विधानसभेत ३५, ७८८ कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर 

लाडकी बहिण योजनेसाठी 1400 कोटींच्या निधीची तरतूद


नागपूर : नागपुरात सुरू असलेल्या राज्य विधीमंडळाच्या हिवळी अधिवेशनात आज, सोमवारी पहिल्याच दिवशी 35 हजार 788.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्यात. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत या मागण्या मांडल्या होत्या.


नागपुरात सोमवारपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारकडून आज 35,788.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या. यामध्ये 1400 कोटी रुपयांची तरतूद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आली. याशिवाय, मुंबई मेट्रो 3 साठी 655 कोटींची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे. राजकोट येथईल शिवरायांच्या पुतळ्यासाठी राज्य सरकारकडून 36 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. तर या पुतळ्याचे कंत्राट सुप्रसिद्ध मूर्तीकार राम सुतार यांना देण्यात आले आहे.

एकूण पुरवणी मागण्यांपैकी सर्वाधिक म्हणजेच 7 हजार 490.24 कोटी रुपयांचा निधी हा सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात येणार आहे. त्यापैकी 3 हजार 195 कोटी रुपये हे केंद्र सरकारकडून राज्य सरकारला बिनव्याजी देण्यात आले आहेत. हा निधी इमारती, रस्ते आणि पूल बांधण्यासाठी होणार आहे.पुरवणी मागण्यांपैकी 3 हजार 50 कोटी रुपयांचा निधी हा मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज अतंर्गत वापरण्यात येणार आहे. तर साखर कारखान्यांना कर्ज देण्यासाठी 1204 कोटी तर दुध उत्पादक शेतकऱ्यांना 758 कोटी रुपये कर्ज देण्यासाठी वापरले जाणार आहेत. राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत या पुरवणी मागण्या मांडल्या होत्या. लाडकी बहीण योजनेतील तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये 1400 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, मासिक लाभ 1500 वरुन 2100 करण्याबात अद्याप तरतूद करण्यात आली नाही.

Comments
Add Comment

Pavana Dam: पवना धरणग्रस्तांना संपादित क्षेत्राइतकी पर्यायी जमीन; कमाल मर्यादा 4 एकर

Pavana Dam: गेल्या सहा दशकांपासून प्रलंबित असलेल्या पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी

Maharashtra Drought : राज्यातील दुष्काळी तालुक्यांत अनावश्यक बांधकामांना स्थगिती

मुंबई : राज्यातील ३१० दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये निर्माण झालेल्या टंचाईसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; पायलटने उड्डाण रोखले

सोलापुर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पंढरपूर दौऱ्यादरम्यान त्यांच्या

कार्तिकी वारीसाठी 5 कोटींचा निधी! चंद्रभागेच्या घाटावर उतरले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, स्वतः हातात पाइप घेऊन केली स्वच्छता

पंढरपूर : कार्तिकी एकादशी यात्रेसाठी पंढरपुरात दाखल होणाऱ्या लाखो वारकऱ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार

Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांचा मोठा निर्णय; 350 बॉडी कॅमेऱ्यांची करडी नजर, आता चुकूनही नियम मोडू नका

पुणे : वाहतूक नियमांची अंमलबजावणी करताना पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक

Sanjay Pandey : माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना मोठा दिलासा; सर्वोच्च न्यायालयाकडून पुनामिया यांची याचिका फेटाळली

मुंबई : माजी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेले दोन एफआयआर रद्द करण्याच्या मुंबई