Eknath Shinde : पर्यावरण जनजागृतीसाठी राज्यभर फिरणार 5 विशेष रथ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंढरपूर येथे या रथांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी 28 वर्षांपासून सुरू असलेल्या ‘कार्तिकीची वारी, पंढरीच्या दारी’ या पर्यावरणपूरक उपक्रमाचा समारोपही करण्यात आला.

पंढरपूर : पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना लहान वयातच समजावे, यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) वतीने 5 विशेष पर्यावरण जनजागृती रथ तयार करण्यात आले आहेत. सौरऊर्जेवर चालणारे हे रथ आता संपूर्ण महाराष्ट्रात फिरून शाळकरी मुलांमध्ये पर्यावरण रक्षणाबाबत जनजागृती करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंढरपूर येथे या रथांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी 28 वर्षांपासून सुरू असलेल्या ‘कार्तिकीची वारी, पंढरीच्या दारी’ या पर्यावरणपूरक उपक्रमाचा समारोपही करण्यात आला.



AI आणि ॲनिमेशनच्या माध्यमातून पर्यावरणाचे धडे


या पर्यावरण रथांमध्ये आकर्षक मॅस्कॉट, ॲनिमेटेड व्हिडिओ, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि चॅटबॉटचा वापर करण्यात आला आहे. याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पर्यावरणाशी संबंधित माहिती मनोरंजक पद्धतीने दिली जाणार आहे. ओला आणि सुका कचरा वेगळा करणे, प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्यांचा वापर, पाणी वाचवणे, वृक्षारोपण आणि विजेची बचत यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचाही या उपक्रमात सहभाग वाढवला जाणार आहे.



मुलांमधून पर्यावरण रक्षणाची चळवळ उभी राहील


हवामान बदल, जागतिक तापमानवाढ, दुष्काळ आणि अतिवृष्टी यांसारख्या संकटांवर मात करण्यासाठी पर्यावरण रक्षण ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. मुलांमध्ये लहान वयातच पर्यावरण संवर्धनाचे संस्कार रुजवले, तर ती मुले आपल्या कुटुंबालाही पर्यावरण रक्षणासाठी प्रेरित करतील. भविष्यात हीच मुले पर्यावरण चळवळीची खरी ब्रँड ॲम्बेसेडर ठरतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. हा उपक्रम राबवल्याबद्दल त्यांनी MPCB अध्यक्ष सिद्धेश कदम आणि त्यांच्या टीमचे कौतुक केले.



वारकऱ्यांसाठी स्वच्छता आणि सुविधांवर भर


‘पर्यावरणाची वारी, पंढरपूरच्या दारी’ या उपक्रमातून भारूड, पोवाडा आणि कीर्तनाच्या माध्यमातून पर्यावरणाचा संदेश दिला जातो. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत एकनाथ महाराज यांच्या निसर्गविषयक विचारांचे महत्त्वही शिंदे यांनी यावेळी अधोरेखित केले.


वारीदरम्यान वारकऱ्यांसाठी स्वच्छ पाणी, स्वच्छतागृहे आणि मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली आहे. 10 लाख पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच 60 एकर परिसरात 10 हजार कार्पेट, कचरापेट्या आणि फुलझाडांच्या कुंड्यांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती शिंदे यांनी दिली. स्वच्छतेसाठी स्वतंत्र मॉनिटरिंग यंत्रणाही कार्यरत आहे.



पंढरपूरच्या विकासकामांसाठी 25 कोटींचा निधी


वारीपुरत्या सुविधा न ठेवता पंढरपूरमध्ये कायमस्वरूपी विकासकामे करण्यावर शासनाचा भर असल्याचे शिंदे यांनी सांगितले. उपलब्ध जागेचे काँक्रिटीकरण, वृक्षारोपण आणि सुशोभीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुरू असलेल्या विकासकामांसाठी 25 कोटी रुपयांचा शासन निर्णय तातडीने काढण्याच्या सूचना पर्यटन मंत्र्यांना दिल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी MPCBच्या डीप क्लीन ड्राइव्ह मशीनचे उद्घाटन करण्यात आले.



वारकऱ्यांसोबत एकनाथ शिंदेंची फुगडी


कार्यक्रमाच्या समारोपावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांसोबत टाळ आणि चिपळ्या हातात घेत पांडुरंगाचा गजर केला. त्यानंतर वारकऱ्यांच्या आग्रहास्तव त्यांनी आधी वारकऱ्यांसोबत आणि नंतर MPCBचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्यासोबत फुगडी घातली. या प्रसंगाचीही उपस्थितांमध्ये चर्चा झाली.


Comments
Add Comment

PM SVANidhi : PM स्वनिधी पुरस्कार 2026 मध्ये महाराष्ट्राची बाजी; राज्याला 5 राष्ट्रीय पुरस्कार

Maharashtra News: पथविक्रेत्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी

Food And Drug Administration : FDA ची राज्यभरात मोठी कारवाई; 7 महिन्यांत 152.65 कोटींचा अन्नसाठा जप्त, 1,688 जणांना अटक

मुंबई : राज्यातील अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता राखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली

पाणीटंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे तातडीने पाणीपुरवठा करा, मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

राज्यात संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीचे सावट लक्षात घेता राज्य सरकार आता अलर्ट मोडवर आले आहे. ज्या गावांमध्ये

IAS officers Transfers : राज्यातील चार वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: राज्य शासनाने शुक्रवारी (२० नोव्हेंबर) चार वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले.

Revenue Department : दोन लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती आता आयकर विभागाला जाणार, महसूल विभागाचा निर्णय

मुंबई : जमीन किंवा मालमत्तेच्या खरेदी-विक्री व्यवहारात दोन लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम रोखीने दिल्यास

सैनिकी शाळांतील प्रवेश आता केवळ गुणवत्तेच्या आधारेच; मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश

राज्यातील सैनिकी शाळांमध्ये पारदर्शक, उत्तरदायी आणि गुणवत्तापूर्ण व्यवस्था निर्माण करण्यावर नव्या धोरणात भर