवा जाणवत आहे. गारठ्यामुळे उबदार कपडे बाहेर पडू लागले आहेत. ग्रामीण भागात थंडीची तीव्रता अधिक जाणवते.



थंडीमुळे द्राक्ष बागायतदार सतर्क झाले असून थंडीचा कडाका वाढल्यास बागांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी त्यांना उपाययोजना करणे भाग पडणार आहे. हिवाळ्यात जिल्ह्यामध्ये कायमच थंडी जाणवत असते. नाशिक, निफाड आणि मालेगाव या ठिकाणी तापमान घसरत असते. यंदा हिवाळ्याला सुरुवात होत असतानाच तापमान घसरल्याने यापुढे थंडीत अधिक वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

Sugar Price Hike : महागाईचा गोडवा कडू! सणासुदीशिवायच साखरेच्या दरात मोठी उसळी; जाणून घ्या प्रमुख शहरांतील ताजे दर

सर्वसामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघराचे आर्थिक गणित पुन्हा एकदा बिघडवणारी बातमी समोर आली आहे. कोणताही सण-उत्सव

गोशाळांच्या जमीन व्यवहारांना कृषिदर लागू होणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

मुंबई: गोशाळांचे आर्थिक बळ वाढविण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे गोशाळांसाठी जमीन

Narhari Zirwal : लाचखोरी प्रकरणात मंत्री नरहरी झिरवळ यांचा माजी खासगी सचिव निलंबित

मुंबई : अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयाशी संबंधित लाचखोरी प्रकरणी त्यांचे तत्कालीन

Kartiki Ekadashi 2026: ‘बळीराजाला संकटात वाऱ्यावर सोडणार नाही’; विठुरायाच्या चरणी शिंदेंचे साकडे

पंढरपूर: कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि विठुरायाच्या

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘ओटीएस’ कर्जमुक्तीची पहिली यादी जाहीर; लाखो शेतकऱ्यांना मिळणार योजनेचा लाभ

मुंबई: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत एकवेळ समझोता (ओटीएस) साठी पात्र

Eknath Shinde : पर्यावरण जनजागृतीसाठी राज्यभर फिरणार 5 विशेष रथ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

पंढरपूर : पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना लहान वयातच समजावे, यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण